माचू पिक्चू - भाग ६

Primary tabs

उदय's picture
उदय in भटकंती
29 Nov 2017 - 9:36 am

भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६

फोटो: अपूर्ण मंदिर
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: इथे वरती वेगवेगळी झाडे/वनस्पती आहेत जी इंका लोक वापरत असत. कोकाची पाने ते वेदनशामक म्हणून वापरत असत.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Intihuatana सनडायल
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पवित्र दगड (Sacred Rock) हा एकच मोठा दगड आहे आणि तो पवित्र मानला जातो. बरोबर मागे जसा पर्वत दिसतो, तसाच ह्याचा आकार दिला आहे.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: वॉटर मिरर. आकाशातील तारे इंकाज थेट न बघता त्यांचे प्रतिबिंब ते इथे बघत असत.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor (दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) याचे मंदिर. Condor ला पुढील जन्माचे प्रतीक समजतात.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor याचे मंदिर २
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: Condor याचे मंदिर ३. यात पक्षाचा डोळा आणि चोच स्पष्ट दिसत आहे.
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: हुआना पिक्चू
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पॅनोरमा
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: पॅनोरमा २. मागे हुआना पिक्चू
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: इंका लोकांचे ३ देव Condor, Puma, Snake दाखवणारा पुतळा (Agues Calintes इथे)
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

ट्रेल संपवून खाली Agues Calintes गावात आलो आणि मस्तपैकी पिस्को सावर आणि बियरचा आस्वाद घेतला.

फोटो: पिस्को सावर
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

मी काही इंका लोकांसारखा पिल्ग्रिमेजसाठी गेलो न्हवतो, पण मला स्वतःलाच जरा स्वतःचा फिटनेस बघायचा होता, थोडे आत्मपरीक्षण करायचे होते, आरामाच्या कोशातून जरा बाहेर पडायचे होते. आणि इंका ट्रेल हा माझ्या बकेटलिस्टवर बरेच वर्ष होता. त्यामुळे हा प्रवास शारिरीकदृष्ट्या त्रासदायक होता, पण अतिशय समाधान देणारा होता आणि त्या आठवणी मला आयुष्यभर साथ देणार्‍या आहेत.

फोटो: हे माझे सन्मान पदक (Medal of Honor)
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

फोटो: स्मरणिका (Souvenir) टी शर्ट. I survived the Inca Trail !!
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

माचू पिक्चूला जायला मला ट्रेनचा पर्याय होता किंवा दुसरा पर्याय इंका ट्रेलचा पण होता. मला बर्‍याच जणांनी सांगितले होते की कशाला इतकी कटकट करून चालत जातोस? आरामात ट्रेनने जा. पण शेवटी वाटले तेच केले. रॉबर्ट फ्रॉस्ट्ने त्याच्या कवितेत हे अगदी अचूक मांडले आहे.

The Road Not Taken

TWO roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth; 5

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same, 10

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back. 15

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

(समाप्त)

प्रतिक्रिया

संग्राम's picture

29 Nov 2017 - 10:08 am | संग्राम

_/\_

अतिशय झकास झाली ही लेखमाला. आता माचूपिक्चूचा ट्रेल आमच्याही बकेटलिष्टात ऍडला आहे. धन्यवाद!

अमित लिगम's picture

29 Nov 2017 - 10:27 am | अमित लिगम

_/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2017 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला !

माचू पिक्चूला रेल्वेने आणि पायी जाता येते हे माहीत होते. पण, पायवाट इतकी खडतर आहे हे माहीत नव्हते ! आता माचू पिक्चू भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत बरेच वर सरकले आहे ! :)

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2017 - 3:55 pm | टवाळ कार्टा

जब्राट

खूप मस्त झाली ही लेखमाला. या भागातील पॅनोरमा फोटो विशेष आवडले. माचू पिक्चूला कधी जाणं होईल कुणास ठाऊक, पण ही व्हर्चुअल सफर आवडली.

रुस्तम's picture

30 Nov 2017 - 1:18 am | रुस्तम

_/\_

समर्पक's picture

30 Nov 2017 - 6:17 am | समर्पक

सगळे भाग आज वाचले. मस्त अनुभव आणि चित्रे...

प्रचेतस's picture

30 Nov 2017 - 6:56 am | प्रचेतस

खूप भारी झाली ही मालिका.
इन्का लोकांनी लिहिलेले शिलालेख अस्तित्वात आहेत का?

इंकांची भाषा लिखित नव्हती आणि शिक्षणातही पाठांतरावर भर असे, असं वाचलं होतं. कर आकारणी सारखे आकडे वगैरे साठवायला धाग्यांना गाठी मारून ते धागे एकत्र बांधून ठेवत.

होय. इंकांची भाषा केचुआ होती जी फक्त बोलीभाषा आहे, त्यामुळे शिलालेख वगैरे प्रकार दिसले नाहीत. अजूनही ३७% पेरुमध्ये, विशेषतः देशाच्या अंतर्गत भागात अजूनही ही भाषा बोलली जाते, असे गाईडने सांगितले, पण हळूहळू ही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

अभिजीत अवलिया's picture

30 Nov 2017 - 9:19 am | अभिजीत अवलिया

चांगले झाले प्रवास वर्णन. बघू कधी जायचा योग येतोय का.

फोटो वर्णनासह उत्तम लेखमालिका.

उदय's picture

1 Dec 2017 - 1:12 am | उदय

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. तुम्हाला ही लेखमालिका आवडली हे वाचून छान वाटले. इंका ट्रेल केला नाही तरी माचू पिक्चूला आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या.

मस्त! छान झाली लेखमाला.

किल्लेदार's picture

2 Dec 2017 - 1:04 am | किल्लेदार

__/\__....