Skip to main content

(नसतेस घरी तू जेव्हा )

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 06/03/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता नसतेस घरी तू जेव्हा नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो नभ फाटून वीज पडावी जल्लोश तसा मी करतो ही शुद्ध जरा क्षीण होते अन्‌ पती बोलका होतो येताच विड्या ओठांशी मी दचकून बघतो मागे खिडकीशी थांबून ओढा मग गंध तयांचा जातो तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा घर भरभर अवरून सगळे मी पुन्हा सात्त्विक होतो तू सांग सख्या मज काय तू केले मी नसताना ? माझा मग जीव उगाच भात्यासम धडधड करतो ना अजून झालो चालू ना हुशार अजुनी झालो तुज पाहून मी डगमगतो अन् चरणा वर तव पडतो !

वाचने 28791
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

आज घरी कोणी दिसत नाहीये!:)) एकामागून एक धोबीपछाड सुरु आहेत म्हणून विचारतोय! हायक्लास विडंबन!! चतुरंग

भन्नाट,रे केश्या.... नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो लईच जबरा... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

तू सांग सख्या मज काय तू केले मी नसताना ? माझा मग जीव उगाच भात्यासम धडधड करतो आहाहा ! अती सुंदर !! - सर्किट

काय केशव, आज एकदम धडाधड विडंबने येत आहेत... खरं सांगायचं तर मला ते "नसतेस घरी तू जेव्हा" इतके नाही आवडत. पण विडंबन एकदम जबरा.. हेच जास्ती आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु

तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा घर भरभर अवरून सगळे मी पुन्हा सात्त्विक होतो वा वा! क्या बात है... अवांतर - मी पुन्हा सात्त्विक होतो च्या ऐवजी, पुन्हा मी सात्विक होतो असे चालेल का? आपला (कवितेतलं फारसं काही न समजणारा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

म्हणताना 'मी पुन्हा सात्त्विक होतो' हे जस्त चपखल बसते आहे.. आपला (गाण्यातल फारस काही न समजणारा)केशवसुमार

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले एकापेक्षा एक सरस विडंबने वाचायला मिळत आहेत, आमची सुटी कारणी लागली :) नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो आपल्या विडंबनाची एकदा सुरुवात जोरदार झाली की, उत्तरार्ध, आणि शेवट लाजवाब होतो, हा आमचा अनुभव आहे. सारांश, विडंबन आवडले :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार

माझ्या मते, जर हे विडम्बन खुद्द सन्दीप खरेनीदेखील वाचले, तर त्यानाही हसू आवरणार नाही. फार झक्कास जमलय! लगे रहो! आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

बेष्टच एका वर्षानी जालिंदरबाबाच्या कृपने पुन्हा काव्याचा आनंद घेता आला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

झकासच ! एकदम एव्हरग्रिन विडंबन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

नभ फाटून वीज पडावी जल्लोश तसा मी करतो ही शुद्ध जरा क्षीण होते अन्‌ पती बोलका होतो
जय हो...........

एकदम मस्त विडंबन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

येताच विड्या ओठांशी मी दचकून बघतो मागे खिडकीशी थांबून ओढा मग गंध तयांचा जातो हा.हा.हा.... करेक्ट. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

व्रात्य नवर्‍याच्या सोनेरी अनुभवाची रम्य आठवण ताजी केली. पण खिडकीत उभें राहून धूम्रपान केलें तर लक्षांत ठेवा पडद्यांना धूम्रकाष्ठाचा - सिगारेटचा वास येतो. पण मूळ कविता अग्निकोल्ह्यावर दिसत नाहीं. सुधीर कांदळकर.

In reply to by इंटरनेटस्नेही

इंट्या, तुझं उत्खननाचं काम असंच जोरात चालू ठेव म्हणजे आम्हाला आयतेच जुने चांगले धागे वाचायला मिळतील.

आता वाचलं हे विडंबन! खी खी खी! हा धागा वर येण्यास कारणीभूत ठरलेले इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२ यांचे आभार!;)

In reply to by रेवती

हा हा हा.... केसु ह्यांचं जबरा विडंबन वाचण्याचा योग आला. >>>इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२ आता वाढलं असेल अशी अपेक्षा आहे. मात्र हल्ली हे आदरणीय सलग एकच जीन्स ४५ दिवस न धुता वगैरे वापरण्याचा विक्रम करत आहेत असं विशेष सूत्रांकडून समजतं.

>> तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा =)) =)) याच दोन ओळींवर अडकलीये गाडी केव्हाची! जबरदस्त मजा येते आहे म्हणताना!

पुनःपुन्हा वाचतो आहे आणि हसूनहसून गडाबडा लोळतो आहे... हे जबराट विडंबन मूळ कवितेइतकेच खास आहे यात तिळमात्र (किंवा थेंबमात्र) ही शंका नाही... हा धागा उत्खनन करून परत वर काढल्याबद्दल मिपापुरातत्त्वखातेप्रमुख श्री वहालेकरांना धन्यवाद. आणि केशवसुमार, टोपी काढून वर भिरकावली गेली आहे. क्या बात है. :D