तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली..
अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.