(वडा तळलाच आहे तर...)
प्रेरणा?
खायला कशाला हवी प्रेरणा? पण तरीही विचारलीत तर ही घ्या
नका रांधू भुसकटे ती मला खवळून खाऊ द्या
वडा तळलाच आहे तर मला निथळून खाऊ द्या!
नको ते रोजचे रडणे, सॅलड अन ब्रेडचे तुकडे
मुलायम लागते हलवा-पुरी कवळून खाऊ द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक 'केकां'नो
पहाटे 'कॉफि'ला तुमच्या सवे हुरळून खाऊ द्या!
अश्या बेरंग खाण्याची कुठे उरते खूण 'मागे'?
तांबडा रंग तर्रीचा करी 'मिसळू'न खाऊ द्या!