७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

Primary tabs

मोदक's picture
मोदक in भटकंती
16 Jun 2016 - 9:59 pm

मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.

तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले.

गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले.

लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.

 1. LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
 2. Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
 3. स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
 4. थंडीचे आणि साधे पायमोजे.
 5. एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
 6. ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
 7. बलक्लावा आणि राईडींग मास्क.
 8. किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
 9. गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
 10. थर्मल वेअर्स.
 11. थंडीचे जॅकेट.
 12. एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
 13. एक बॅकपॅक / सॅक.
 14. सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
 15. सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
 16. २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
 17. दोरी / रोप.
 18. सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
 19. आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
 20. पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
 21. गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
 22. आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
 23. गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
 24. गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
 25. गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अ‍ॅक्सलरेटर केबल.
 26. जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
 27. चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
 28. पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
 29. भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
 30. वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)

वरचे सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तर कांही अत्यावश्यक सामान / खाद्यपदार्थ एकावर एक अशा दोन तीन पिशव्यांमध्ये व्यवस्थीत गुंडाळून व वरती रबरबँड ने पक्के जखडून घेतले होते.

वरचे सगळे सामान बॅगेत भरून आणि बॅग गाडीला बांधून एक १५-२० किमीची राईड केली आणि बॅग नीट बसत आहे का ते चेकवले.

निघण्याची तारीख शेवटपर्यंत नक्की होत नव्हती. शेवटी २६ मे ला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची घोषणा झाली आणि २७ ला निघण्याचे ठरले..!

चला तर मग.. जॅकेट चढवा, हेल्मेट घाला आणि लेहवारी साठी सज्ज व्हा..!!!

.

.

.

.

.

.

.

.

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

खेडूत's picture

16 Jun 2016 - 10:05 pm | खेडूत

अरे वा!
नेहेमीप्रमाणेच जबरदस्त मालिका होणार.
नकाशा पाहूनच उत्सुकता ताणली गेलीय.
पु भा प्र..

राघवेंद्र's picture

16 Jun 2016 - 10:18 pm | राघवेंद्र

+१

आदूबाळ's picture

16 Jun 2016 - 10:16 pm | आदूबाळ

ये बात! भाग मात्र लौकर लौकर टाका.

ते इनो हाये काय शिल्लक?

निशदे's picture

16 Jun 2016 - 10:53 pm | निशदे

कडक..........
प्रचंड उत्सुकता आहे..... येऊ द्या पटापट.....

मित्रहो's picture

16 Jun 2016 - 11:08 pm | मित्रहो

पुण्यावरुन लेह जबरदस्ता
उत्सुकता भयंकर म्हणजे अगदी भयंकर वाढली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jun 2016 - 11:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

ज्जे ब्बात!!! जे नाम रोसण कर देया छोरे णे गोतीयण का!

खल्लास मोदक शेठ ! एनफिल्ड फॉरेव्हर एनफिल्ड फॉर लाईफ! बी स्ट्रॉंग राईड मेटल!! जियो

भाग लवकर लवकर येऊ द्या

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:29 am | टवाळ कार्टा

एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे काश्मिर करायचे का मी शेप्रेट धागा काढणार आहे तिथे? ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jun 2016 - 10:54 am | कैलासवासी सोन्याबापु

जशी माननीय टका शेठची विच्छा ;)

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:58 am | टवाळ कार्टा

खिक्क...माझ्या धाग्यावर करु दंगा...मोदकला ट्यार्पीची हौस नै =))

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Jun 2016 - 11:46 am | अनिरुद्ध.वैद्य

एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक ईट ऑर हेट ईट.

एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक ईट ऑर हेट ईट.

+१११११११

चाणक्य's picture

16 Jun 2016 - 11:30 pm | चाणक्य

वाचतोय.

चाणक्य's picture

16 Jun 2016 - 11:52 pm | चाणक्य

वाचतोय.

बाबा योगिराज's picture

16 Jun 2016 - 11:58 pm | बाबा योगिराज

येक नम्बर भावा.
क्रमांक 2 चा फोटू बघून पुन्हा जळजळ झालेली आहे.

पुलेशु, पुभाप्र

संजय पाटिल's picture

17 Jun 2016 - 11:06 am | संजय पाटिल

क्रमांक 2 चा फोटू बघून पुन्हा जळजळ झालेली आहे.>>>>
सेम हियर..
बाकी पुढिल भाग लवकर येवूदेत.

कंजूस's picture

17 Jun 2016 - 6:46 am | कंजूस

सायकल ?
जय्यत तयारी यादी मस्तय.

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:28 am | टवाळ कार्टा

सायकल =))

वेदांत's picture

17 Jun 2016 - 9:46 am | वेदांत

फोटो दिसत नाहीत.
पुभाप्र .

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2016 - 10:28 am | टवाळ कार्टा

+१

स्नेहांकिता's picture

17 Jun 2016 - 10:22 am | स्नेहांकिता

साक्षेपी कथन. ते फोटोंच्या मधलं वर्णन गायबलंय काय ?

अप्पा जोगळेकर's picture

17 Jun 2016 - 10:29 am | अप्पा जोगळेकर

मस्त.

सुबोध खरे's picture

17 Jun 2016 - 10:35 am | सुबोध खरे

झकास लेख
जरा अजून सविस्तर असायला हवा होता असे वाटते.

मंदार कात्रे's picture

17 Jun 2016 - 10:44 am | मंदार कात्रे

राइड सुरु असताना व्हॉट्सॅप वर अपडेट येतच होते तुमच्याकडून

पण लेख स्वरूपात वाचताना खूपच थ्रिलिन्ग वाटतेय !

अभिनन्दन अन पुढच्या राइडला शुभेच्छा

पुभाप्र

लेह-लडाख लोन (बुलेट सकट) नावाची योजना बँकांनी काढावी अशी विनंती. लाभार्थी तयार आहेत.

मृत्युन्जय's picture

17 Jun 2016 - 10:51 am | मृत्युन्जय

सुरुवात तर मस्त झालीय मोदक्शेठ. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत

बाळ सप्रे's picture

17 Jun 2016 - 11:03 am | बाळ सप्रे

मोदकाचा लेख व शीर्षक पाहून प्रथम वाटलां की सायकलवरून लेह स्वारी की काय!!

चांदणे संदीप's picture

17 Jun 2016 - 11:16 am | चांदणे संदीप

पुभाप्र!

Sandy

खटपट्या's picture

17 Jun 2016 - 11:18 am | खटपट्या

मस्त सुरवात !!

नाखु's picture

17 Jun 2016 - 11:27 am | नाखु

तुझ्या दोन्ही (सायकल आणि मोटारसायकल ) भटकंतीचे एक पुस्तक व्हावे ही ईच्छा आहे. बारीक सारीक बाबींची यादी, तपशीलवार माहीती आणि काय करावे/करू नये याची कारणमीमांसा असते म्हणून वाटते.

ज्याला आवड आहे पण माहीती नाही त्याला नक्की उप्युक्त ठरेल.(इतका अनुभव नक्कीच तुझ्यापाशी आहे)

पुभाप्र

नाखु

असंका's picture

17 Jun 2016 - 1:34 pm | असंका

+१..
अगदी मॅन्युअल बनेल फस्क्लास!

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Jun 2016 - 11:41 am | अनिरुद्ध.वैद्य

सुरुवात झकास! फोटो सुद्धा मस्त. अन यादीचे अगदी डिटेल वर्णन केलेत. आम्हाला उपेगी पडणार :)
(बाकी जेलुसिल आणुन ठेवलेय)

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

सुमीत भातखंडे's picture

17 Jun 2016 - 12:19 pm | सुमीत भातखंडे

अजून एका थ्रिलिन्ग लेखमालेसाठी सरसावून बसलोय.

