तुझ्या रूपाने मिळाला,
अस्तित्व घडवणारा एक वटवृक्ष.
माझ्या पावलांना प्रकाश पुरवणारी
तुझी सावली,
पानापानांना जीवनरसाने ओथंबून टाकणारी
मुळंही तुझीच.
माझी सगळी शस्त्र इथेच परजलेली,
संकटसमयी तुझ्याच ढोलीत लपवलेली.
हरवलो जरी कधी तरी,
स्वतःला शोधायला आलो, तुझ्याच गार सावलीत
सापडत गेलो स्वतःला, दरवेळी नव्याने.
पण
आपल्या छोट्याशा विश्वाचा आधार असलेली तुझी मु़ळं,
खोलवर जाऊ लागलीत,
अनोळखी विश्वाच्या दिशेनं.
माझ्यावरचा ऊनपाऊस अलगद झेलणाऱ्या तुझ्या फांद्या,
आधार शोधू लागल्यात अनंताचा.
जाळी होत चाललेल्या तुझ्या पानांमधुन,
अंधार झिरपू लागलाय अताशा.
मुक्त होत चाललीस तू,
कणाकणाने, क्षणाक्षणाने.
पण...
तुझ्या खोडाभोवती लपेटलेला साधा वेल मी,
मी कुठे जाऊ गं आई ?
------------------------------------------------
प्रतिक्रिया
27 Feb 2017 - 6:48 pm | पद्मावति
निशब्द!!!!
काय बोलू :(
27 Feb 2017 - 6:51 pm | वेल्लाभट
मनात चर्र करणारी रचना
27 Feb 2017 - 8:27 pm | गवि
क्या बात है...
मिसळलेला काव्यप्रेमी हा आयडी म्हणजे तुम्हीच ना? खरं खरं सांगा..
इट्स अ कॉम्प्लिमेंट...
27 Feb 2017 - 11:12 pm | अॅस्ट्रोनाट विनय
अहो नाही गविजी. मी पहिल्यांदाच मिपावर येतोय. ( तीनेक महीने झाले असतील) मीच असतो तर तो आयडी बदलला नसता :)
28 Feb 2017 - 12:44 pm | संजय पाटिल
आवडलि...
28 Feb 2017 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा
+१
1 Mar 2017 - 12:54 am | निशांत_खाडे
मुजरा स्वीकारा!
1 Mar 2017 - 2:37 am | जयंत कुलकर्णी
खरे म्हणजे मिपावरील चांगल्या कविता एकत्र करुन एक चांगला कवितासंग्रह होईल...
छान कविता.... तथाकथित सध्याच्या प्रसिद्ध कविंपेक्षा बरे कवी आहेत इथे....
1 Mar 2017 - 5:58 pm | अॅस्ट्रोनाट विनय
खरे म्हणजे मिपावरील चांगल्या कविता एकत्र करुन एक चांगला कवितासंग्रह होईल...
>> सहमत. दरवर्षीच्या ( किंवा दर सहा महिन्यातील) उत्तमोत्तम कविता, कथा, बोलीभाषा यांचे e books बनवल्यास सर्वाँच्याच सोईचं होईल. असे e books offline सुद्धा वाचता येतील, वाचायला देता येतील. मिपा बद्दल अजून जास्त लोकांना कळेल आणि वाचकसंख्या वाढेल.
1 Mar 2017 - 6:01 pm | पैसा
आह!