चुकले...

अजब's picture
अजब in जे न देखे रवी...
2 Dec 2017 - 10:30 am

गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले
निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले
दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले
किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले
घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले
तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले
बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले
इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

कविता

राजाची नियत

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 7:52 am

राजाची नियत
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.

धोरणमांडणीवावरकथासाहित्यिकसमाजजीवनमानअर्थव्यवहारप्रकटनविचार

किक !!!

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
2 Dec 2017 - 12:37 am

"किक" कोणाला कशातून,केव्हा आणि किती मिळेल याचं "तार्किक" विश्लेषण करणं जरा अवघडच आहे. रोजच्या आहाराप्रमाणेच या किकचा लागणारा खुराक देखील व्यक्तिसापेक्ष असतो. रोजच्या आहारातली कमतरता भरून काढायला जशी बाजारात व्हिटॅमिन सप्लिमेंट्स मिळतात तशी काही यासाठी उपलब्ध नाहीत . हे "किक" जीवनसत्व ज्याचे त्यालाच शोधावे लागते. हाच वार्षिक खुराक पूर्ण करण्यासाठी किक च्या शोधात रॉलीला किक मारतो आणि कुठल्यातरी प्रवासाला निघतो.

डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग ३

मालविका's picture
मालविका in भटकंती
1 Dec 2017 - 9:40 pm

असाच सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललो होतो आणि एका वळणार आम्हाला सतलज नदीचं दर्शन झालं. खूपच छान वाटलं ते पाहून. नदीच पात्र चांगलेच रुंद होतं. आणि पाणी फारच उथळ होत. आम्ही एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथून नदी अगदीच जवळ दिसत होती. नदीचा खळखळाट चांगलाच जाणवत होता. सतलज नदीत रिव्हर राफ्टिंग सारखे गेम्स चालतात अशी माहिती ड्राइवरने दिली. पण आम्ही जिथे जाणारा होतो तिथे हि सोय नव्हती. आम्ही सतलज एका कडेला ठेवून तिच्या बाजूने प्रवास सुरु केला. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली आणि गावं लांबच्या लांब पसरलेली दिसत होती. गावात कधी कधी मोजकीच घरं लगत होती. पण एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला.

अनवट किल्ले २३: फारुकी राजवटीचा "थाळनेर" ( Thalner )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
1 Dec 2017 - 6:36 pm

महाराष्ट्राचा ईतिहास आभ्यासताना आपल्याला सातवाहनांपासून ते यादवांची कारकिर्द माहिती असते. बहामनी कालखंड व त्याची शकले झाल्यावर निजामशाही, आदिलशाही, ईमादशाही यांनी महाराष्ट्राच्या विशिष्ट भुप्रदेशावर कसे राज्य केले ते ही ज्ञात असते. पण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाकडच्या प्रदेशात म्हणजे खानदेशात फारुकी राजवट नांदली याचा थांगपत्ता नसतो. थाळनेरच्या भुईकोटाच्या धाग्यात आपण हि माहिती घेउ व ईतिहासाचे एक नवे पान उलटूया. सध्या खानदेश म्हणले कि नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा क.स.मा.दे. (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ) हा परिसर येतो.

Being ALONE n not LONELY!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
1 Dec 2017 - 6:00 pm

एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील.

मांडणीविचार

लोक

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
1 Dec 2017 - 3:18 pm

सखी तिचे गुपित माझ्यासमोर उघड करते
तिने मुलांवर टाकलेल्या जाळांचे हिशोब देते
प्रसंगावर या मला खळखळून हसायचे होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते.

नजरेने त्याच्या माझे काळीज चिरत होते
वासनांचे कैवारी माझ्या पुढ्यातच बसले होते
शिव्यांच्या लाखोलीसाठी अोठ अधिर झाले होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते

"त्यास" आज मी अखेरचे न्याहळत होते
डोळ्यात त्याच्या माझा भुतकाळ पहात होते
मिठित त्याच्या आजतरी पोटभर रडायचे होते
पण बाजुला माझ्या लोक उभे होते.

नजरेतच सारे..

समयांत's picture
समयांत in जे न देखे रवी...
1 Dec 2017 - 2:34 pm

तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही.
तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो.
तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही.
कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत.
तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते.
माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

प्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितामुक्तक