Skip to main content

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 20/07/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
  • शहर - हैद्राबाद
  • बजेट - पाच ते सात लाख*
  • प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
  • प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
ऑफिस घरापासून ३८ किमी दूर आहे. लॉकडाउनपूर्वी मेट्रोने जायचो. सध्या डिसेम्बरपर्यंत WFH सुरु आहे. नंतरही काही रोज कार घेऊन जाणार नाही. वर्षातील चार-सहा महिने बाहेरगावी (बेन्गालुरू, पुणे, चेन्नई, कोलकाता दिल्ली इ.) काम असतं. त्यावेळी शनिवार-रविवार घरी येतो. वर्षातून तीन-चार वेळा २८० किमी दूर गावी प्रवास होतो. सध्या रेल्वेने जातो. कार घेतल्यावर कारने जाईन. पूर्वीचा कार चालवण्याचा फारसा अनुभव नाही. ही पहिलीच कार विकत घेत आहे. पायी, सायकल, बाईक कार, रेल्वे विमान इ. च्या प्रवासाचा अनुभव आणि आवड आहे. सध्याच्या आणि आधीच्या बाईकांचा प्रवास अकरा वर्षांत ९०००० किमी झाला आहे. आधी, दोन-अडीच लाखांपर्यंतची एक जुनी गाडी घ्यावी असा विचार होता (अजूनही निर्णय होत नाहीये). पण ओएलेक्स / ट्रू वॅल्यू / इतर आणि प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. किंमती जास्त वाटत आहेत. मी आइडेंटिफाय केलेल्या गाड्या - टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- ह्युंदाई सॅन्ट्रो स्पोर्ट्झ Hyundai Santro Sportz Petrol ₹६४३५२०/- ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - रेनॉ क्विड Renault Kwid RXT 1.0 ₹५१४६३९/-
  1. यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
  2. फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
  3. मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
  4. रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
  5. जुनी गाडी घ्यावी का?
  6. इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
सर्व ह्युंदाई गाड्यांचे माहितीपत्रके टाटा गाड्यांची माहिती मारुती गाड्यांची माहिती मदत, सल्ला, मार्गदर्शन इ.बद्धल मिपाकरांचे आगाऊ धन्यवाद.

वाचने 92090
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

टोटल पाच जण आणि वर्षाकाठी एक दोन सहली असे असेल तर मागे डीकी असलेली गाडी घ्या. नाहीतर सामान ठेवायचे वांदे होतात. स्विफ्ट डिझायर चा माझा अनुभव खूप छान आहे.पेट्रोल कारच घ्यावी असे मत आहे. दोन महिने जरी पडून राहीली तरी पहिल्या किकला (म्हणजे चावी पिरगळ्याला) चालु होते. मी पाच वर्ष वापरत आहे, अजून अ‍ॅवरेज,मेंटेनन्स वगैरे एकदम लिमिटमध्ये आहे.

मी तुमच्याजागी असतो, तर मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजि+पेट्रोल चा विचार केला असता. किंवा मारुती सुझुकी अर्टिगा हायब्रीड चा विचार केला असता.

सेफ्टी चा विचार करता मारुती च्या गाड्या योग्य नाहीत , बाकी सगळे उत्तम आहे पण जीव सर्वात महत्वाचा! ह्युंडाई चे इंजिन आणि परफॉर्मन्स सर्वोत्तम आहे, पण एव्हरेज कमी आहे. त्यामुळे टाटा टियागो किंवा लो एन्ड अलट्रोज घ्या असे सुचवेन .

In reply to by कपिलमुनी

मारुती व ह्युंदाई बद्धल हाच फीडबॅक माझ्या मित्रांनी दिलाय. हं, टिआगो पसंत पडेल असं वाटतंय.

