प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Jun 2017 - 8:18 am

प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा
......................................................
हजारोची सदस्य संख्या ओलांडणारा तो एक फेसबुका वरील समुह ..
त्यावर धनंजय जोशी हा एक सदस्य..
समुहावर अनेक वेळा मीट्स..संमेलने..मिसळ पार्ट्या आदी चालत असायच्या..
सदस्य एक मेकास काहि प्रमणात भेटले पण होते..
मात्र धनंजय..ज्याला डी.जे या नावाने ओळखले जायचे.. तो सा-या चर्चा भेटी गठी पासून दूर असायचा..
समूहावर अनेक विषयावर चर्चा चालत असत त्यात पण त्याचा फारसा सहभाग नसे.
खरा म्हणजे त्याला प्रत्यक्ष पाहिलेले कुणी नव्हते.. ना कधी त्याने कुणाशी च्याट केल्याचे आढळले होते
प्रोफाइल फोटो पण कृष्ण धवल रंगातला त्याने लावला होता..
बहुतेक त्याच्या तारुण्यातला तो फोटो असावा..
मात्र कुणाच्या वाढदिवसाची पोस्ट असली की त्यावर तो लिहितं असे..
ते मात्र तो नियमाने करत असे.
मात्र समूहात त्याची ओळख पोस्ट कर्ता अशीच होती..
रोज नित्य नेमाने तो २-३ पोस्ट्स पोस्ट करत असे..
कधी कविता..कधी कथा..कशी फोटो..कधी चर्चा विषय..तर कधी मुक्तक..
एक ना अनेक प्रकारच्या नव नव्या पोस्ट तो टाकत असे..
पोस्टस वर लाईकस व कॉमेंट्सचा पाऊस असे तर काहो पोस्ट्स्स वर मोजकेच कोमेंट्स असायचे..
पोस्ट टाकल्यावर तो पोस्ट कडे फिरकत नसे...
काही वेळा त्याला जरी प्रश्न विचारल्याचे प्रसंग आले तरी तो त्यावर मौन बाळगत असे.
**
विक्रम वर्तक उर्फ व्हिकि हा एक तरुण सदस्य समूहावर होता..
तो डी.जे च्या पोस्ट्स चा फ्यान होता..
पोस्ट वर त्याचे हमखास लाईक्स व काही वेळा कॉमेंट्स पण असायचे..
व्हिकि ला त्या प्रोफाइल ला जाणून घेण्याची उत्सुकता होती..
एक दोन वेळा तो डी.जे च्या भिंतीवर पण गेला होता पण डी जे ची प्रोफाइल लिंक क्लिकुन पण तो प्रोफाइल चे पान उघडू शकला नाही..
आपल्या आवडत्या प्रोफाइल ला भेटावे..गप्पा माराव्यात असे त्याला कायम वाटे.
**
त्या दिवशी डी.जे ने एक हटके गूढ अशी कविता पोस्टली होती..
व्हिकी ति वाचत होता शब्द रचना आशय सारेच गूढ होते..त्याला कविता आवडली त्या लाइक मारला...व ठरवले डी,जे ला भेटायचेच..
*
तो डी.जे च्या प्रोफाइल वर क्लिकला..
आश्चर्य म्हणजे लिंक उघडली..
तो प्रोफाइल चेक करत होता..
पण त्यावर त्याला फारसे काही आढळले नाही..बहुतेक डी.जे प्रोफाइल वर फारसा फिरकत नसावा याचा त्याला अंदाज आला..
भिंतिवर पण फार काहीसे नव्हते..
एक फुलाचा फोटो होता..एक सुविचार..
तो त्याच्या मित्र यादीत गेला..मोजून ६-७ मित्र त्याला दिसले..
फोटो मध्ये पण त्याचा प्रोफाइल फोटो त्याला दिसला..
मित्र यादीत त्याला "शाम पोंक्षे" नाव आढळले..
क्लिकुन तो शाम च्या अकाउंट वर गेला अन मेसेज बॉक्स मध्ये मेसेज लिहिला.
*
या गोष्टीला १५-२० दिवस झालेले होते
रविवारचा दिवस होता आरामाचा दिवस..
८ वाजून गेले होते तरी व्हिकी अंथरुणावर लोळत होता..
फोन वाजला..त्याने हात लांब करून फोन घेतला..
हॅलो..मी शाम पोंक्षे बोलत आहे..
शाम पोंक्षे नाव ऐकताच व्हिकी ताडकन उठला..
काका मी विक्रम वर्तक बोलत आहे..
विक्रम वर्तक....काही संदर्भ लागत नाही...शाम.
काका मी आपले मित्र धनंजय जोशी यांच्या फेसबुक अकाउंट वर गेलो होतो..आपण त्यांचे मित्र ना???
धनंजय जोशी..अंअं हा आठवले..अरे मी फेसबुकवर फारसा येत नसतो..धनंजय माझा फेसबुक मित्र आहे पण आता त्याला ५-६ वर्षे झाली असतील..मी सद्ध्या अमेरिकेत मुलाकडे असतो..
काका तुम्हि त्यांना भेटला आहात का?.व्हिकी
हो म्हणजे ६ वर्षापूर्वी एका फंक्शन ला आम्हाला जायचे होते..त्या वेळी त्याचा फोन आला की त्याची गाडी सर्व्हिसिंग लागेली आहे..व विनंती केली त्याने त्याला पिक अप करण्यासाठी...मी रिक्षा खाली थांबवून त्याला फोन केला तर त्याने धरी येण्याचा आग्रह केला मी त्याच्या घरी पण गेलेलो आहे..शाम
काका तुम्ही मला घराचा पत्ता देऊ शकाल का?
का? कशाला?
आमच्या समूहावर ते खुप छान लिहितं असतात..त्या मुळे त्यांना भेटायचे आहे..गप्पा मारायच्या आहेत..बघायचे आहे..
ओके
