आम्ही बाजींच्या लेकी

दिपाली पोटे's picture
दिपाली पोटे in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 4:32 pm

हुश्श. दररोजची माझी सीट पकडली आजपण. समोरची ओळखीचे हसली. तसे तिचे तिरकस हसणे सोडून तिच्या बद्दल मला काहीच माहित नाही मात्र सकाळी तिचे दर्शन नाही झाले तर दिवसाची चांगली सुरुवात होत नाही असा माझा वेडा समज आहे. नवरा, सासू, आई आणि दररोजची ट्रेन मधली सखी साऱ्यांना फोन लावून सगळे ठीक आहे तपासून घेतले. शांत होते कुठे ते पुढचे स्टेशन आले. आणि दुसरी फौज चढली ट्रेन मध्ये. कोण कुठे उतरणार चौकशी करून आपापल्या सीट राखून ठेवल्या. मग पुढचे स्टेशन आणि तिसरी फौज, आणि अशा ट्रेन मध्ये फौजा चढू लागल्या आणि उतरू हि लागल्या.

वावरप्रकटन

मंटोच्या लघु कथा १ : घाटे का सौदा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 12:41 pm

सआदत हसन मंटो साहित्यातलं असं एक वादळ होतं, ज्याने तत्कालीन समाजाला मुळापासून हादरवून सोडलं. त्याने ५० वर्षांपूर्वी जे लिखाण केलंय ते आजही लागू होतं यातच त्याच्या लिखाणाची प्रगल्भता दिसून येते. आपल्या उण्यापुऱ्या ४२ वर्ष, आठ महिने आणि ७ दिवसांच्या आयुष्यात त्याला लिहायला फक्त १९ वर्षे मिळाली आणि या एकोणवीस वर्षात त्याने २३० कथा, ६७ रेडियो नाटकं, २२ शब्दचित्र आणि ७० लेख लिहलेत. साम्यवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या मंटोला आपल्या लिखाणामुळे कित्येकदा कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. इथे मी मंटोच्या लघुकथांचं अनुवाद करणार आहे. आजची कथा आहे,

हे ठिकाणभाषांतर

शेम्बुड आख्यान

इल्यूमिनाटस's picture
इल्यूमिनाटस in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 8:51 am

शाळेतला एक प्रसंग आठवला. आता या प्रसंगातून सात्विक बोध घ्यावा असे काही नाही आणि ही गोष्ट फार कौतुकाने सांगावी अशातला ही भाग नाही (नावावरून स्पष्ट च आहे!) तरी विरंगुळा म्हणून लिहितो आहे.

वैधानिक इशारा- मन कणखर करा, कारण गोष्टीत बराच शेम्बुड आहे!

विनोदमौजमजाअनुभवविरंगुळा

झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Aug 2016 - 11:11 pm

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||१||

अभय-काव्यअभय-लेखनकविता माझीलावणीवाङ्मयशेतीशृंगारकविता

भुंकला

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Aug 2016 - 11:09 pm

गेल्या वर्षी याच दिवसांत लिहीलेलं हे विडंबन. केवळ असावं म्हणून प्रकाशित करतोय. (चांगलं नाही हे माहित असूनसुद्धा).

इशारा : हे लिखाण 'छी बाबा' प्रकारात मोडणारे असून न वाचलेलेच बरे.

..................................................................

शेकड्यातील एकेकास...

मी एक ढेल्या नावाचा कुत्रा आहे. माझ्याकडे उदाहरणार्थ एक चांगली लांबसडक शेपटी आहे. बाकी सांगण्यासारखं विशेष असं काही नाही.
आपलं नाक सारख गळतं, आणि पाठीला मी सारखा पंज्याने खाजवतो. यापलिकडे स्वतःचं असं काही वैयक्तिक मी सांगणार नाही, कारण ते तर माझ्या पट्ट्यालासुद्धा ठाऊक आहे.

विडंबन

बेधुंद (भाग : १७ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
28 Aug 2016 - 10:13 pm

सुऱ्याचे दिवस आनंदात 'न्हाऊन' सरत होते . स्वप्नातही त्याने त्याला पियासारखी 'गर्लफ्रेंड' मिळेल असा विचार केला नव्हता. स्वर्ग जर कुठे असेल तर इथेच - पियाच्या मिठीत ! अजून २ वेळा तरी त्याला पियाला भेटता येणार होते , त्याचे दिवसरात्र पियाच्या 'गरम' श्वासांच्या आठवणीत जात होते - स्वर्ग कुठे असेल तर इथेच !

कथाविरंगुळा

फाळणीच्या कथा 2 : हमारा देश

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
28 Aug 2016 - 8:36 pm

मूळ उर्दू कथा : इब्ने इंशा
________________________________
इराण मध्ये कोण राहतात ??
इराण मध्ये इराणी लोक राहतात

इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ??
इंग्लिस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात.

फ्रान्स मध्ये कोण राहते ??
फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात!!!

हा कोणता देश आहे ??
हा पाकिस्तान आहे !!!

इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ??
नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!!

इथे सिंधी राहतात !!!
इथे पंजाबी राहतात !!!
इथे बंगाली राहतात !!!

इथे हे लोक राहतात, इथे ते लोक राहतात

कथाभाषांतर