दिवाळी अंक २०१६

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 9:57 pm

फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.

आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.

इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती. मी सुरुवात करते.

ह्या वर्षी खूप अंक विकत घेतले नाहीत, किंमती खूपच वाढल्यात. हंसचा अंक ३००/- रुपयांना आहे!
लोकसत्ताचा अंक घेतलाय आणि खूप आवडलाय. संग्रही ठेवण्यासारखा आहे. भटकंतींवरचे लेख, देशोदेशींच्या "ट्रंप" मानसिकतेच्या नेत्यांबद्द्लचे लेख, काही कंपन्यांच्या कार्य संस्कृतीवरचे लेख, नेताजींच्या फाईल्ससंबधित लेख. त्या शिवाय शेक्स्पिअरचा शोध हा माधव वझेंचा लेख, शैलेंद्र आणि त्याच्या तीसरी कसमबद्दलचा लेख, गिरिश कुबेर ह्यांच्या पुतिन युगावरील आगामी पुस्तकातील काही भाग, अजूनही काही लेख... आणि अर्थात वार्षिक राशिभविष्य!

त्याशिवाय डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक अतिशय सुरेख आहे, खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/

तसंच अजून एक अक्षरनामा म्हणून अजून एक ऑनलाईन अंक आला आहे - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

मेहता ग्रंथजगतचाही दिवाळी अंक आजच घरी येऊन पोचलाय, त्याबद्दल वाचल्यावर. तोवर तुम्हीही आपल्या आवडत्या अंकांबद्दल आणि त्यातील साहित्याबद्दल लिहा.

साहित्यिकसमाजआस्वादमाध्यमवेधमतमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात.
साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2016 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद. सदर लेख व अॉन लाइन अंकांसाठी.

मिपाकर आदूबाळ ह्यांची दिवाळी अंकातील एक कथा - http://www.aisiakshare.com/node/5586
मिपा दिवाळी अंकातील आदूबाळ ह्यांचे लेखन वाचायची उत्सुकता आहे!

राजेश घासकडवी's picture

29 Oct 2016 - 6:09 am | राजेश घासकडवी

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते.

http://aisiakshare.com/node/5593

बोका-ए-आझम's picture

28 Oct 2016 - 10:27 pm | बोका-ए-आझम

पुलंच्या ' माझे खाद्यजीवन ' या अजरामर लेखाचं अतुल परचुरेंनी केलेलं अभिवाचन जरुर ऐका. चांगलं केलंय.
https://youtu.be/8tr52LU0Xog

डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय.
कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य.
वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम.
ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

हो, अतिशय सुरेख झाला आहे हा अंक.

पाषाणभेद's picture

29 Oct 2016 - 1:18 am | पाषाणभेद

पाहण्यात असे आले आहे की,

आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत.

अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते.

किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही!

आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती?

याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते.

वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

पूर्वी धनंजयचा अंक वाचायचो. लेखकही अत्यंत दर्जेदार असायचे. हल्ली मात्र वाचनीयता जरा घसरल्यासारखी वाटते.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 7:08 pm | बोका-ए-आझम

यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले.
१ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत.
२ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात.
३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते.
थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते.
*बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

अनिंद्य's picture

29 Oct 2016 - 9:16 am | अनिंद्य

डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक
खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/

धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 1:29 pm | पद्मावति

मस्तं धागा आहे. वाचत राहणार.

सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

यशोधरा's picture

1 Nov 2016 - 9:58 pm | यशोधरा

हिलरीवरचा लेख ओके वाटला.
लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे.

एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते.

बाकी अजून वाचतेय.

वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे!
शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे.
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

अजया's picture

29 Oct 2016 - 8:30 pm | अजया

हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

बघा! शेवटी येताच हो आमच्या पुण्यात पुस्तकं घ्यायला!
.
.
पळाऽ~ऽऽ

पुस्तक काय पुणेकर पण होईन कदाचित!

व्हा हो, पण त्याआधी पुण्याला नाक न मुरडण्याची सवय लावा ब्वॉ नाकाला =))
येल्कम! :)

नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत.
काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =)))
फार अवांतर झाले गो ;)

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 9:23 pm | यशोधरा

होऊदेत. दिवाळी हय, हसनेका, हसानेका. :)

विंजिनेर's picture

30 Oct 2016 - 12:46 am | विंजिनेर

लोकप्रभा, किस्त्रीम, म.टा.चे कसे आहेत अंक? कोणी वाचले आहेत का कुणी?असल्यास काही फीडबॅक?

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:58 am | बोका-ए-आझम

चांगला आहे अंक.

यशोधरा's picture

11 Nov 2016 - 7:00 pm | यशोधरा

किस्त्रीम आणला आजच. २-३ दिवसांत वाचून सांगते.

किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

आदूबाळ's picture

21 Nov 2016 - 9:31 pm | आदूबाळ

कविता विभागातः

प्रवीण दवणे
आदित्य दवणे

एकाच तिकिटात दोन धमाल बालनाट्ये!

-------
कथा विभाग कसा आहे?

ओके आहे. फार ग्रेट असं नाहीये काही.

पुंबा's picture

26 Nov 2016 - 7:59 pm | पुंबा

ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 1:03 am | संदीप डांगे

बुकमार्क करतो धागा,

दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

वाचतिये. बरीच माहिती समजली.

सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे.
काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत.

अंक नाही वाचला तरी चालेल.

आदूबाळ's picture

30 Oct 2016 - 12:48 pm | आदूबाळ

अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली)

एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली.

ये कहां आ गये हम!

यशोधरा's picture

30 Oct 2016 - 12:54 pm | यशोधरा

तो अंक बंद झाला, हे आमच्या पेपर काकांनी सांगितले. ऐकून शॉक बसला, खरेच :(

मित्रहो's picture

30 Oct 2016 - 2:06 pm | मित्रहो

आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत?
सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

पिंगू's picture

30 Oct 2016 - 10:26 pm | पिंगू

हा एक ऑनलाईन दिवाळी अंक

नाखु's picture

31 Oct 2016 - 11:59 am | नाखु

कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही.

घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

महासंग्राम's picture

31 Oct 2016 - 2:58 pm | महासंग्राम

यावेळी धनंजयचा अंक अगदी फसलाय.
अगदी भिकार रहस्यकथा आहेत, अनुवाद तर अगदी पोरकट झालेत सगळे.

वरुण मोहिते's picture

1 Nov 2016 - 6:13 pm | वरुण मोहिते

उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

अभ्या..'s picture

1 Nov 2016 - 10:01 pm | अभ्या..

हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का?
असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने.
कृपा होईल.

सुधांशुनूलकर's picture

6 Nov 2016 - 9:39 pm | सुधांशुनूलकर

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा.
http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.)
या अंकातली माझी शिफारस -
आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत
माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी)
मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख
गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल
भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख
अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख.
विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख.

तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

छापील अंक आणि इ अंक सारखाच आहे का? थ्यांक्यू लिंकेसाठी.

सुधांशुनूलकर's picture

7 Nov 2016 - 9:00 pm | सुधांशुनूलकर

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग.

"१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही"

जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत.

दिवाळी अंक वाचक नाखु

रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही.
मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय

ल्क्ष ठेवायला हवं इथे

मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले.

कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत.

तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी
काळ्या फुलांची काळी डहाळी ...

असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

पुंबा's picture

2 Nov 2016 - 11:39 am | पुंबा

बाप रे..

प्रदीप's picture

5 Nov 2016 - 10:54 am | प्रदीप

तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी
काळ्या फुलांची काळी डहाळी ...

अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

Link

इथे सर्व कृती दिली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक यायला लागले आहेत. वाचून काही वाटलं तर लिहीन.
तो पर्यंत केवळ पोच. धाग्यावर लक्ष ठेवून आहे. ( सो ही पोच) \

-दिलीप बिरुटे

विशाखा पाटील's picture

5 Nov 2016 - 9:22 am | विशाखा पाटील

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम.
मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en
'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

यशोधरा's picture

5 Nov 2016 - 9:24 am | यशोधरा

मौज चा इ अंक पण आहे?

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 3:29 pm | सस्नेह

'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण.
इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर.
यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी...
उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 4:30 pm | सस्नेह

एकंदरीत, अंक भरगच्च आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो.
त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;)

-दिलीप बिरुटे

एस's picture

5 Nov 2016 - 5:12 pm | एस

लेखकराव!

एस's picture

5 Nov 2016 - 10:01 am | एस

digitaldiwali पेक्षा aksharnama चा अंक जास्त आवडला.

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 3:29 pm | सस्नेह

aksharnama ऑनलाईन आहे का ?
असल्यास लिंक द्या ना.

यशोधरा's picture

5 Nov 2016 - 3:31 pm | यशोधरा

ताई, वाचा की वर ;)

नाय म्हंजी लेख वाह्चीतच न्हाय का वगीच आसं करता वं ;)

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 4:17 pm | सस्नेह

:)

विशाखा पाटील's picture

5 Nov 2016 - 5:45 pm | विशाखा पाटील

अक्षरनामा पोर्टलही चांगले आहे. http://www.aksharnama.com/

यशोधरा's picture

5 Nov 2016 - 6:00 pm | यशोधरा

मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका

मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा

…तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल!

मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई!

http://www.misalpav.com/node/30637

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2016 - 3:05 pm | स्वाती दिनेश

यशो, धन्यवाद, त्या अंकातच स्नेहांकिताचाही लेख आहे.
स्वाती

वरुण मोहिते's picture

6 Nov 2016 - 2:43 pm | वरुण मोहिते

भानू काळेंच लिखाण मला नेहमीच आवडतं त्यामुळे आवडतो अंक तो बाकी वाचून पहा. आणि अक्षर चांगला जमलाय .

नाखु's picture

7 Nov 2016 - 2:23 pm | नाखु

मेनका अंक वाचत आहे.

गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे.
दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.

मित्रहो's picture

7 Nov 2016 - 8:02 pm | मित्रहो

डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे.
प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे.

अक्षरनामा
फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने.

लोकसत्ता
अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला.

लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे.

'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे.

वाचन सुरुच आहे.

मित्रहो's picture

11 Nov 2016 - 9:24 pm | मित्रहो

अंतर्नाद आणि आवाज आज आले. अंतर्नाद तर आरामात दोन तीन महीन्यानी वाचायचे ठरवलेय. इतर वाचतोय
हळूहळू.

मित्रहो's picture

21 Nov 2016 - 12:50 pm | मित्रहो

दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले.

डिजीटल दिवाळी
अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते.

अनुभव
कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे.

आवाज
हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच.

लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.

नाखु's picture

21 Nov 2016 - 2:43 pm | नाखु

सहमत.

अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे.

कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)

सस्नेह's picture

21 Nov 2016 - 12:54 pm | सस्नेह

'माहेर' वाचला.
केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.

यशोधरा's picture

21 Nov 2016 - 1:01 pm | यशोधरा

काय सांगतेस! :(

सस्नेह's picture

21 Nov 2016 - 1:10 pm | सस्नेह

:(

यशोधरा's picture

21 Nov 2016 - 1:02 pm | यशोधरा

कोणी कालनिर्णय वाचला का?

आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.

मौज वाचते आहे आणि आवडतो आहे.

कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत.

कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत.

ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले.

उर्वरित अंक संपल्यावर...

प्रदीप's picture

26 Nov 2016 - 7:47 pm | प्रदीप

निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो.

गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.

दोन्हीही वाचावेसे वाटताहेत.. धन्यवाद..

यशोधरा's picture

30 Nov 2016 - 7:23 pm | यशोधरा

सामनामधील उल्लेखनीय लेख -
संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख.
वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख.
गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख.

कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे.

मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.

श्रीनिवास टिळक's picture

3 Dec 2016 - 5:39 pm | श्रीनिवास टिळक

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'

यशोधरा's picture

3 Dec 2016 - 5:47 pm | यशोधरा

कोणते संकेतस्थळ?
जसे अंक वाचाल, इथे माहिती लिहित जावी अशी विनंती.

श्रीनिवास टिळक's picture

3 Dec 2016 - 6:15 pm | श्रीनिवास टिळक

क्षमस्व; हे संकेतस्थळ

श्रीनिवास टिळक's picture

3 Dec 2016 - 10:12 pm | श्रीनिवास टिळक

संकेत स्थळ www.22shruti.com

श्रीनिवास टिळक's picture

3 Dec 2016 - 10:02 pm | श्रीनिवास टिळक

क्षमस्व; हे संकेतस्थळ