Skip to main content

(दृष्टी भ्रम)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 06/03/2008 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा श्वास स्वतीचा यांची कवितादृष्टी भ्रम (दृष्टी भ्रम) . गेले कित्येक दिवस मला मी .... जरा बरा वाटत होतो. मग गुत्यात चमकणारे दिवे. आता पाहतो तर, वाढलेले कान. उद्या कदाचित!! शेपटी ही दिसेल. आणि पुढे, खूर आलेले हात. किंवा मग आणखीन काही... अस्पष्टसं..... ढोस केशवसुमार ................ ०६-०३-२००८

वाचने 3889
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

उद्या स्वातीताईंना कळलं तर तुमची खैर नाही. त्यांच्या रागाला सुमार राहणार नाही. तुमच्या केशाचे त्या वपन (तुमची हजामत) करतील. मग गुत्यात चमकणारे दिवे. आता पाहतो तर, वाढलेले कान. गुत्त्यातील दिवे चमकायच्या ऐवजी दिवसा तारे चमकतील आणि कान खेचले गेल्याने लंबकर्ण व्हाल. बाकी जा. ह. डो. पा. (जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे). ही धुंदी ताक पिऊन पण उतरायची नाही. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

लावण्यामावशी, धुंदी उतरायला मीठ टाकून लिंबू पाणी प्या.. ताक पिऊन उपयोग नाही.. स्वानुभव, - सर्किट आजोबा

किंवा मग आणखीन काही... अस्पष्टसं..... ढोस हे लै भारी... तात्या.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार