बंद पडलं..

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Jun 2016 - 3:43 pm

बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या
प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या!

गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही
डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!"

सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.
"काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. "

येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.
लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.

कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू?
कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )
हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif करून अता, त्याला मी उठवनार
पुन्हा थांबे पर्यंत , मग बुंगाट सुटवनार http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif

अदभूतआगोबाकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीटका उवाचफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीकविताबालगीतमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Jun 2016 - 3:46 pm | प्रचेतस

=))
वयनी माहेरी गेली वाट्टं.

गुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल असतंय त्यो पण बडवलेला. खोंड असलं तर उधळतंय, बडवल कि नुसती चाकोरी हो.

ते कवीचं कल्पनास्वातंत्र्य समजावं.

का वास्तवातली स्वातंत्र्यहरण झाल्याची खंत???

प्रचेतस's picture

22 Jun 2016 - 4:01 pm | प्रचेतस

दोन्ही असावं.

मग वल्ल्या, घ्यायचा का सूड? उठवायचा का वासराचा बाजार?
;)

प्रचेतस's picture

22 Jun 2016 - 4:20 pm | प्रचेतस

घेऊ की. =))

जेपी's picture

22 Jun 2016 - 3:49 pm | जेपी

=))

काव्यरस-
आगोबा,
टका उवाच...=))=))=))

अता, त्याला मी उठवनार

बघा, काय जमतंय तसं करा.

गणामास्तर's picture

22 Jun 2016 - 3:53 pm | गणामास्तर

=)) =)) =))

धनंजय माने's picture

22 Jun 2016 - 3:56 pm | धनंजय माने

कैच्या कै जिल्बी....

बुवा बदलला! दुत्त दुत्त

काव्यरस तांब्या भरून वरती फसफसतोय अगदी !
बाकी, 'आगोबा' आणि 'टका-उवाच' यांना काव्यरसात स्थाण मिळालेले पाहून अंह झाल्या गेले आहे.

प्रचेतस's picture

22 Jun 2016 - 4:01 pm | प्रचेतस

चौरागढ पण आहे =))

अता 'नाखुनअंकल' असा काव्यरस आला की मी डोळे मिटायला मोकळा.

चौकटराजा's picture

22 Jun 2016 - 4:27 pm | चौकटराजा

डोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2016 - 4:35 pm | टवाळ कार्टा

बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे ??

तसे असेल तर भावविश्वही पुढे सरकायला हर्कत नसावी =))

अरे वा पुढं सरकायला लागला का?
बावविशव उभा राह्यला, आमी नाय पायला.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2016 - 4:01 pm | टवाळ कार्टा

आरारा....लैच मोकाट...बेक्कार हसलोय...म्च गुर्जी इज ब्याक

नाखु's picture

22 Jun 2016 - 4:22 pm | नाखु

वा"सरां"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास !!
ते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यात येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून).

खुलाश्या नाखु अगोबागावकर

नीलमोहर's picture

22 Jun 2016 - 4:09 pm | नीलमोहर

तरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं,
ती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती.
मस्त हो गुर्जी !!

सतिश गावडे's picture

22 Jun 2016 - 4:20 pm | सतिश गावडे

>> हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून अता, त्याला मी उठवनार
=))

यशोधरा's picture

22 Jun 2016 - 4:26 pm | यशोधरा

=))

किसन शिंदे's picture

22 Jun 2016 - 4:47 pm | किसन शिंदे

=)) येऊंद्या अजून

चांदणे संदीप's picture

22 Jun 2016 - 4:51 pm | चांदणे संदीप

एका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे...

असो, गुर्जी वेल्काम ब्याक!

(लायनीतला)
Sandy

प्रमोद देर्देकर's picture

22 Jun 2016 - 4:53 pm | प्रमोद देर्देकर

माई मोड ऑन,

काहीतरी कानावर आदळले.

बघु कोण ते ?

1

अगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास ?
खरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते.

माई मोड ऑफ

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2016 - 5:04 pm | टवाळ कार्टा

आरारा...

धनंजय माने's picture

22 Jun 2016 - 5:29 pm | धनंजय माने

या माई असल्या तर नानांची मौज आहे. ;)

बाकी मान सारखी झटकु नकोस माई, मॉडेल आपलं मोडेल.

५० फक्त's picture

22 Jun 2016 - 5:32 pm | ५० फक्त

वासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना..

तांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.

=))))
किती दुदुदु प्रतिसाद!

गुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की.

बंद पडलंsssग बंद पडलंsssग
परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग
हे गुर्हालात ग तांब्याsss हरवला
ख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल

बंद पडलंsssग बंद पडलंsssग

चारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना
डिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही

बंद पडलंsssग बंद पडलंsssग

सोडलया माळावर, पर येतंया फिरुन
काही करना, बसतय काड्याsss चघलून
गोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं
काढली डायरी, पर दाव्याला ते आडल
बंद पडलंsssग बंद पडलंsssग

कस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू?
कैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू??? दुत्त दुत्त! हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार
हे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार

बंद पडलंsssग बंद पडलंsssग
परतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2016 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही!

वासराच्या पाठीवर बसून चाललेले बगळे ,कावळे पाहून हसतोय.

जव्हेरगंज's picture

22 Jun 2016 - 6:03 pm | जव्हेरगंज

काय पण जिल्बी , कै च्या कै

बुवा स्टाईल हीच काय!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2016 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

जव्हेरगंज's picture

22 Jun 2016 - 6:04 pm | जव्हेरगंज

काय पण जिल्बी , कै च्या कै

बुवा स्टाईल हीच काय!!!!

पद्मावति's picture

22 Jun 2016 - 6:08 pm | पद्मावति

=)) सही कवीता आहे.

नूतन सावंत's picture

22 Jun 2016 - 6:26 pm | नूतन सावंत

बुवा परत आले.

रेवती's picture

22 Jun 2016 - 6:29 pm | रेवती

हा हा हा..........
काय ही अवस्था हो गुर्जी!

मोहनराव's picture

22 Jun 2016 - 6:49 pm | मोहनराव

आलं गुर्जी आलं.. मिपाला गहीवरुन आलं....

पगला गजोधर's picture

22 Jun 2016 - 6:54 pm | पगला गजोधर

कुण्या एकेकाळचं, गुर्जींचं सैराटमय प्रतिभेचे हे वासरू ....

cow

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2016 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =))

पैसा's picture

23 Jun 2016 - 10:44 am | पैसा

=))