In reply to by कपिलमुनी

टाटा टियागो बेस्ट ओप्श्न आहे. माझ्या पत्नीस गाडी घ्यायची होती तेंव्हा कपिलमुनिने हिच सजेस्ट केलेली मला. टियागो एक्स झेड आहे. अ‍ॅलॉय व्हील, हर्मन साउंडस, एबीएस आणि इबीडी. २ एअरबॅग आहेत. व्हाईट कलर आहे.(पुधे मागे धंदा काहीच जमला नाही तर ओलाला किंवा ट्रव्हलला लावायचा आणि ड्रायव्हर मणून काम करायचा विचार असलेने व्हाईट) त्यावेळी टाटाचा सेल्स मॅनेजर क्लासमेट असलेने बरेच डिसकाउंट अ‍ॅड करुन ६ लाखाला ऑनरोड मिळाली.(११ फेब २०१९) स्विफ्ट किंन्वा सॅन्ट्रो ची कंपेअर केली तर टेक्निकली आणि लुकनुसार टियागो साधारण वाटते पण काहि वैषिष्ट्ये टियागो सुपिरिअर आहे. एकतर बिल्ड क्वालिटी. नवीन स्विफ्टचा पत्रा पातळ केलाय, वेट ही कमी केलेय खुप मायलेज वाढवण्यासाठी. टियागो मज्बूत आहे तुलनेने. एनकॅप रेटिंग ला ४ स्टार आहेत. अ‍ॅक्सिडेंटला जास्त हानी होत नाही. स्विफ्टचे जरी ४ सिलिंडर आणि टियागोचे ३ सिलिंडर इंजिन असले तरी पेट्रोल मॉडेल ला टियागो जास्त अ‍ॅव्हरेज देते. साधारण २० किमी गावात आणि २५ किमी हायवेवर पडते. स्मूथ आहे. सुरुवातीच्या टियागोत व्हायब्रेशन प्रॉब्लेम होता पण आता नाहीये. पॉवर स्टीअरिंग रिस्पोन्सिव्ह आहे. जागा एका कुटुंबास पुरेशी आहे. लुक म्हणले तर नवीन टियागो मध्ये रॅपाराउंड हेडलॅम्प आणि न्यु ग्रिले आहेत. चांगला दिसतो तो. नवीन यलो कलरही कॅची आहे. सॅन्ट्रो आणि स्विफ्ट्पेक्षा हायवेवर सुरक्षित आणि पॉवर्फुल परफॉर्मन्स देते. फक्त इंजिन रिफाईनमेंटमध्ये उन्नेस बीस फरक आहे. पार्किंग इझी आहे. हरमन कार्डनचे ६ साउंड जबरदस्त आहेत. टाटा कनेक्ट ने अ‍ॅन्ड्रोईड कनेक्टिव्हिटी मिळते. सरव्हिसिंग कॉस्ट कमी आहेत. चांगल प्लॅन घेतले कंपनीचे तर स्वस्तात आण्खीनच पडते. पिकप ड्रॉप सर्व्हिस मिळते. आता टाटाचे पब्लिक बरेच सुधारले आहेत. चांगली सर्व्हिस देतात. फक्त फॅक्टरी फिटेड सीएनजी ऑप्शन अजुन नाही अ‍ॅव्हेलेबल. चलवायच्या दृष्टीने म्हणले तर मलाही आधी येत नव्हती. लायसन होते पन कॉन्फीडन्स नव्हता. प्रॅक्टीसने १ महिन्यात आली व्यवस्थित. ३ ट्रिप सोलापुरच्या झाल्या. १ मुंबईअची. सो आता जमते ठिकठाक.

In reply to by अभ्या..

अभ्या, सविस्तर प्रतिसाद आवडला. First-hand experience मस्त लिहिलाय. तुमचा फोन नंबर मला व्यनी कराल का? ... टिआगो मॅन्युअल चालवण्याचा अनुभव अजून कुणाला आहे का?

In reply to by अभ्या..

Oct. २०१८ ला रेड कलर पेट्रोल टियागो एक्स झेड घेतली. आधी येत नव्हती. पण आता येते, गावी अहमदनगर - राहुरी ला ५-६ वेळा जाऊन झाले. हीच गाडी घेऊन प्रचंड समाधानी आहे. ऐसपैस जागा, मोठी डिकी, सेफ्टी फीचर्स, चालवायला सोपी, आणि सर्वात खास मुझिक सिस्टम. खूप चांगली गाडी आहे, सर्विस सेन्टर्स पण चांगली सर्विस देतात. मायलेज मला हायवे वर २३ पर्यंत मिळते, माळशेज मार्गे जाताना, आणि कल्याण मार्गे मुंबई मध्ये घुसल्यावर पुन्हा १७ - १८ पर्यंत खाली येते. पण तक्रार काहीच नाही.

In reply to by कपिलमुनी

मुनिवर्यांंना +++++ १११११ टीएगो इज बेस्टस बेस्ट..फेमिली कार! मारुती अल्टो(पेट्रोल सीएनजी) मी गेली 9 वर्ष वापरतो आहे. मेंटेनन्स नाही..पण मारुतीची गाडी बॉडी पत्रा कोलिटी टुकार आहे. त्याबाबतीत टाटा ग्रेट.

ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव चांगला आहे. सेदान आहे आणि कम्फर्ट खूप चांगला आहे. पेट्रोल चे अ‍ॅव्हरेजही बरे आहे. तुमचे रनिंग ही कमी आहे. सँट्रो ही हॅच बॅक आहे. सामानाला जागा उरत नाही. मात्र गाडी खूपच चांगली आहे. आय टेन लाँग रन साठी कम्फरटेबल वाटत नाही. तसेच जागा लहान पडते. ( चार लोकांसाठी चांगली आहे) रेनॉल्ट क्वीड ही फारच लहान गाडी आहे. सुझुकी एर्टीगा उत्तम आहे. मात्र यात अगदी मागची रांग फारच अडचणीची आहे. सामान असल्यास तर खूपच अडचणीची ठरते. टाटा टियागो उत्तम आहे. जुन्या गाडी साठी जाणार असाल तर ह्युंडाई एक्सेंट चा पर्याय पहा. सुझुकी स्विफ्ट डिझायर ही चांगली आहे.

मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले ! खालील धागे वाचा, काहीतरी हाती लागून जाईलः १) कुठली घ्यावी कार ? २) सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी???? ३) कुठली कार घेऊ? ४) चार चाकी वाहन खरेदी

In reply to by चौथा कोनाडा

मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले !
सुरुवातीला मला मिसळपाव हे सदस्यनाम घ्यायचं होतं, पण त्याचं मिसल्पव झालं. आता झालं ते झालं, जाऊ द्या. आपलं नाव कुणालातरी आवडलंय यातच आनंद मानून खाली बसतो. बाकी जुन्या धाग्यांच्या लिंकांबद्धल धन्यवाद, साहेब! वाचतो आहे.

In reply to by कांदा लिंबू

:-) संपादक मंडाळा विनंती करून नाव सुधारणा करता येईल ! (पण मिसळपाववर मिसळपाव कसं तरीच वाटतं ना ? त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )

In reply to by चौथा कोनाडा

त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )
तुमच्या सुचनेचा मान राखून कांदा लिंबू सदस्यनाम घेतले आहे.

In reply to by कांदा लिंबू

ज्जे बात हैं ! एक नंबर ! मिसल्पव चे कांदा लिंबू झालात ! ग्रेट, कांदा लिंबू साहेब ! नामांतर चिरायू होवो ! :-)))

ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - सुखद रंग बघून घेऊन टाका ! एकदा चालवायला लागलात की माझी आठवण काढाल !

गोंधळ उडतोय राव.
  • मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
  • ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
  • टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)
असा फ़ीडबॅक मिळतोय. त्यात, क्रंपल झोन, एबीएस, इबीडी, एअर बॅग्स... अशी भुते दिवट्या घेऊन नाचताहेत. कोणता झेंडा घेऊ हाती?

In reply to by कांदा लिंबू

मी १० वर्षे i10 वापरत आहे, हुंडाई च्या गाड्या 5 लोकांसाठी आरामदायी नसतात, वर सुचवलेलें कप्पा इंजिन 12-14 मायलेज देते. शिवाय लोकल कंपनीला महत्व द्या , टाटा समूह समाजाप्रति बांधिलकी दाखवतो आहे आणि शिवाय गाड्या मध्ये सर्व फीचर आहेत, सो लोकल ला व्होकल करा

In reply to by कांदा लिंबू

काहीही विचार न करता ह्युंदाई ग्रँड आइटेन Hyundai Grand i10 Sportz 1.2 Kappa ₹७४११९५/ - सुखद रंग बघून घेऊन टाका ! कारवाल्यानी खर्चाचा विचार करायचा नाही > सगळं सुख केरात जाईल > कंफर्ट बघा > एक नंबर गाडीये !

टाटांच्या गाड्या परफॉर्मन्स नाही म्हणणारे अजून इंडिका च्या काळात वावरत आहेत. तुम्ही टेस्ट राईड घ्या, कम्फर्ट बघा ,रनिंग कोस्ट काढा आणि पुन्हा धाग्यावर या

In reply to by कपिलमुनी

टाटाची इंडिगो डिझेल, आणि टाटाची झेष्ट पेट्रोल वापरलीय. झेष्ट मस्त होती. पेट्रोलचा खर्च जास्त वाटत होता, त्यामुळे ती विकली. तिला एक स्पीडचं बटन होतं ते खूप आवडायचं मला. चांगला रोड लागला त्याला प्रेस केलं ना अहाहा.....! नव्या टाटाच्या कोणत्या गाड्य आहेत आता माहिती नाही. -दिलीप बिरुटे

गाड्यांचे जास्त अनुभव नाही.. पण नवीन गाडी घ्यायची असती तर बजेट थोडे सैल करून मी Vokeswagan किंवा टोयोटो च्या कुठल्या गाड्या आहेत हे पाहिले असते असे वाटते.. पोलो /ameo /liva ect पण तुम्ही जितके जास्त ऐकत वाचत जाल त्यात confusion जास्त होत जाईल असे वाटते..

घेऊन टाका .. याच धंद्यात आहे म्हणून अगदी छातीठोक पणे सांगतो ... पैसा वसूल गाडी आहे ! - विटेकर ( गेली ३२ वर्षे आटोमोबाइल क्षेत्रात खुड्बुड करणारा )

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

चालवून बघा मैं तो खुश हूँ (ए एम टी लॅग सोडला तर, पण आता दीड वर्षात सवय झालीय)

बलेनो घ्या. चाम्गली आहे. अवरेज पण थोडी मागे आदळते असे वाटते. पण इतकं तितकं चालायचंच. -दिलीप बिरुटे (बलेनोवर खुश असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी बलेनो घेणार होतो , पण एकदा खड्डे असलेल्या रस्र्यावर टेस्ट राइड घेतलि , अरारा ... सस्पेशन अतिशय खराब !... त्यामुळे लगेच रद्द केली. बलेनो मध्ये सर्वाधिक लेग रूम आहे . त्यामुळे रीअर सीट कन्फर्ट मस्त आहे .

In reply to by कपिलमुनी

आपले भारतीय रस्ते हायवे सोडले तर जवळ जवळ खड्ड्यांनीच भरलेले आहेत. सस्पेन्शनच्या बाबतीत सहमते...... -दिलीप बिरुटे

मागच्या वर्षी माझी इंडिका जुनी झाली म्हणून नवी गाडी घ्यायची होती तेंव्हा काही संशोधन केले. मारुती ह्युंदाई आणि टाटा या गाड्या भारतात कुठेही दुरुस्त होतात. त्यामुळे या तीनचाच विचार केला होता. आता शहरात गाडी चालवायची म्हणून स्वयंचलितच घ्यायची ठरवली होती त्यामुळे मारुती स्विफ्ट डिझायर AMT ह्युंदाई XCENT AUTO टिगॊर AMT पहिली गाडी मारुती ८०० होती. पण त्याचा पत्रा फारच पातळ आहे आणि एकंदर बांधणी मजबूत नाही अन्यथा मारुतीच्या देखभालीला दुसरा पर्याय नाही. मारुती स्विफ्ट डिझायर गाडी फार छान प्रशस्त आहे पण वजन ८५० किलो. ह्युंदाईच्या गाड्या तुलनेत महाग आहेत आणि सुटे भाग बरेच महाग पडतात. तेवढे( बजेट) सोडले तर गाड्या उत्तम आहेत. टाटाची इंडिका १२ वर्षे चालवत होतो त्यामुळे टाटाच्या गाडीचा भरवसा नक्की आहे. म्हणून शेवटीं टाटा टिगॊर XZA हि गाडी सव्वा सात लाखाला घरपोच घेतली. टिगॊर वजन १०४० किलो. (स्विफ्ट डिझायर वजन ८५० किलो.) हा फरक का? असे विचारले असताना टाटांचे व्यवस्थापक म्हणाले डॉक्टर साहेब A B C तिन्ही पिलर्स मध्ये सुरक्षिततेसाठी ट्विस्टेड आयर्न बार्स आहेत स्टील घरचंच आहे. बाकी टाटा च्या गद्यातील सर्वात चांगल्या बाबी काय आहेत? १) ए सी उत्तम असतो ( नॅनो चा एसी सुद्धा) २) सस्पेन्शन उत्तम असते टाटा च्या गाड्या स्वस्त अशी एक जनमानसात "प्रतिमा तयार करण्यात आली" आहे. त्याच्या पलीकडे पाहायला शिकलात तर टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही बाकी कपिलमुनी यांनी लिहिलेल्या ताजमहालाला माझी वीट लावू इच्छित नाही

ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा विचार करत आहात, (त्याच वेळी उद्या ७ ते १० वर्ष्यानी तिला समजा विकून पुन्हा नवी गाडी घ्यायची वेळ येईल तेव्हा), रिसेल व्हॅल्यू कुठल्या गाड्यांना चांगली मिळेल, असाही एक अँगल, विचारात घ्यावा, असे सुचवितो.

In reply to by mrcoolguynice

7 ते 10 वर्षात टेक्नाॅलाॅजी इतकी बदललेली असूल की जुध्या गाड्यो एकदम विंटेज ठरतील नंतर गाडीविकल्यावर इतके पैसेयेतील हा विचार आत्या करू नका.

२०३० पर्यंत 'electric vehicle' पॉलिसी अंतर्गत पेट्रोल डिझेल गाड्यांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम व्हायची शक्यता आहे. जी गाडी ठरवाल ती लागल्यास electric vehicle मध्ये सहजपणे रूपांतरित करता येईल की नाही हेही विचारून बघा.

In reply to by उमेश पाटील

ट्रायबर ही स्पेस च्या दॄष्टिने बेस्ट एम पी व्ही आहे . पण ... ३ सिलेंडर १.० इन्जिन ७ सीटर साठी खुप कमी आहे. त्यातून ते टर्बो चार्ज नाही. त्यामूळे पर्फोर्मन्स वर परिणाम होतो. शिवाय अव्हरेज कमी आहे. अजुन NCAP crash अजुन टेस्टींग झाले नाही, त्यामुळे सेफ्टि ची खात्री रिझल्ट नंतर देता येईल. मोठ्या फॅमिलि साठी उत्तम गाडी आहे, रेनॉ यासाठी टर्बो चार्ज इंजिन आणणार आहे , ते आल्यावर गाडी उत्तम होइल. बजेट असेल तर अल्त्रोज बेस्ट इन क्लास अहेच .

In reply to by कपिलमुनी

ट्रायबर हि मारुती व्हॅन किंवा इको च्या वर्गातील गाडी आहे. १ लिटरचे ७२ बी एच पी इंजिन घेतले तर ७ जणांना घेऊन घाट चढायला गाडीला कष्ट होतील. शिवाय ए सी जेमतेम चालेल. जास्त माणसे भरायची असतील तर उत्तम तियागो ५ सीट आणि १२०० सिसि इंजिन ८४ बी एच पी. तुलना करून पहा. आरामदायक गाडी हवी असेल तर वर सुचवलेल्या पैकी कोणतीही आपल्या आवडीची गाडी घ्या

In reply to by कंजूस

बरीच कारणे आहेत. टॅक्स हे तर आहेच पण काहीजण कमी पार्किंग जागेसाठी हचबॅक प्रेफर करतात. हॅचबॅक त्याच्याच सेदान पेक्षा थोडेसे जास्त मायलेज देते. ट्रॅफिक मध्ये सोपी जाते चालवायला. फक्त थोडासा जागेचा आणि डिकी चां त्याग इंडियन लोक आरामसे करतात कारण सेदान १ लाखाने तरी महाग असते. सामान ठेवायला हाचबॅक ला लहान का होईना डिकी असते. जास्त असेल तर छतावर करिअर बसवायची सोय असतेच. जवळ जवळ सगळ्याच कंपन्या सेदान आणि हच्बॅक अशा एकाच इंजिन स्पेसिफि केशन चां काढतात. पुंतो आणि लीनिया. इंडिका आणि इंडिगो, टीयागो आणि तीगोर, फिगो आणि अस्पायर, स्विफ्ट आणि डिझायर, लोक त्यांच्या खिषानुसार आणि आवडीनुसार घेतात.

इथे #SaferCarsForIndia या मोहिमेअंतर्गत केलेल्या चाचण्यांचे निकाल आहेत. इथे टिआगोच्या चाचणीचा रिपोर्ट आहे. टिआगोच्या चाचणीचा विडिओ ... सुरक्षिततेचा विचार केल्यास टिआगो / अल्ट्रॉझ घ्यावीशी वाटतेय.

स्वानुभवावरून सांगतो, हैद्राबाद मध्ये प्रामुख्याने गाडी राहणार असेल तर अशी गाडी घ्या कि गाडीला कुणी घासलं, ओरखडा पडला, चढता/उतरता दाराला पोचा आला, सिग्नलला कुणीतरी बम्परला धडकला (किंवा हे असं होणारच आहे हे डोक्यात ठेवा) तर तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही आणि दुरुस्तीचं काम थोडक्यात भागेल. तुम्ही नवी आणि जुनी असे दोन्ही पर्याय खुले ठेवलेत म्हणून, वर ज्या ज्या गाड्या सर्वानी बघा म्हणून सांगितल्या आहेत त्या एकदा चालवून पहा आणि २-३ वर्ष जुनी गाडी घ्या. आपण नोकरदार लोक आहोत, कशाला नव्या गाडीचा घसारा भरायचा? जर नवी घेणार असाल तर ती गाडी पार आयुष्यभर वापरा ( हे माझे मत!).

ड्रीमच राहणार! Shevrolet cruise घ्यायची होती तेव्हा पैसा अन लायकी नव्हती आज थोडा आहे तर गाडीच बंद झाली, चलता है.... परत कधी घेऊचे सगळे पॅरामीटर्स अन आमची गणिते जुळून आली तर मला महिंद्रा थार घ्यायला आवडेल , त्या गाडीत चार्म वाटतो राव एक अलगच

आपली ड्रीम कार सिम्पल स्कोडा रॅपिड रायडर किंवा रायडर प्लस फायनल झालीय ... पुढच्या महिन्यात घेणार आहे ..

माझी ड्रीम कार हिंदुस्तान काँटेसा- . रग्गड पैसे असतिल तर २.० इंजिन टाकून रिस्टोअर करायचे ड्रीम . भारतातील एकमेव मसल्स कार contessa c1

In reply to by कपिलमुनी

कसलं रग्गड प्रकरण आहे राव. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा, देव तुमचे मागणे मंजूर करो हीच प्रार्थना. रच्याकने, कॉन्टेसा घेतली तर थेट केरळात धाडा, काही मित्रांचे अनुभव अन युट्युब मुशाफिरीवरून एक लक्षात येतंय की केरळी लोक गाड्या मोडीफाय, रिस्टोर अन सुंदर बनवण्याच्या कलेत क्रेझी टॅलेंटेड असतात.

In reply to by कपिलमुनी

Contessa is not technically a Muscle car as the original meaning of muscle car is that a performance car built to be focused for drag racing which is a two-door coupe. Contessa is a four-door sedan model, not a drag racing focused car and has only limited power output. १८०० सी सी च्या इंजिनाची शक्ती फक्त ८८ बी एचपी होती. त्या काळात ती शक्ती भरपूर होती. ( उदा मारुती ८०० ची ३७ बी एच पी होती). परंतु आता अगदी सध्या मिड साईझ कार सुद्धा त्यापेक्षा जास्त शक्तीची इंजिने असलेली आहेत. आपली सध्या असलेली टियागो सुद्धा ८४.५ बीएचपी ची आहे टिआगो JTP सुद्धा ११२. ५ बी एच पी ची येते.

In reply to by सुबोध खरे

@डॉक्टर: टाटा टिगोर मध्ये मागच्या सीटची रचना तीन लोकांसाठी आराम दायक आहे का ? इंडिका ही मागच्या सीटसाठी सेगमेंट मध्ये सर्वोत्तम होती, टिगोर मध्ये तेवढी स्पेस आहे का ?

In reply to by कपिलमुनी

तिगोरची लांबी टियागो पेक्षा २३ सेमी ने जास्त आहे (376. 5 सेमी विरुद्ध 399. 3 मिमी) आणि व्हील बेस ५ सेमी ने जास्त आहे ( टिगॊर हि टियागो खेचून लांब केल्यासारखी आहे). त्यामुळे मागच्या सीट च्या लेग स्पेस मध्ये सहा इंचाचा फरक आहे यामुळे टियागो पेक्षा टिगॊर च्या मागच्या सीट वर उंच माणसांना जास्त आरामशीर पणे बसता येते. अर्थात स्त्रियांना/ कमी उंचीच्या माणसांना फारसा फरक पडत नाही कारण दोन्हीची रुंदी सारखीच आहे १६७.७ सेमी. माझी टिगॊर आहे आणि पत्नीची टियागो त्यामुळे थेट तुलना करून पाहिली आहे. https://www.cardekho.com/compare/tata-tiago-and-tata-tigor.htm

पण व्यवहारिक अडचणी मांडू शकतो. 1) भारतातील रस्त्यांची अवस्था बघता ग्राउंड clearance cha vichar करायला हवा. 2) जास्त वेगाने धावणारी गाडी आपल्या इथे योग्य नाही रस्ते धड नाहीत त्या मुळे जास्तीजास्त 100 ते 150 हाच उच्च वेग झाला 3) गाडी ची मजबुती हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे अपघात झाला तर कमीत कमी धोका निर्माण व्हावा. 4) गाडीचा दुरुस्ती खर्च आणि सुटे भाग ह्यांची किंमत कमी असावी आणि उपलब्धता जास्त असावी. 5) कमीत कमी तांत्रिक कमतरता असावी . अपघाताचे तांत्रिक दोष हे मोठे कारण आहे. 6) शहरात पार्किंग ची जागा हा मोठा प्रश्न आहे त्या मुळे गाडीचा आकार पण विचारात घेणे. 7) शेवटी किंमत. आपल्या परवडेल तेवढीच असावी . बँका कर्ज देण्यास तयारच असतात पण गाडी पासून होणारा फायदा आणि त्या वर आपण करत असलेला खर्च ह्याचे गुंनोत्तर योग्य असावे..

कार पेक्षा sub 4 मीटर SUV म्हणजे compact SUV चा विचार करावा असे मी सुचवेन. मग त्यामध्ये टाटांची नेक्सॉन, ह्युंदाईची व्हेन्यु आणि महिंद्राची XUV300 हे पर्याय आहेत. मारुतीने आणि रेनो वा निस्सान ने पण काही मॉडेल आणले आहे वाटते नक्की आठवत नाही. माझ्याकडे टाटा इंडिका व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) सुमारे आठ वर्षापासून आहे, चांगली गाडी आहे, किंमत आणि सुविधा यांचा विचार केल्यास नक्कीच स्वस्त आहे. देखभाल खर्चही जास्त नाही.

In reply to by मराठी कथालेखक

व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन) हे १.३ लिटरचे डिझेल इंजिन जगातील सर्वात जास्त निर्मिती झालेल्या आणि अत्याधिक लोकप्रिय असलेल्या इंजिनपैकी एक आहे. हे अतिशय उत्तम दर्जाचे, थोडेसे आवाज करणारे असले तरी डिझेलचा पुरेपूर वापर करणारे ( कमी डिझेल वापरून जास्तीत जास्त शक्ति देणारे) इंजिन आहे. आता याचे उत्पादन थांबवले असले तरी पुढची १० वर्षे याचे सुटे भाग विकत मिळतील अशी कंपनीने ग्वाही दिली आहे तेंव्हा आपल्याकडे असलेली गाडी आपल्याला अजून ७ वर्षे सुखात चालविता येईल. (तोवर विजेवर चालणाऱ्या मोटारी येतीलच) https://auto.economictimes.indiatimes.com/news/auto-components/goodbye-…

In reply to by सुबोध खरे

माहितीबद्दल धन्यवाद. इंजिन चांगले आहे पण माझ्या कारचे मायलेज तितकेसे चांगले मिळत नाही. अर्थात तो तितकासा महत्वाचा मुद्दा नाही. मला खरं तर टाटा इंजिन असलेली व्हिस्टा घ्यायची होती पण त्यात VX हे सर्वात वरचे मॉडेल नसल्याने मी फियाट इंजिनची गाडी घेतली.