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद मंडळी..!!!

एसराव - इनो शिल्लक आहे अजून. आणखी काही महिन्यात देतो. :p

स्नेहांकिता म्याडम व डॉक्टरसाहेब - हे फक्त टीजर्स आहेत.. ट्रेलर. म्येन शो सुरू होईल पुढच्या भागापासून.

बाळ सप्रे - सायकलवरून लेह हे एक प्रकरण विशलिस्टमध्ये होते. आता नाही. सायकलवरून लेह करण्याचा विचार बहुतेक बारगळला आहे - पण काही सांगता येत नाही. हुक्की आली तर कदाचित जाईनही..

नाखुकाका.. आयड्या भारी आहे. :)

दिग्विजय भोसले's picture

17 Jun 2016 - 1:35 pm | दिग्विजय भोसले

जंगी तयारी दिसतेय!!
इन्जाय!!

स्नेहल महेश's picture

17 Jun 2016 - 1:54 pm | स्नेहल महेश

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

जगप्रवासी's picture

17 Jun 2016 - 1:54 pm | जगप्रवासी

आवडत्या विषयावर लेखमालिका, लदाख बद्दल कोणी कितीही लिहील तरी वाचायचा कंटाळा येत नाही आणि आता तर मोदकराव लिहिताहेत म्हटलं तर एकदम मस्तच असणार आहे.

माझीही शॅम्पेन's picture

17 Jun 2016 - 2:00 pm | माझीही शॅम्पेन

वाह एकदम जबरदस्त सुरूवात , पहिल्यांदा ह्या महाप्रवासाबद्दल कळल तेंव्हा खर वाटल नाही , पण आता हे सगळ वाचताना कळतय की किती ग्रेट आहे हे सगळ , पुलेशु

भुमन्यु's picture

17 Jun 2016 - 2:42 pm | भुमन्यु

उत्सुकता ताणली गेलीये त्याच बरोबर ईनो घेउन सज्ज झलो आहे. टाका पुढचे भाग.

चेक आणि मेट's picture

17 Jun 2016 - 3:09 pm | चेक आणि मेट

अरे व्वा मस्तच!!
या एवढ्या एक्ससेरीज च्या बजेटमध्ये एखाद्या गरीबाचं घर बांधून होईल मोदकराव:-(

खरं आहे राव.. मला जास्ती सामान घेवून प्रवास करायची सवय आहे. :(

पण वरील लिस्टमधली कोणतीही वस्तू अनावश्यक वाटली नाही आणि न वापरता परत आली नाही.

जिन्गल बेल's picture

17 Jun 2016 - 3:19 pm | जिन्गल बेल

__/\__

मस्त. बुलेट म्हणजे अलगच चीज असती.

खरंय दादा... कसल्या कसल्या बेक्कर रोडवरून गाडी घातली.. दगड धोंडे आणि माती होती एका सेक्शनला तर चक्क तीन साडेतीन फूट पाणी होते. पण गाडी चट्टान जैसी कायम होती. ठरलेल्या रस्त्यावरून जरा हालली नाही.

एकाच ठिकाणी राक्षसी वार्‍यासमोर गाडीने टिकाव धरला नाही. पण त्या वार्‍यात फोर्ड एंडेव्हर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या गाड्यापण मुकाट शेपूट घालून बाजुला थांबल्या होत्या.

याबद्दल अधिक माहिती पुढील भागात येईलच..

जिन्गल बेल's picture

17 Jun 2016 - 3:20 pm | जिन्गल बेल

हि ओळख छान होती!!! पटापटा टाका पुढचे भाग...
प्रतीक्षेत आहोत!! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jun 2016 - 3:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या लगा तुह्याकडं हाय का बुलेट नसल्यास तडक एक काढ! तुला गरज हाय :D , आमचे फादर कायम एक म्हण सांगतात (त्यांना त्यांच्या मारवाडी मित्राने सांगितली होती) ती म्हणजे 'भुका मरो पर झोल मत खाओ' बुलेट घेतली तेव्हा हाच विचार केलता आम्ही!अवरेज कमी आहे ? मारो गोली !! दिवसाला टायल्या करत 50 किमीच्या जागी 5 किमीच फिरू पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच्याच शाही मयतात चालतोय!! :D

पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच्याच शाही मयतात चालतोय!! :D

ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!!

ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!!

+१११
जियो बापुसाहब..!

अभ्या..'s picture

17 Jun 2016 - 3:54 pm | अभ्या..

इसरला का सोन्याबापू त्यो कुणाचा तरी बुलेटचा धागा? माज असतो म्हणल्यावर आमी तर लढवली बुलेटची खिंड.
आठवीत असतानाच चालवायला शिकलेलो आहे. तीर्थरुपांची होती. नंतर ८५ मॉडेल बुलेट सोता ५ वर्श वापरली. मॉडीफाय करुन विकली. अजून एक हाय भावाकडं. अ‍ॅक्चुअली तवाच डेझर्टस्टॉर्म घ्यायची होती पण परिस्थितीने दगा दिला. नव्हता तवा टाइम आपला.
फक्त थोडे दिवस अजून... एक आरई असणारच आपल्याकडं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jun 2016 - 4:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

आठवले नीट सगळे! तुझ्याकडं लवकर डीएस येऊ दे ही प्रार्थना

अभ्या..'s picture

17 Jun 2016 - 4:05 pm | अभ्या..

आपके मुंहमे ओएम.
सॉरीसॉरी.. घीशक्कर. ;)

अस्वस्थामा's picture

17 Jun 2016 - 4:04 pm | अस्वस्थामा

मस्तच रे मोदका.. एक नंबर सुरुवात.. :)

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Jun 2016 - 12:28 am | लॉरी टांगटूंगकर

पुभाप्र

चौकटराजा's picture

18 Jun 2016 - 9:13 am | चौकटराजा

मोदकभाउ , तुझा॑ हा प्राक्रम घर्च्याना सांगितले ते म्हणतात मोदकाला याड लागलं काय ? आता त्येना काय सांगावा की मोदक
कसा येडा हाय ते. जातान जो रस्ता आहे तो येताना अस्तित्वात असेलच अशी ग्यारंटी नाही असा तिथला लौकिक आहे म्हणे. ( रोहटांग च्या अलिकडे तसा अनुभव येतोही). ७००० किमी ? अगागा !

इरसाल's picture

18 Jun 2016 - 10:17 am | इरसाल

तुम्ही लोकं या बुलेटवर फिरुन आम्हाला कोणी नाय बोलवत !!!!
पुभाप्र.

नि३सोलपुरकर's picture

18 Jun 2016 - 11:40 am | नि३सोलपुरकर

+१११
जियो मोदक राव .

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

विलासराव's picture

18 Jun 2016 - 11:47 am | विलासराव

मी १५ मेपासून १३ जून पर्यन्त साबू व्हिलेज लेह येथे होतो.
मधे २ दिवस एक अव्हेंजर रेंटने घेऊन लेह, अल्ची, खालसे, गारकोंन,संजा,बोधखरबू, लामायुरु ते लेह असा प्रवास केला. याआधी एकदाच अव्हेंजर चालवली होती लेह ते खारदुंगला पास. खुप सावकाश चाललो पण सुखरूप प्रवास केला.
गारकोन आर्यन व्हॅली मधील छोटे गाव. ३ गावच आहेत त्या आर्यन लोकांचे. खालसेवरुन इंडसच्या उजव्या काठाने ७० किमी. तिथे होम स्टे केला.
पायुपा नावाने गेस्ट हाउस आहे तिथे. १ गोरेगावची (मुंबई) फेमिली होती मुक्कामी.

भरत्_पलुसकर's picture

18 Jun 2016 - 12:50 pm | भरत्_पलुसकर

झकास!

