मराठी अनुवादः आज हंसो हंसो जल्दी हंसो - रघुवीर सहाय
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रघुवीर सहाय यांची ही कविता.
आज हसा, हसा लवकर हसा
हसा तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत
हसा स्वतःवर नका हसू कारण त्यातला कडवटपणा पकडला जाइल
आणि तुम्ही फुकट मराल
असं हसा की खूप जास्त आनंदी आहात असं वाटायला नको
नाहीतर संशय घेतील का ह्या माणसाला लाजलज्जा बिल्कूल नाही
आणि फुकट मराल