मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

सुंड्या's picture
सुंड्या in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 12:03 am

रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं-

उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब,
चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब

जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है,
तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब

गझलआस्वादअनुभव

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
27 Jul 2016 - 3:55 pm

पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.

समाजविरंगुळा

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
27 Jul 2016 - 1:11 pm

दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.

संस्कृतीइतिहासवाङ्मयविचारआस्वाद

एक्सेल एक्सेल - भाग ११ - कस्टमाइझिंग चार्ट्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
27 Jul 2016 - 12:53 pm

जागली स्पंदने नवी नवी

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
27 Jul 2016 - 12:02 pm

आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.

बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले. हौशी आणि बरा आवाज असणाऱ्या कुणीतरी या गीताला आवाज देऊन मराठी रोम्याँतिक गाण्याच्या दुनियेत अजरामर करावे ही विनंती आणि समीरसूर यांना ते सकाळ दुपार संध्याकाळ मात्रेसारखे ऐकवन्यात यावे ही विनंती.

सॉफ्ट कोरस:

इशाराकविताप्रेमकाव्यशब्दक्रीडा

बौद्धधर्मप्रसारक... भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Jul 2016 - 10:45 am

फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१

धर्मइतिहासलेख

नाते

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
26 Jul 2016 - 11:35 pm

शब्दांच्या पलीकडचे
जे नाते जुळले होते
आदी असे न अंत तयाला
ते कालातीत होते

जुळले म्हणून होते म्हणू
की होते म्हणून जुळले?
प्रवाह होते नाते की ते
अथांग सागर होते?

पृथ्वीच्या गर्भातील अंकुर
आकाशी भिडणारे पाखुर
फुलातील मकरंद असे की
प्रेमातील एक युगुल?

ते आहे जोवर अर्थ जीवना
जरी असे ते पलीकडले
नाते जुळता शब्द थिटे अन्
भावनाच खरी मज भासे!

-------------

कविता माझीकविता

आज मिपावर पहिल्यांदाच पोस्ट करत आहे .

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
26 Jul 2016 - 10:25 pm

नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं .

वावरप्रकटन