इंदिराबाई

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
26 Sep 2017 - 2:54 pm

इंदिराबाई

काँग्रेस पक्षातली सचोटी नेहरु आणि लालबहादूर शास्त्री यांच्यापर्यंत टिकून होती. इंदिरा गांधींच्या काळात त्याला ओहोटी लागली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर सुरू झाला. इंदिराबाईंनी पक्षातल्याही अनेक जणांचा राजकीय खातमा केला. पक्षाने ठरवलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हरवून आपला उमेदवार निवडून आणण्याची कामगिरीही बाईंनी करून दाखवली.

मांडणीप्रकटन

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
26 Sep 2017 - 1:07 pm

भाग २

ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

अर्थकारणविचार

घरा कडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती (भाग पहिला)

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
26 Sep 2017 - 12:00 pm

घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती!
भाग १

देवीची शेजारती

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
25 Sep 2017 - 12:55 pm

|| देवीची शेजारती ||

नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची
अंबे शेज फुलांची
पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.||

पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती
अंबे नवविधा भक्ती |
ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ ||

षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो
अंबे वारा घालितो |
पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ ||

दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला
अंबे नाजूकसा शेला |
सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३||

कविता

बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
25 Sep 2017 - 10:42 am

बुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.

मुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.

अर्थकारणविचार

मी माझे तारांगण सादर करतो

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
25 Sep 2017 - 9:46 am

कोण कुठे कोणाचा आदर करतो
पाठीवरती वार बिरादर करतो

प्याद्याला आदेश रणाचा देतो
नि तिथुनी घुमजाव बहादर करतो

गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर
देवाचे रक्षण जमगादर करतो

तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी
मी अवघ्या देहाची चादर करतो

आळ नको घेऊ, झाडाझडती घे
(मी माझे तारांगण सादर करतो)

देव दयाळू आहे कळल्यापासुन
रोज नवे कन्फेशन फादर करतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalहे ठिकाणकवितागझल

भ्रम

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
25 Sep 2017 - 3:05 am

पंधराच दिवसांपूर्वी मला अशोक ह्याच शहरात असल्याचं समजलं होतं . तेव्हापासून आज भेटेन उद्या भेटेन अशी चालढकल चालली होती , नक्की दिवस ठरत नव्हता . तोही बेटा बिझी . त्यामुळे भेट पुढे पुढे जात होती . अशोक माझा लहानपणीचा मित्र . माझ्याहून 2 वर्षांनी मोठा होता . काही वर्षं आम्ही शेजारी राहत होतो , त्यानंतर त्याच्या वडिलांची बदली झाली आणि तो बंगलोरला गेला , मी माझ्या कॉलेजच्या नवलाईत हरवून गेलो , तो त्याच्या शिक्षणात . फारसा संपर्क असा ठेवला गेला नाही , कधीमधी फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच . पुढे त्याने सायकॉलॉजी विषय निवडला , मी कॉमर्स मधल्या डिग्र्यांच्या मागे लागलो .

कथाप्रकटन

डंकर्क... भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Sep 2017 - 10:51 pm

डंकर्क भाग -२
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिटलर त्याच्या जनरल बरोबर चर्चा करताना. सर्व जनरल्स..कायटेल, फॉन बॉक व गुडेरियन

kathaaलेख