✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास

ज
जॉनी यांनी
Fri, 10/28/2016 - 18:54  ·  लेख
लेख
शरीराने तो बसला होता खडकावर... पण मन कुठेतरी भूतकाळात रमलं होतं... "भें**, कुछ नही होता यार एन सी सी एंट्री से. आना है फौज में तो युपीएससी क्लिअर करो और फिर आओ" टाय ची गाठ सोडत आशुतोष बोलला. हि चौथी वेळ होती अलाहाबाद एस एस बी सेंटर मधून त्याला नाकारलं गेल्याची. "तो भाई कर ना क्लिअर युपीएससी, रोका किसने है?" समदुखी सुमित कुमार वैतागून बोलला. "नहीं हो रही यार...वही तो लफडा है ना" "कोई नै यार..देअर इस ओलवेज ए नेक्स्ट टाईम. चल फिर, मिलते है किस्मत में होगा तो" सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेल्या आशुतोष ने मोठंच स्वप्न पाहिलं होतं तसं. वडील कारकून आणि आई गृहिणी. सैन्यात अधिकारी होणे हे आपलं काम नाही असा सूर दिसायचा कधी कधी त्याच्या घरी, पण त्याला कधी कुणी अडवून धरलं नाही. कॉलेज मध्ये एन सी सी च्या माध्यमातून महत्त्वाकांक्षेला खतपाणीच मिळालं. इंजिनिअरिंग ला चांगला परफॉर्मन्स असून प्लेसमेंट्स अटेंड न करता आर्मीतच जायचं ठरवलेलं. असं असलं तरी चार वेळा परीक्षा देऊन सुद्धा युपीएससी क्लिअर करू शकला नव्हता. आणि आता एज बार झाल्यामुळे एन सी सी एंट्री हा एकच पर्याय होता. आणि पुढच्या अटेम्प्ट ला आर या पार हा निश्चय च झाला होता. "शाब चाय चाहिये?" "हांजी जगजीत, प्लिज गेट वन" "इन अ व्हाईल, सर" आशुतोष बरोबर राहून मुळातच स्मार्ट असलेला जगजीत इंग्रजी पण शिकू लागला होता..आशुतोष ला कौतुक वाटलं त्याचं. आणि इन अ व्हाईल ऐकून हसु फुटलं.. पण परत मागच्या गोष्टी पुढे आल्या.. बेंगलोर बोर्ड मधून स्क्रीनिंग, साईक, जीटीओ, इंटरव्ह्यू, मेडिकल असे सर्व टप्पे पार करून आय एम ए मध्ये दाखल झाला ट्रैनिंग साठी. एन सी सी एंट्री ने च तारलं त्याला शेवटी. यथावकाश ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झालं. पण ह्या ट्रेनिंग ने त्याच्या अंगात एक आग भरली गेली होती. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर सतत काहीतरी नवीन करायची उर्मी त्याला खुणावत होती. मग काय, मनाने कौल दिला-पॅरा कमांडोज. असंख्य शारीरिक, मानसिक वेदना, यातना सहन करत सशक्त शरीर आणि कणखर मनाचा कमांडो तयार झाला.. "सर, टी" "जगजीत, अंग्रेजी अच्छी सिख रहा है तू. चक्कर क्या है?" "आपही कि क्रिपा शाब, आप जैसे अफसर होंगे तो हम भी कुछ सिख लेते है" "चल अच्छा है" आशुतोष हसत म्हणाला. इतक्यात मेजर अकबर सिद्दीकी त्याच्याकडे येताना दिसले. "जय हिंद सर" आशुतोष आणि जगजीत दोघांनी मेजर ला सलाम केला. "जयहिंद लेफ्टनंट यादव, सब ठीक? आज तो तुम्हारा खाता खुलते खुलते रेह गया यार..कोई नै, देअर इज ओलवेज ए नेक्स्ट टाईम..एन्जॉय द टी" आशुतोष ला हसू आलं आणि सुमित कुमार ची आठवण हि आली. आज आशुतोष चा लेफ्टनंट आशुतोष यादव झाला होता पण सुमित कुमार ची काही खबर नव्हती. चार काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन्स मध्ये सहभागी झाला होता आत्तापर्यंत आशुतोष, पहिली तीन तर अशीच गेली. ट्रॅप लावल्याचे खबर अतिरेक्यांना मिळत होती. आणि काश्मीर खोऱ्यात हे काही नवीन नव्हतं. आज मात्र दोन अतिरेकी ठार झाले होते. छोट्या टेकडी वजा पठारावर दहा सैनिकांच्या तुकडीने वर्तुळाकार ट्रॅप लावला होता. नेतृत्व अर्थातच मेजर सिद्दीकी करत होते. तुकडीचा बेस सोबत सतत संपर्क होता. रात्री 2.30 च्या सुमारास बेस च्या रेडिओवर दोनच गोळ्यांचा आवाज आला आणि काम तमाम. रायफल च्या दहा बारा फैरींचे आवाज यायला तो काही पिक्चर नव्हता. सुभेदार विकास आणि मेजर सिद्दीकी ह्यांनी अतिरेक्यांची देवाशी गाठ घालून दिली होती. अतिरेक्यांच्या कपड्यांच्या आतमध्ये चार फुल्ली लोडेड एके 47 सापडल्या. थोड्याच वेळात मेजर सिद्दीकीने सीओ ला डिटेल रिपोर्ट दिला आणि आदल्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून चा ट्रॅप उठवला.. आशुतोषनं मात्र आज पहिल्यांदा पन्नास फुटावरच्या माणसाला दोन भुवयांच्या मध्ये गोळी लागून मरताना पाहिलं होतं. कितीही स्ट्रॉंग असला तरी थोडंसं फील झालंच होतं त्याला. आणि त्याचाच विचार करत तो कॅम्प च्या बाहेर खडकावर बसला होता. क्रमश: अवांतर: मिपा वर लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. पण तरी सांभाळून वगैरे नका घेऊ, चुका असल्यास दाखवून द्या प्लिज, म्हणजे नेक्स्ट टाईम सुधारायचा प्रयत्न करेन.
  • प्रवास २
  • प्रवास ३
  • प्रवास ४
  • प्रवास ५
  • प्रवास ६

Book traversal links for प्रवास

  • प्रवास २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
8997 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

वाचते आहे..

यशोधरा
Fri, 10/28/2016 - 20:18 नवीन
वाचते आहे..
  • Log in or register to post comments

जबरदस्त सुरूवात.

पद्मावति
Fri, 10/28/2016 - 20:47 नवीन
जबरदस्त सुरूवात. पुढचा भाग लवकर टाका प्लीज़
  • Log in or register to post comments

वाचतोय.

एस
Fri, 10/28/2016 - 22:02 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात

पैसा
Fri, 10/28/2016 - 22:41 नवीन
छान सुरुवात. टाईप करायची सवय असेल तर जरा मोठे भाग टाका.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात.

चित्रगुप्त
Fri, 10/28/2016 - 22:45 नवीन
वा. वेगळ्या विषयावरील मालिका. सुरुवात छान झालीय. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Wed, 11/09/2016 - 15:33 नवीन
सुरूवात आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments

आज प्रवास वाचायला घेतला, शैली

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 11/14/2016 - 07:31 नवीन
आज प्रवास वाचायला घेतला, शैली उत्तम अन ओघवती आहे तुमची, आता बाकी भाग वाचून त्यावर प्रतिक्रिया देतो. एक सल्ला आहे, स्वतःला मला तो फिल होतो, जिथे सिनिअर ज्युनिअरला भेटतो तिथे 'सलाम' करवून घेऊ नका 'सॅल्यूट' करवून घ्या, सलाम व्हॅले पार्किंग करणारा ताज हॉटेलचा बैरा करतो, सॅल्यूट आर्मीमॅन करतो, तुलना फक्त शब्दातील फरक समजून द्यायला करतोय बैरा कमी लेखणे उद्देश्य नाही. बाकी, तुमचे 'जॉनी' हे नाव जर गोरखा रेजिमेंटच्या भोळ्या चिवट अन अत्यंत शूर जॉनीबॉइज उर्फ गोरख्यानवर बेतलेले असेल तर प्रचंड आवडले आहे. मुश्किल वखत जॉनी सखत! पुढील लेखानांस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

खरंय

जॉनी
Mon, 11/14/2016 - 15:09 नवीन
त्या वेळी सॅल्यूट हा शब्द सुचायला हवा होता. काळजी घेईन. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

दखलमध्ये बघून लक्ष गेले

अजया
Mon, 11/14/2016 - 22:34 नवीन
दखलमध्ये बघून लक्ष गेले.वाचायला घेते.
  • Log in or register to post comments

शौर्य कथा

Ranapratap
Sun, 01/01/2017 - 18:32 नवीन
उत्तम लिखाण, पुढील लेखनास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मस्त आहे. पुभाप्र.

राजाभाउ
Mon, 01/02/2017 - 18:36 नवीन
मस्त आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे. पुढचा भाग

ज्योति अळवणी
Tue, 01/03/2017 - 21:44 नवीन
छान लिहिलं आहे. पुढचा भाग लवकर टाका
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा