६३ गुणांचा योग +योग

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 9:47 pm

याला योगायोगच म्हणातात ना! नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी योग दिवस साजरा केला. नमोजींची छाती ५६ इंचां पासून ७२ इंचाची झाली असेल. कदाचित् या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला. नमो सारखे योग करणे अस्मादिकांना तरी शक्य होणार नाही.

कथालेख

तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 8:41 pm

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.

जीवनमान

अथांग

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 2:25 pm

IMG_2394

समुद्र..

त्याच्या नुसत्या आठवणीनेही जीवाला थंडावा मिळतो, कानांत लाटांची गाज घुमायला लागते, मग लगोलग एखादा
समुद्रकिनारा गाठण्याची, त्याला डोळे भरून पाहण्याची, मन भरून भेटण्याची अनावर ओढ लागते ..

मुक्तकप्रकटन

मिपा लंडन कट्टा- ग्रिनीच

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 3:11 am

मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला
एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात.
कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्‍हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले.

वावरआस्वाद

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 11:22 pm

णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

हे ठिकाणमांडणीसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविरंगुळा

उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 4:01 pm

पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट.

सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर".

कलाप्रकटन

वादळ

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 3:52 pm

वादळ आल्यावर सगळेच उघडे पडले.
कागदी मुखवटे तर लागलीच उडाले.
वाटले आता खरे चेहरे दिसतील.
डोळ्यातील धूळ झटकल्यावर मात्र,
दिसले नागडे सत्य .
वादळाने मुखवट्या बरोबरच
चेहरे देखील ओरबाडून नेले होते
.........
समोर उभ्या होत्या अमानवी कवट्या
अजूनही स्वत:ला माणूस म्हणवणाऱ्या!
...........
...........
मी देखील त्यांतच होतो काय?
हे कळणे शक्यच नव्हते!
माणसांनी सगळे आरसे
वादळाआधीच
फोडून टाकले होते....
....

वावरप्रकटन

बंद पडलं..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Jun 2016 - 3:43 pm

बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या
प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या!

गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही
डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!"

सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.
"काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. "

येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.
लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.

अदभूतआगोबाकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीटका उवाचफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीकविताबालगीतमौजमजा