एक बाजू अशीही!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jun 2017 - 11:24 pm

काही दिवसांपूर्वी मला whatsapp वर एक लिंक आली होती. विषय होता'A LEGAL RAPIST'. एका विवाहित स्त्रीच्या मनातले विचार मांडले आहेत या लिंकमध्ये. 

संस्कृतीविचार

नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

दिपक लोखंडे's picture
दिपक लोखंडे in जनातलं, मनातलं
11 Jun 2017 - 9:50 pm

गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा..
.....................................................
अहो ऐकलत का?..
तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे...
कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?..
अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही..
विसरला का तुम्ही?
आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी..
अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो..
..........................................................
- २० मिनिटानंतर...
(गाडीमध्ये सागर व त्याची बायको..)
सागर.. तुम्हाला काही विचारु का?

कथाप्रेमकाव्यभाषासमाजविचारअनुभवभाषांतर

कुरकुरीत्/क्रिस्पी भेंडी:

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
11 Jun 2017 - 6:25 pm

वाढणी: ३ व्यक्तींसाठी

साहित्य: अर्धा किलो कोवळी भेंडी, १ टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२ टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.

कृती: पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच ठेवा.

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
11 Jun 2017 - 6:05 pm

हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार... ह्याच विचारसरणीत आपण अडकून तर पडलेलो नाही ना? 

मांडणीमत

मीच का ?

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जे न देखे रवी...
11 Jun 2017 - 1:50 pm

मीच का ओझे वाहावे ?
संस्कृतीचे सभ्यतेचे
पांढऱ्या कॉलरीत माझ्या
मीच का गोड बोलावे ?

मीच का पूजा करावी ?
मीच का वारी करावी ?
मीच का त्यांच्या चुकांना
पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा

मीच का साफ करावा
माझाच चष्मा हरघडी
त्यांनी चालावे रुबाबात
काळा चष्मा वापरोनी

मीच चोरटेपणाने
का पाहावे स्त्रीकडे
ते भोगुनीयाही तिला
लेऊनी घेती हारतुरे

मीच बांधलेला समाजी
मीच बाधलेला भिडेने
मीच छाती आत घेउनी
का चालावे घाबरोनी ?

कविता माझीकविता

मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही...

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
10 Jun 2017 - 11:39 pm

(मुळात मुलांचे लैंगिक शिक्षण कसे करावे?, त्याना हे शिक्षण कसे द्यावे? हे सांगण्याकरता हा लेख लिहिलेला नाही. ह्या एरवी अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी सर्वसामान्य पालकांचा आणि सरकारचाही दृष्टीकोन काय आहे आणि तो कसा असायला हवा?, का असायला हवा? हे सांगायचा हा प्रयत्न आहे. खरे पाहू जाता लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण ह्यात थोडा फरक आहे पण मुळात जेथे लैंगिक शिक्षण ह्या विषयी जबाबदारीने काही लिहिणे बोलणे कमी, त्यात ह्या दोनही गोष्टीतल्या फरकावर विस्तृत बोलणे म्हणजे विषयान्तराला आमंत्रण देणे ...मागे एकदा मी ‘ शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती.

धोरणविचार

चिरंजीव रॉक्स

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
10 Jun 2017 - 10:59 pm

संवाद (१)
“If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.”
- Carl Sagan
९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली.
३७ – तुला कळली?
९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल.
३७ – (!!) कार्ल सगान??

संस्कृतीविज्ञानव्यक्तिचित्रणविचार

अनवट किल्ले ११: वळणदार तटबंदीचा भुदरगड (Bhudargad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
10 Jun 2017 - 9:47 pm

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला पन्हाळा, विशाळगड असे महत्त्वाचे किल्ले आहेत. तर दक्षिण बाजूला रांगणा, सामानगड असे किल्ले आहेत. या दरम्यान होणार्‍या वाहतुकीवर आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच पन्हाळ्याच्या शिलाहार दुसर्‍या भोज राजाने एका सपाट पठारावर या दुर्गाची निर्मिती केली. शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला.