तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता.
म्हणजे नेहमीचाच व्यापार होणार होता तर यात सिंधी विधानसभेत चर्चा होण्यासारखे काय मोठे ? आपल्याला फसवून पाकिस्तानी गाढवंतर खायला घातली जात नाहीत ना, असे त्यांच्या विधानसभेच्या सदस्यांचे धाबे दणाणलेले होते :) तशी नक्कीच केस नसल्याचे सिंधीमंत्र्यांनी आमदारांना आश्वासान दिल्याचे दैनिक डॉनच्या वृत्तात म्हटले आहे.
सगळी बातमी तर वाचून झाली पण पाकिस्तानी गाढवाची किंमत किती ठरली ? आता ती किंमत किती आणि कशी मोजावयास हवी या बद्दल मिपाकरांची आणि भारतीयांची आपापली मते असू शकतातच पण डॉन वृत्तपत्रात आलेल्या बातमीतली किंमत सांगूनच टाकतो ती आहे चक्क १ लाख रुपये प्रती गाढव.
पाकीस्तानी गाढव पाकीस्तानी गायी पेक्षा महाग का असेना 'पाकिस्तानी गाढव' हे शब्द लिहिण्याकरता कोणतेही पैसे मिपाकरांना मोजावे लागत नाहीत ह्याचा आनंदच बातमीची बातमी देताना विशेष. बाकी विशेष बातमी नसलेली गोष्ट म्हणजे पाकिस्तानला चीन देशावर केलेल्या प्रेमाच्या मोबदल्यात वर्षाला ३ अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत ३० वर्षांसाठी त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जांच्या मोबदल्यात. आता हा कर्जांचा बोजा पाकीस्तानी गाढवात वाटून दिला तर प्रति गाढव किती कर्ज दर वर्षाला फेडले जाईल हे चांगले गणिती कोडे आहे. कर्ज नको म्हणून बँकींगच्या नावाने बोटे मोडणार्या पाकींना असे कर्ज बाजारी होणे चालते ह्याचा विचार करत बसले तर आपले पाकिस्तानी गाढवाची किंमत किती हे गणित बाजूलाच राहील.
तसे पाकीस्तानी गाढवाची किंमत किती याच्या गणितात जसे भारतीयांना रस असू शकतो तसा चिनी, सौदी, आमेरीकन, रशियन इत्यादीं भारतीयांपेक्षा अधिक असतो हे लक्षात घेतले तर पाकीस्तानी गाढवे एवढी महाग का याचे रहस्य उलगडण्यास कदाचित मदतच होईल. बघा हे पाकिस्तानी गाढवांच्या किमतीचे गणित तुम्हाला उलगडते का ?
संदर्भ पाकीवृत्त पत्र डॉन
वाचने
5795
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुर्दैवी बिचारी!
पाकिस्तानी गाढवांच्या बिचारेपणा बद्दल सहमत
In reply to दुर्दैवी बिचारी! by पैसा
कातड्यांचे काय करणार होते म्हणे?
In reply to दुर्दैवी बिचारी! by पैसा
ह्याच साठि होतो उपयोग, माणसाचि तारूण्याचि हाव ;)
In reply to कातड्यांचे काय करणार होते म्हणे? by सचु कुळकर्णी
अरे देवा!
In reply to ह्याच साठि होतो उपयोग, माणसाचि तारूण्याचि हाव ;) by सचु कुळकर्णी
ते खात नाहीत असा सजीव (मानव
In reply to अरे देवा! by पैसा
ताई
In reply to अरे देवा! by पैसा
वरुण मोहिते साहेब ह्यावर
In reply to ताई by सचु कुळकर्णी
कीत्येक चैनेल्स मिक्स झाले,
In reply to वरुण मोहिते साहेब ह्यावर by सचु कुळकर्णी
वरुण मोहिते साहेब सॉरी.
In reply to कीत्येक चैनेल्स मिक्स झाले, by सचु कुळकर्णी
मध्ये कर्नाटकात अशि गाढवे
मटणात भेसळ बिसळ करण्याच्या
In reply to मध्ये कर्नाटकात अशि गाढवे by अभ्या..
नांदेड मधुन पण
In reply to मध्ये कर्नाटकात अशि गाढवे by अभ्या..
चायनीज लोक कुत्रा मांजर माकडे