मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकमेकांना सोडून जातांना...!

Bhagyashri satish vasane · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील, आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत माझी आठवण जपून ठेवशील, जातांना फक्त शेवटी मला तुझा चेहरा मन भरुन बघू देशील, स्मरणात तो न मिटण्यासाठी... जाता जाता तुझा हात माझ्या हातात देशील, तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी... जाता जाता तुझ्या डोळ्यातील अश्रु मला वेचायचे आहेत पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर .....शिंपडण्यासाठी.....

वाचने 1700 वाचनखूण प्रतिक्रिया 3

मराठी कथालेखक Tue, 11/08/2016 - 11:47
करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल. एकतर कवितेच्या दृष्टीनेही लय चांगली पकडता येईल आणि अर्थाच्या दृष्टीने बघताही - प्रेम केलं आहे तर हक्क आहे आणि प्रेमिका प्रियकराकडे हक्काने मागेल , विचारणार नाही.

In reply to by मराठी कथालेखक

सच६४८६ Wed, 11/09/2016 - 10:14
मस्तच ... करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल.>> हे टाकल्यानंतर अजून छान वाटतेय कविता ..