पत्ता.... प्रभात रोड ला तो राहतो म्हणजे रहात होता..आताचे माहीत नाही कारण गेल्या ५-६ वर्षात आमची गाठ भेट नाही....तिसरी की चवथी गल्ली..कांचन मृग सोसायटी .. फ्ल्याट नंबर ३०२
ओके धन्यवाद काका..अन भेटल्यावर आपला फोन नंबर पण देतो.
चालेल..
धन्यवाद काका
*
९ वाजेपर्यंत व्हिकी तयार झाला व मोटर सायकल वरुन प्रभात रोड च्या दिशेने निघाला..
ह्याला विचार त्याला विचार असे करत तो "कांचन मृग" सोसायटी मध्ये पोहोचला.
सोसायटी तशी जुनीच दिसत होती..
४ मजली बिल्डिंग..
त्याने सोसायटीच्या बोर्डावर नावे पाहिली..फ्ल्याट नंबर ३०२..धनंजय दत्तात्रेय जोशी..
जीने चढून तो ३०२ फ्ल्याट वर पोहोचला.दारावर धनंजय दत्तात्रेय जोशी. पाटी लागलेली होतो.. मात्र दाराला कुलूप लावलेले होते..
तो समोरच्या फ्याट मध्ये गेला...राजाराम गोपीनाथ कुलकर्णी..व त्याने डोअर बेल वाजवली..
थोड्याच वेळात एक वयस्कर माणूस बाहेर आला.
नमस्कार काका..मी विक्रांत वर्तक..धनंजय काकांचा मित्र..
राजाभाऊ नी दीर्घ श्वास घेतला व दार पूर्णं उघडले व त्याला बसण्याची खूण केली..
आपण कोण?? धनंजय चे नातेवाईक? राजाभाऊ म्हणाले...नाही काका मी मित्र..
आमच्या फेसबुकवरच एका समूहात ते असतात..छान पोस्ट्स लिहितं असतात..त्या मुळे त्यांना भेटायची बघायची उत्सुकता आहे...
राजाभाऊ बराच वेळ त्याच्या कडे बघत होते व म्हणाले अरे धनंजयाला जाऊन आता पाच साडेपाच वर्षे झाली असावीत..
तो आता या जगात नाही...
हे ऐकताच व्हिकीला घाम फुटला..
पण समोर फ्ल्याट वर त्यांचे नाव?/दाराला कुलूप???
त्याला एकुलती एक मुलगी आहे ति लंडन ला स्थायिक असते..२-३ वर्षातून ति फ्यामिली भारतात येते व इथेच फ्याटवर रहातात..किल्ली माझ्याकडेच असते..मी सोसायटी बिले पाणी आदीच्या बिलांचे बघतो..राजाभाऊ म्हणाले..
व्हिकि चक्रावून गेला होता..त्याने मोबाईल काढला व डी.जे चा प्रोफाइल फोटो दाखवत विचारले..काका तुम्ही यांच्या बद्दलच बोलता आहात ना??
फोटो पाहत राजाभाऊ म्हणाले हो हाच धनंजय आहे...
धन्यवाद काका..माफ करा तुम्हाला त्रास दिला..
अरे ओके त्यात त्रास कसला?
*
व्हिकी जीना उतरून खाली आला..मो सायकल जवळ थांबून तोविचार करत होता सा-या घटनांचा.
डी के चे ५ वर्षापूर्वी झालेले निधन त्याचा समूहावर वावर..त्या कथा..सारेच अत्यर्क..आकलनाच्या बाहेर होते...
निघणार तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला..त्याने पाहिले अन नॉन नंबर वरूण फोन होता..त्याने तो घेतला...
हाय व्हिकी...
कोण?
मी डी जे बोलत आहे..,,डी जे च नाव ऐकल्यावर तो उडालाच..काका तुम्ही तर...
हो बरोबर आहे..मी आता निराळ्या दुनियेत आहे मित्रा..
मला बंधन नाही..तू माझ्या घरी मला भेटण्यासाठी आलेला आहे हे मला माहीत आहे..पण आपली भेट होणे नाही...
माझे वय काय..जीवनं शैली काय याचा शोध घेणे थांबव..कारण त्यांतून काहीच निष्पन्न होणार नाही..
माझ्या कथा कविता लेख वाचत जा..
त्यांतून तुझ्या मनात माझे जे व्यक्तिमत्त्व उभे राहिलं त्यालाच खरे मान..
माझा हा पहिला व शेवटचा फोन आहे..आनंदात जीवन जग..
फोन कट झाला..
*
व्हिकी घरी आला डोके जड झाल्यागत वाटत होते..पण डी के च्या फोन ने सारे ताण तणाव दूर झाले..
तो मस्त पैकी जेवला व ताणून दिली त्याने..
संध्याकाळ झाली होती व्हिकी जागा झाल..
कट्ट्यावर मित्र वाट पाहतं असणार..तिकडे जायला हवे
तो फ्रेश झाला..व निघाला...
जाता जाता त्याने फेसबुक उघडले..ब-याच पोस्ट्स समूहावर पडल्या होत्या..
त्यात एक डी जे पण होती..
त्याने पाहिले पोस्ट ला ६-७ लाईक्स पडले होते..
तो पोस्ट वाचू लागला..
ती एक कविता होती.. मुक्त छंदातली
*
तुमचे स्वागत आहे....
खरच, वय काय असते?
एक नंबर, १८-२०-४० वर्षे..
मग त्यावरुन ठरते
सज्ञान कि अज्ञान
मतदान केंव्हा करायचे.
लग्नास वय योग्य कि अयोग्य?
मरायच वय किति....
वेळ..एक भ्रम
आमच्या कडे बघा..
आम्हाला कुठलेच नियम लागु नाहित...
बंधन नाहि आम्हाला, वय, वेळ, काळाचे...
आम्हि मुक्त आहोत..
या आमच्या दुनियेत...
तुमचे स्वागत आहे....
अरे घाबरलात...???हा हा हा...
[घाबरुन काय होणार??? आज ना उद्या यावेच लागेल]
*
व्हिकी ला हसू आले त्याला माहीत होते ती कविता डी जे नी त्याच्या साठीच लिहिली होती

कथा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2017 - 8:56 am | श्रीरंग_जोशी

कथा आवडली :-).

एस's picture

10 Jun 2017 - 9:14 am | एस

पोस्ट टाकल्यावर तो पोस्ट कडे फिरकत नसे...

अगदी असेच करणारे एक ज्येष्ठ सदस्य इथे (कधीमधी) असतात. :-D

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 9:22 am | मुक्त विहारि

अकु फॅन मुवि

अत्रे's picture

10 Jun 2017 - 9:56 am | अत्रे

मस्त!

गामा पैलवान's picture

10 Jun 2017 - 11:18 am | गामा पैलवान

अविनाशकुलकर्णी,

कथा काय वळण घेणार याचा अंदाज आला अगोदर. तरीपण आवडली.

आ.न.,
-गा.पै.

उगा काहितरीच's picture

10 Jun 2017 - 1:03 pm | उगा काहितरीच

ठीकाय !

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2017 - 1:05 pm | धर्मराजमुटके

ज्याम भारी तेजायला ! ते डी. जे. म्हणजे तुम्ही तर नाही ना ?
नाही पोस्ट टाकल्यावर परत फिरकत नाही म्हणून उगाच आपला संशय ! :)

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 4:18 pm | मुक्त विहारि

एकट्या अकूंनाच दोढ का द्या?

बादवे,

तुमचा मूद्दा बरोबर आहे.

विजुभाऊ's picture

13 Jun 2017 - 12:13 am | विजुभाऊ

एत बहुतेक जिमो असावेत.
रच्याकने बरेच दिवस झाले जिमों चे लिखाण वाचून

खेडूत's picture

10 Jun 2017 - 2:52 pm | खेडूत

अकुजी, आवडली कथा!
(फक्त त्यांचं जगही अता प्रगत झालं असेलच, असे असताना त्यांना आपल्या फेसबुकात का यावे लागेल.. असे वाटले.)

व्हिकीचं खरं नाव व्हिस्की असावं.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2017 - 7:55 am | अत्रुप्त आत्मा

अ.कु.पिडीया. :D

अकूकाका त्या अप्सरा बिप्सरा खरच लै ब्यूटीफुल असतेत का हो?
आणि ते अमृत का कायतरी असते ते कसे लागते? ओल्ड मंक सारखी टेस्ट असते का?

आणि ढगाच्या खोपच्यात वायफाय मिलते का? ब्रॉडबैंड प्लान कसा असतो?

धर्मराजमुटके's picture

11 Jun 2017 - 1:37 pm | धर्मराजमुटके

भुतांबाबतीत उत्सुकांनी सोनी याय या कार्टून चॅनेलवरची पाप-ओ-मीटर हे कार्टून बघावे ही विनंती.

रातराणी's picture

12 Jun 2017 - 12:16 pm | रातराणी

मस्त! :)