होऊन आज सूर्य (गझल)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 1:45 pm

होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी

माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी

केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी

युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी

बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी

पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी

जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?

- शार्दुल हातोळकर

मराठी गझलगझल

माझ्या कवितेची शाई

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 11:39 am

माझ्या कवितेची शाई
आहे अजब मिश्रण
भस्म अधुऱ्या स्वप्नांचे
त्यात अश्रुंचे शिंपण

कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी गुंजतो पाताळी

कवितेची ओळ माझ्या
कधी फुलांनी वाकते
कधी बोलता बोलता
गहनाशी झोंबी घेते

माझ्या कवितेत जेव्हा
फुंकीन मी प्राण नवा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा

कविता माझीमुक्तक

जाऊ शकते-तीच जात!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
16 Mar 2017 - 11:33 am

म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते
अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB
पण.....

संस्कृतीधर्मसमाजविचारबातमीमत

शून्य....

ओ's picture
in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 8:48 am

आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते
शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते

शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण
विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान

गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार
त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद

शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल
रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ

शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे
शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे

नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे
भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे

अदभूतकविता

उत्तुंगतेचा प्रवास ||१||

ओ's picture
in भटकंती
16 Mar 2017 - 8:39 am

आम्ही दोघे बद्रीनाथ हुन चोपता कडे जायला निघालो,चोपता बद्दल वाचून होतो की तीथे वीज नाही,

बद्रीनाथ ते चोपता हा प्रवास तर आमच्या डोळ्यांसाठी एक पर्वणीच होती
शुष्क हिमालयाच्या रंगानं पासून गर्द दाट हिमालयाच्या झाडीतला तो प्रवास,आज ही त्याचा गारवा अंगावर जाणवतो,आमची गाडी त्या पर्वत रंगानं मधून जात होती आणि आम्ही निसर्गाच्या एक अद्भुत रचनेचा प्रवास करत होतो

ती जंगल जणू काही आम्हाला त्यांच्या कुशीत विसावा घेण्यासाठी आमंत्रण देत होती, आमचा प्रवास आता चोपता पाशी येऊन थांबला,आणि तेव्हा कळलं की दुपार चे अडीच झाले आहेत

नेत्याच्या सोयीचं राजकारण

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जनातलं, मनातलं
16 Mar 2017 - 8:22 am

कथा आणि व्यथा
******************************
नेत्यांच्या सोयीचं राजकारण
*************
आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी...
तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं.

कथालेख

खिडकी पलीकडचं जग भाग 2

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 8:59 pm

भाग १ : http://www.misalpav.com/node/39159

भाग २

खूप दिवसांनंतर त्या दिवशी बाबा घरी आले ते एकदम उत्साहात. त्यांनी गौरीसाठी नवीन ड्रॉइंग बोर्ड आणला होता. अड्जस्टेबल होता तो. गौरीच्या सोयीप्रमाणे ती तो पलंगावर उभा किंवा आडवा ठेऊ शकणार होती. पण तो बघुनही गौरी शांतच होती. रात्री जेवायची वेळ झाली होती. आई-बाबा अलीकडे तिच्या बेड जवळच जेवायला बसायचे. त्याप्रमाणे तिघे जावायला बसले. त्यावेळी मात्र बाबांनी एक मोठी बातमी दिली.

कथा

||कोहम्|| भाग 1

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 7:49 pm

साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा..

वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं..

विज्ञानमाहिती

एका बोक्याची गोष्ट - भाग ३

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जनातलं, मनातलं
15 Mar 2017 - 3:28 pm

एका बोक्याची गोष्ट - भाग ३
* विशेष सूचना - ही एका बोक्याची गोष्ट नसून सत्यकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. *

कथाअनुभव