रातराणी's picture

18 Jun 2016 - 1:14 pm | रातराणी

भन्नाट! हे करायच आहे एकदा!

पहिला फोटो अशक्य सुंदर आहे! _/\_

सुजल's picture

18 Jun 2016 - 1:47 pm | सुजल

अरे वा. छानच :)

बोका-ए-आझम's picture

20 Jun 2016 - 7:00 pm | बोका-ए-आझम

ये बुलेट मेरी जान मंझिलों का निशान! बाईक म्हणजे बुलेट. एसरावांना देऊन उरलं असेल तर इनो द्या जरा!

प्रीत-मोहर's picture

21 Jun 2016 - 10:11 am | प्रीत-मोहर

वाह. फिरोज्पूर ला गेल्याच कळल मॅप मधे डेरा बाबा नानक किंवा पिरोजपूर बॉर्ड्र बघितलीत का? अंगावर शहारे येण्याच्या जागा आहेत ह्या

मोदक's picture

8 Jul 2016 - 9:43 pm | मोदक

पुढच्या भागात कळेलच. :)

सविता००१'s picture

21 Jun 2016 - 4:25 pm | सविता००१

अशक्य माणसा, पुढचे भाग पटापट येउदेत.
मस्त लिहितो आहेस. नेहमीप्रमानेच.
नाखुंशी सहमत. पुस्तक काढच.

संदीप डांगे's picture

21 Jun 2016 - 5:42 pm | संदीप डांगे

ज्ब्रा!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Jun 2016 - 6:07 pm | मम्बाजी सर्वज्ञ

जबराट!!!!!!!!!!!!!

पिलीयन रायडर's picture

21 Jun 2016 - 7:18 pm | पिलीयन रायडर

खत्रा!

(हा टिजर प्रतिसाद आहे. जसे लेख येतील तसा खरा प्रतिसाद मिळेल!)

वटवट's picture

29 Jun 2016 - 9:49 am | वटवट

वाचतोय, बघतोय ..... खूप आवडतंय

पैसा's picture

29 Jun 2016 - 6:14 pm | पैसा

वाचतेय. मस्त सुरुवात!

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2016 - 10:54 pm | धर्मराजमुटके

जबरदस्त ! याशिवाय दुसरा प्रतिसाद देऊच शकत नाही.

उल्का's picture

29 Jun 2016 - 11:14 pm | उल्का

पुभाप्र.
गेल्या आठवड्यात ट्रॅव्हल क्सपि वर रोहन पाटोळेने लेह लडाखला गेलेल्या बाइकर्सची मुलाखत घेतली होती.
त्यात तुम्ही होता का? :)

नाही हो.. आमची मुलाखत कोणी घेतली नाही. :)

उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.

झेन's picture

10 Jul 2016 - 7:24 pm | झेन

झकास !!! खूप गोष्टी खूप लोक ठरवतात, पण जे ठरवून अमलात आणतात ते खरे जगतात बाकीचे फक्त कारण शोधतात. हॅट्स ऑफ मोदकराव. बाय द वे फोटोत अॉव्हेन्जर दिसत आहेत त्या तुमच्या टीम मधल्या आहेत का आणि त्या बुलेट इतक्या स्थिर आहेत का

ब़जरबट्टू's picture

21 Jul 2016 - 1:32 pm | ब़जरबट्टू

आगस्ट मधये जाणारा आहे का कुणी लडाखला ? व्यनी करा प्लीज..

आदूबाळ's picture

21 Jul 2016 - 1:43 pm | आदूबाळ

नवा भाग कधी आहे?

मोदक's picture

21 Jul 2016 - 1:57 pm | मोदक

आज किंवा उद्या...!!

वेदांत's picture

21 Jul 2016 - 5:07 pm | वेदांत

फोटो दिसत नाहीत ..

जातवेद's picture

21 Jul 2016 - 6:56 pm | जातवेद

पुभाप्र!