मेन्युकार्ड - लघुकथा

प्रतिक कुलकर्णी's picture
प्रतिक कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jun 2017 - 9:49 pm

नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं. लोक मात्र माझ्या शहरात होते तसेच होते. रंग, उंची, फारसा फरक नव्हता. मला जरा हायसं वाटलं. खूप मोठा प्रवास झाला होता, म्हणलं जरा श्वास घ्यावा. एका उपहारगृहात गेलो. कोपऱ्यातलं टेबल बघितलं, एका खुर्चीवर बॅग ठेवली, एका खुर्चीवर मी बसलो. सुरुवातीपासून शेवटपर्येंत मेन्यूकार्ड काळजीपूर्वक वाचून काढलं. पाकीट काढून पैसे किती आहेत बघितलं. वेटर आला.

कथालेख

मनालीतली मौज ...

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in भटकंती
22 Jun 2017 - 9:05 pm

मार्चनंतर उकाड्याचा तडाखा वाढु लागला.. आणी हिमालयाची शिखरे साद घालु लागली ..खरतर हिमालयातुन परततानाच परत कधी कुठे यायच त्याच प्लॅनिंग सुरु होत . पण लवकरच परतण्याच आश्वासन मनाला आणी हिमालयाला देउनच मी जड अंत:करणाने हिमालयाचा निरोप घेते.. यावेळेस काही फार मोठा प्लॅन नव्हता .गावात रहायचे, येथिल जीवनपध्द्ती जाणुन घ्यायची, निसर्गसहवासचे सुख उपभोगायचे, छोटामोठा ट्रेक करायचा . असे ठरउन निघाले ..कुलु-मनाली दरम्यान हायवेलगत अनेक छोटी छोटी गावे वसली आहेत. यातील बरिच युथ हॉस्टेल ट्रेक दरम्यान ओळखीची झाली आहेत. याखेपेस एका मैत्रीणीकडे धोबी गावात मुक्काम
केला

अंबा घाट- माहिती हवी आहे.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
22 Jun 2017 - 5:33 pm

पावसात २- ४ दिवस निवांत भटकायला अंतरजालावर कोल्हापुर - रत्नागिरी मार्गावरील अंबा घाटाविषयी वाचले.
हुल्लाड्बाज दारुड़े अणि गोंधळी पर्यटक यांच्या नजरेत हा भाग अजुन आला नाही असे वाटते.

शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
21 Jun 2017 - 5:55 pm

याआधीचे भाग येथे वाचता येतील :

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९

शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

हे ठिकाणलेख

वाघोबा वाघोबा किती वाजले

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जे न देखे रवी...
21 Jun 2017 - 3:03 pm

वाघोबा वाघोबा किती वाजले

वाघोबा वाघोबा किती वाजले,
पाऊस न येताच राजीनामे भिजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
भूकंपाच्या धमकीने हसू फुटले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
आदिलशहा* येताच शेपूट घातले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले|

वाघोबा वाघोबा किती वाजले,
बनियासमोर** लोटांगण घातले|

vidambanकाहीच्या काही कविताकविताविडंबन

झांबिया आणि केनिया - थरारक आणि जंगली!

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in भटकंती
21 Jun 2017 - 11:40 am

मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो.

कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे.

अर्ध्या तासाची आहे.

लिंक
https://youtu.be/hH_B7_NtvJ4

नजरोंको चुराकर वो...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Jun 2017 - 4:00 am

नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं
कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं

मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो
ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं

जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है
शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं

इनकार तो था लेकिन,नजरें वो झुकायें थे
ये दौर है दुनियाका..पलभरमें बदलते हैं

इन फूलोंकि दुनियामें,हम 'भंवरे' के मानिंद
इस फूलसे निकले तो,उस फूल पे चलते हैं

—भंवर गुनगुन

(हिन्दीतील माझा पहिला प्रयत्न!)

gajhalgazalकवितागझल

पिझ्झा.. बेस, सॉस.. सगळं काही शुन्यापासून

सही रे सई's picture
सही रे सई in पाककृती
21 Jun 2017 - 1:28 am

अमेरिका म्हणलं की बाकी बर्‍याच गोष्टींबरोबर डोळ्यासमोर येतो तो पिझ्झा. इकडे आल्यावर तो दिवस उजाडलाच कि ज्या दिवशी थोडा उत्साह पण होता, हाताशी वेळ पण होता आणि डोक्यात पिझ्झा करावा तोही कणिक मळून बेस करण्यापासून असा विचार पण घोळत होता. झालं, ठरलं आणि मी पिझ्झा कृती शोधायला सुरुवात केली. पिझ्झा करताना तो गव्हाच्या पिठाचा करावा असा कधीचाच विचार केला होता. त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. पण मग शंकेखोर मनाने उचल खाल्ली आणि वाटलं पूर्ण प्रयोग फसला तर. नकोच ते. त्यापेक्षा थोडा तरी मैदा वापरू. पण तशी पाकृ कुठे सापडेना. मग मैद्याच्या आणि पूर्ण गव्हाच्या पिझ्झा कृतीचा अभ्यास करून माझ मीच थोडं प्रमाण बदललं आणि पिझ्झा बनवला. तर असा तो पिझ्झा ज्याची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी खाली दिली आहे.