ढग . . !
आभाळातले ढग कधीतरी
त्याला खूप त्रास देतात
कारण नसताना उगीच
तिचाच आकार घेतात . . . .
मग तोही नादावतो वेडा
बघत बसतो तासन् तास
ढगाचं नुसतं निमित्त एक
त्याला फक्त तिची आस....
कधी कधी एकाच क्षणात
तो ढग जातो अचानक विरुन
अन् अचानक जाणवतं रितेपण
भकास वास्तव टाकतं घेरुन
ढगासारखंच स्वप्न विरलं
आणि संपला सगळा खेळ
तो मात्र अजून जपतो उराशी
आठवणींच्या जगातली वेळ !