मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज मला समजलं

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आई , ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आठवणीच्या डोहामध्ये , मन पुरं भिजलं तहान भूक झोप सारं , क्षणात परकं होतं अनोळखी ते मोठं घर , गिळून मला खातं मनात माझ्या उत्तरांचं , काहुर एक माजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं गर्दी असते बाजूला , पण हाकेला तो ओ नसतो दूर जाऊन उमगलं , एकटेपणा काय असतो दूर जाऊन सहवासाच्या , किंमतीचं ते बीज रुजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आवाजाची किमया न्यारी , ओढीची ती तहान सारी शब्द ऐकता तुझे ते सारे , होते जणू जादू प्यारी आवाजातही ओढ असते , हे तुझ्याशी बोलून समजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं - अभिषेक पांचाळ , पुणे ( ९०२८८७५९५८ )

वाचने 749 वाचनखूण प्रतिक्रिया 0