शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
9 Nov 2016 - 8:00 am

ब्लॉग दुवा
शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान

ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच.

आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो. शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे योगेश जाधव, राहुल राऊत, संतोष शिगवण यांनी या गीतासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.

सुधारित लिंक - आता फाईल ओपन व्हायला हवी

वीररसकविता

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

अंबरनाथ ते कल्याण-माझा पहिला लोकल प्रवास

महामाया's picture
महामाया in भटकंती
8 Nov 2016 - 7:22 pm

<strong>(रेस-पार्ट-टू)</strong>

‘तिकिट...’
‘दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...’
‘फर्स्टक्लास चं आहे कां...?’
‘सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...’
‘पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...’
-------------
वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा ला संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’

!! माझ्या सवता !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
8 Nov 2016 - 5:50 pm

सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता,
माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!!

सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना,
दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!!

सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी,
नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!!

दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी,
तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!!

सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण,
वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!!

भावकवितामांडणीकविता

डी फॉर डान्सबार (१)

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 4:28 pm

तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत.

वावरप्रकटन

१०,००० पाऊले रोजची

निओ१'s picture
निओ१ in जनातलं, मनातलं
7 Nov 2016 - 10:04 pm

वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक.
वयाच्या ३८ व्या स्टेप पर्‍य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते.

१३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर.

धोरणप्रकटन

प्रेम....?

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
7 Nov 2016 - 6:40 pm

भेटत....ती पण नाही,
भेटत....मी पण नाही...
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवणे मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही...
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे...
समजत...ती पण नाही,
रागवत... मी पण नाही...
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत... ती पण नाही...
थांबत... मी पण नाही...
जेंव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी...
ऐकत... ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,

विराणीरेखाटन

एकमेकांना सोडून जातांना...!

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
7 Nov 2016 - 6:10 pm

एकमेकांना सोडून जातांना
एक गोष्ट माझ्यासाठी करशील,
आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत
माझी आठवण जपून ठेवशील,
जातांना फक्त शेवटी मला
तुझा चेहरा मन भरुन बघू देशील,
स्मरणात तो न मिटण्यासाठी...
जाता जाता तुझा हात
माझ्या हातात देशील,
तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी...
जाता जाता तुझ्या डोळ्यातील
अश्रु मला वेचायचे आहेत
पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर
.....शिंपडण्यासाठी.....

भावकविताजीवनमान