आज मला समजलं
आई ,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं
आठवणीच्या डोहामध्ये ,
मन पुरं भिजलं
तहान भूक झोप सारं ,
क्षणात परकं होतं
अनोळखी ते मोठं घर ,
गिळून मला खातं
मनात माझ्या उत्तरांचं ,
काहुर एक माजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं
गर्दी असते बाजूला ,
पण हाकेला तो ओ नसतो
दूर जाऊन उमगलं ,
एकटेपणा काय असतो
दूर जाऊन सहवासाच्या ,
किंमतीचं ते बीज रुजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं