बाहुबली २ - The Conclusion
दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल.
कथुकल्या ५ ( विज्ञानकथा स्पेशल )
१. टेस्ट सब्जेक्ट
नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं.
“मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो.
“तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं.
एका पाकिस्तानी गाढवाची किंमत..
तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता.
दि अदर साईड….
तो म्हणे डिप्रेशनमध्ये होता. कधीपासून,कश्यामुळे ते काही माहिती नाही. आता बघणाऱयाला वाटतं, श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा..लाडात वाढलेला..मस्तीत जगलेला..कसलं आलंय डोंबलाचं डिप्रेशन? श्रीमंती एवढी की तो जन्मभर बसून खाऊ शकेल. पण ती काय एका दिवसात नव्हती आलेली. त्याच्या आज्यानं अन मायबापानं भरपूर खस्ता खाल्ल्या..पण त्याला एवढंच माहिती की ग्रँडपाचा कसलातरी बिझनेस होता तो मॉम-डॅडनी एक्सपांड केला. त्याच्यासाठी ही गोष्ट इतर अनेक गोष्टींसारखी "व्हॉटएव्हर!" कॅटेगिरीत यायची. आपण त्या बिझनेसचं अजून एक्स्पान्शन करू असं त्याला कधी वाटलं नाही.त्याच्यावर तसं काही बंधनही नव्हतं.
नवसंजीवनी
वसंजीवनी
बंकिमचंद्र शरतचंद्र विमलरा^य यांचा बंगाल| साँदेश‚ रसगुल्ला‚ कालाजामून यांचा मिठास्वाद म्हणजे बंगाल| नझरूल इस्लामांच्या कवितेतला दुर्गेचा अवतार धारण करणारा बंगाल| रक्तपदमा आणि जमुना यांचा लपंडाव म्हणजे बंगाल| मां^च्या कोमल छायेतील बंगाल| कधी सख्यांच्या एका कौतुकाच्या धापेचा बंगाल| तर कधी भाभींच्या गोड थट्टेचा बंगाल……
ऐसी काये केली करणी काय जाणो
ऐसी काये केली
करणी काय जाणो
तुझे तुज जाणों
काय जालें ।।
छन्द ऐसी गोडीं
सगुणाची आवडी
भक्तिचिच गुढी
आनंदाची ।।
निर्गुणाचे ध्यानी
ब्रह्मभाव खाणी
रूप तुझे मनी
नूरे परि ।।
नको आम्हा देवा
निर्गुण करणी
तुझेनि चरणी
वेध लागे ।।
मोहलो सावळ्या
टाळ अन चिपळ्या
धुंद देत टाळ्या
गजरी तुझे ।।
सागरलहरी
स्वप्नांचे कवडसे
लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न.
पंखांसारखे हात पसरून
स्वच्छ उन्हात नाहत
स्वत:भोवती गिरक्या घेत रहावं, नाचावं
सूर्य मावळेस्तोवर..
आणि मग खुशाल पहुडावं गार वारं अंगावर घेत
उंच, डेरेदार वृक्षाच्या छायेत संध्याकाळी
आणि रात्र अलगद उतरावी
काळीसावळी, माझ्यासारखी.
असं माझं स्वप्न आहे..
०४ नाशिकचे घड्याळजी - नाशिकचा उद्योग
पेशव्यांस घड्याळाचे भलते वेड.
अक्षय्य तृतीया
अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात.