वादळ
वादळ आल्यावर सगळेच उघडे पडले.
कागदी मुखवटे तर लागलीच उडाले.
वाटले आता खरे चेहरे दिसतील.
डोळ्यातील धूळ झटकल्यावर मात्र,
दिसले नागडे सत्य .
वादळाने मुखवट्या बरोबरच
चेहरे देखील ओरबाडून नेले होते
.........
समोर उभ्या होत्या अमानवी कवट्या
अजूनही स्वत:ला माणूस म्हणवणाऱ्या!
...........
...........
मी देखील त्यांतच होतो काय?
हे कळणे शक्यच नव्हते!
माणसांनी सगळे आरसे
वादळाआधीच
फोडून टाकले होते....
....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा: मस्त जमलीय !!!
सही!!
बेस्ट!!
छान !
सुंदर