मी माझे तारांगण सादर करतो

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
25 Sep 2017 - 9:46 am

कोण कुठे कोणाचा आदर करतो
पाठीवरती वार बिरादर करतो

प्याद्याला आदेश रणाचा देतो
नि तिथुनी घुमजाव बहादर करतो

गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर
देवाचे रक्षण जमगादर करतो

तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी
मी अवघ्या देहाची चादर करतो

आळ नको घेऊ, झाडाझडती घे
(मी माझे तारांगण सादर करतो)

देव दयाळू आहे कळल्यापासुन
रोज नवे कन्फेशन फादर करतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalहे ठिकाणकवितागझल

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

27 Sep 2017 - 8:14 am | जयंत कुलकर्णी

आवडली.

घेउन अर्ज दयेचा या मशिदीत जरी मी आलो,
तुझी शपथ, प्रार्थना करण्यास नाही आलो
चोरून प्रार्थनेची मी नेली इथली सतरंजी,
झिजली माझ्या पापांनी, बदलावी म्हणुनी आलो.
- ओमर खय्याम

drsunilahirrao's picture

5 Oct 2017 - 8:35 pm | drsunilahirrao

धन्यवाद सर !

अनुप ढेरे's picture

11 Oct 2017 - 9:25 am | अनुप ढेरे

छान आहे कविता. आवडली!