दिवाळी अंक २०१६
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.
आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.
प्रवास
शरीराने तो बसला होता खडकावर...
पण मन कुठेतरी भूतकाळात रमलं होतं...
"भें**, कुछ नही होता यार एन सी सी एंट्री से. आना है फौज में तो युपीएससी क्लिअर करो और फिर आओ"
टाय ची गाठ सोडत आशुतोष बोलला. हि चौथी वेळ होती अलाहाबाद एस एस बी सेंटर मधून त्याला नाकारलं गेल्याची.
"तो भाई कर ना क्लिअर युपीएससी, रोका किसने है?"
समदुखी सुमित कुमार वैतागून बोलला.
"नहीं हो रही यार...वही तो लफडा है ना"
"कोई नै यार..देअर इस ओलवेज ए नेक्स्ट टाईम. चल फिर, मिलते है किस्मत में होगा तो"
विरोधाभास : प्रसार माध्यम आणि सर्वसामान्य
सर्जिकल ष्ट्राईक आन मोदी गुर्जीची गोष्ट
गेल्या एक दोन आठवड्यापासून 'सर्जिकल स्ट्राईक' ह्या विषयावरून ईतक्या चर्चा,कुचर्चा,विचर्चा चालू आहेत की डोकं अगदी पिकलं ....
पवार साहेब म्हणाले,ह्यात काय, सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही बी केलंय की राव......
ह.भ.प. केजरीवाल महाराज दिल्लीकर म्हणाले पुरावे द्या... (खरं म्हणजे केजरीवाल वहिनी तरी त्यांना सीरियस घेत असतील का?,ही शंका आहे )
शेती कामासाठी मजूर हवे आहेत....
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
स्वप्नातले कोंकण
स्वप्नातले कोंकण
साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण
अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन
अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण
नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान
परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान
स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान
राजेंद्र देवी
...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो..
आठवणीतला हॉलीवुड-सात
मिस्ड कनेक्शन्स
फ्रेंच कनेक्शन
तब्बल चार वर्षांनी आमचं भारतात जायचं ठरलं. मुलींच्या शाळा बुडू नयेत म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जूनमध्ये जायचं असा प्लॅन करून फेब्रुवारीमधेच डील्स शोधायला सुरुवात केली. आम्ही चौघे आणि बरोबर एका मित्राची बायको आणि २ मुले असे एकूण ७ जणं जून मध्ये जाणार होतो. सुट्टी फार नसल्याने मी एका महिन्यात परत येणार व बाकी सगळे २ महिने म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहणार होते. माझा मित्र जुलै मध्ये भारतात जाऊन या बाकी सगळ्यांबरोबर ऑगस्टमध्ये परत येणार होता.
सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.