✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शून्य....

ओ — ओ, गुरुवार, 03/16/2017 - 08:48
आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे विखुरलेले ब्रम्हांड सारे आज विलीन होउदे आज पुन्हा अंधाराला शून्य होऊन राहूदे नऊ रसाचे भाव विश्व आज गोठून जाऊ दे शून्य विचार असण्याची आज अनुभूती घेऊ दे तुरीय अवस्तेचा हा प्रवास समाधीत आज संपू दे ह्या जीवाला त्या शिवात एकरूप होऊन जाऊ दे शून्य होऊनि शून्य तेची शून्य अवस्था मिळू दे शून्यातल्या हि शून्यतेचा प्रवास शून्य होऊ दे ----© ओंकार जोशी

प्रतिक्रिया द्या
694 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा