डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग २
चंदिगढ ला भीमसिंग ने आम्हाला वेलकम केले . तिथून पुढे सुरु झाला आमचा सांगला पर्यंतचा प्रवास गाडीने . साधारणपणे १० तासाचा प्रवास आहे . पण आम्ही पूर्ण प्रवास एका दिवशी न करता मध्ये एक रात्र नारकंदाला विश्रांती घेऊन केला . चंदिगढ ते सांगला हे अंतर साधारण ३३५ किमी आहे . दिसायला हे अंतर कमी दिसलं तरी जास्तीत जास्त प्रवास हा अवघड वळणे आणि अरुंद आणि कठीण अशा घाटातून असल्याने प्रवासाला वेळ लागतो . आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या या लांबलचक प्रवासाला सुरवात झाली . भीमसिंगअतिशय व्यवस्थितपणे , कोणत्याही नियमांचे उल्लंघन ना करता गाडी चालवत होता . एकीकडे आम्हीच त्याच्याशी गप्पा सुरु केल्या .
माचू पिक्चू - भाग ५
एक कागद
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
ते...
ते हायेत आपलेचं
असं समजुनं वागलो
केला इस्वासं म्हनून
असे भिकीले लागलो
फोळं ये लोक हाताले
असं दयन दयलं
पिठं भरुन नेतानी
आमी त्याईले पायलं
ताट आमच्या नावाचं
सफा त्याईनच केलं
खाली सांडलं खर्कटं
तेई सावळूनं नेलं
तेल घालून डोयात
केलं पीकाच राखन
देठा लांबोला त्याईनं
ठुली आमाले आकन
शिसी बसले ते आता
जीव काताऊनं गेला
हेला पखाली चा शेवटी
पानी वाहू वाहू मेला
सिंगापूरचा दरवाजा
नाव वाचून तुमच्या डोक्यात आलं असेल ते हे सिंगापूर नाहीये. हे कुठलं परदेशातलं सिंगापूर नसून आपल्याच देशातलं, आपल्याच मातीतलं, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात वसलेलं एक लहानसं ठिकाण आहे. पुण्या पासून 90 एक किमी अंतरावर, तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं वेल्हा गावच्या परिसरात हे सिंगापूर वसलंय.
ट्रेकिंग मध्ये सक्रिय असलेल्या मंडळींना या गावाची चांगलीच ओळख असेल. 'लिंगाणा' ट्रेक साठी जाताना सिंगापूर हे छोटेखानी वस्ती असलेलं गाव लागतं.
संधी मराठीबोलींच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची
राज्य मराठी विकास संस्थेचे प्र. संचालक प्रा. श्री. आनंद काटिकर सरांनी सोशल मिडियावरुन फॉर्वर्ड केलेला संदेश त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे :
"भाषेत रस असलेल्या सर्वांना अर्ज करायला सांगा. उत्तम प्रशिक्षण विद्यावेतनासह आहे. त्यातील निवडकजणांना पुढील संशोधनासाठी ३ वर्षे निवडले जाण्याची शक्यता आहे. एम. ए. मराठीस विशेष प्राधान्य "
अधिक माहिती डेक्कन कॉलेजच्या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन’ जाहिरात / दुव्यावर आहे.
ती त्सुनामी...
सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते
प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते
....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !
हिवाळी भटकंती: सरसगड ( Sarasgad )
अष्टविनायकाची यात्रा तशी महाराष्ट्रात लोकप्रिय. यापैकी पालीचा बल्लालेश्वर हे महत्वाचे ठिकाण, कारण या ठिकाणी मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची चांगली सोय असल्याने, बहुतेकजण पालीला मुक्काम करता येईल अश्या पध्दतीने या यात्रेचे नियोजन करतात. खोपोलीकडून पालीला निघाले, कि पाली येण्याच्या आधी एक सुळका आकाशाकडे झेपावलेला पहायला मिळतो, पाली गावाच्या मागे तर एखाद्या भिंतीसारखा तो उभा आहे. सर्वसामान्य पर्यटक आणि भाविक मोठ्या कुतुहलाने त्याचे हे रौद्र रुप पहातात आणि तिथूनच त्याचा निरोप घेतात.