शब्दांच्या पलीकडचे
जे नाते जुळले होते
आदी असे न अंत तयाला
ते कालातीत होते
जुळले म्हणून होते म्हणू
की होते म्हणून जुळले?
प्रवाह होते नाते की ते
अथांग सागर होते?
पृथ्वीच्या गर्भातील अंकुर
आकाशी भिडणारे पाखुर
फुलातील मकरंद असे की
प्रेमातील एक युगुल?
ते आहे जोवर अर्थ जीवना
जरी असे ते पलीकडले
नाते जुळता शब्द थिटे अन्
भावनाच खरी मज भासे!
-------------
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1416
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अय्या , किती गोडं लिहिलं आहेस
ग-ग्यांगबद्दल काही बोलू नकोस
In reply to अय्या , किती गोडं लिहिलं आहेस by प्रसाद गोडबोले
आमचेही नाते...
पैजारबुवांनी
In reply to आमचेही नाते... by ज्ञानोबाचे पैजार
मस्त आहे!