मारूती, ह्युंडाई, टाटा इ. चर्चेवरुन नुकताच मला एकाने पाठवलेला हा मथळ्यासकट्चा मजेशीर व्हिडो तुकडा आठवला : टाटांनी इंडिका हे अतिशय सुमार दर्जाचे डिझेल इंजिन वाहन भारतीय बाजारपेठेत उतरवल्यानंतर पुढील वीस वर्षांत प्रदुषण पातळीत किती भयंकर वाढ होईल याचे भाकित इ.स. २००० मध्येच वर्तविण्यात आले होते. त्यावेळी स्वस्त डिझेल कार आणि डिझेल प्रदुषणाची बरीच चर्चा झाल्याचे आठवतेय ! इंडींका गेमचेंजर ठरली, बाकी इतर कंपन्यांनी देखील अश्या गाड्या बाजारात आल्या. काही वर्षांनंतर प्रदुषण हा विषय दुय्यम होत गेला !

In reply to by चौथा कोनाडा

इंडिका जास्त प्रदूषण करते असे कधी सिद्ध झाले ? इतर कोणत्याही वाहनांप्रमाणेच टाटाची वाहने देखील त्या त्या काळची प्रदूषण मानकांची पुर्तता करणारी आहेत. (बी एस २, ३ वा ४ ई). माझी २०१२ साली घेतलेली व्हिस्टा BS4 मानकांची पुर्तता करणारी आहे. बाकी उत्पादकाने कितीही चांगली , कमी प्रदूषण करणारी वाहने बनवली तरी पुढे तिची योग्य ती आणि वेळचे वेळी देखभाल करणे चालक/मालक यांची जबाबदारी आहे. आणि वाहनचालक हे करतायत की नाही ह्यावर लक्ष ठेवणे ही वाहतूक शाखेची / सरकारची जबाबदारी आहे. याआधीचा PUC हा प्रकार अगदीच निष्प्रभ ठरला होता. आता online PUC मुळे खोट्या सर्टिफिकेटला बराच आळा बसेल अशी आशा करुयात (अर्थात त्यावरही काही जुगाड काढले नाहीतर) . जर टॅक्सी चालकाने आपली इंडिका व्यवस्थित ठेवली नसेल आणि त्यामुळे प्रदूषण वाढले तर त्यात टाटा कंपनीचा दोष कसा ? तसेच डिझेल मध्ये भेसळ होत असेल का ? असल्यास त्यामुळे प्रदूषण किती वाढत असेल याचाही विचार व्हायला हवा.

येणारा काळ हा बॅटरी / इलेक्ट्रिक वाहनाचा आहे, यात काहि शंका नाहि, मध्यंतरि काहि बातम्यात एकले कि भारतात डिझेलचे भाव काहि ठिकाणी पेट्रोल च्या भावापेक्षा जास्त झाले. हि परिस्थिती तात्पुरती आहे कि भविष्यात डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव सर्वसाधारण एकाच पातळीवर राहतील, यावर थोडा प्रकाश टाकावा, डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव यामुळे मालवाहतुक, शेती , उद्योग क्षेत्र यावर होणारा परिणाम हे बाजुला ठेवुन फक्त वैयक्तिक प्रवासी वाहनावर काय परिणाम होइल यावर चर्चा अपेक्षित आहे धन्यवाद

टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक वापरण्याचा अनुभव कुणाला आहे का?

In reply to by वामन देशमुख

मी टेस्ट ड्राइव्ह घेतला आहे. इंजिन टिगॊर चंच आहे. परंतु तेच इंजिन टर्बो चार्जेड असल्याने आणि त्याचा पॉवर मॅप वेगळा असल्याने त्याची शक्ती बरीच जास्त आहे. १२० पी एस आहेआणि टॉर्क १७० एन एम आहे पण तो १७५० आर पी एम इतक्या खालच्या पातळीला येत असल्याने त्या गाडीला जोरदार पीक अप आणि शक्ती आहे. ( तुलनेसाठी टिगॊर ८६ पी एस. टॉर्क ११३ एन एम @ ३३०० आर पी एम). त्यातून स्पोर्ट मोड वर ठेवून चालवली तर एखाद्या रेस कार सारखी वेग घेते. शिवाय NCAP च्या सुरक्षा चाचणीत ५ स्टार आहेत. ( टिगॊर ४ स्टार) ज्याला एस यु व्ही घ्यायची आहे त्याच्यासाठी अतिशय उत्तम. ती गाडी चालवून मी खरं तर तिच्या प्रेमातच पडलो. परंतु माझी एकंदर गरज एवढी ( खरं तर मला गाडीची गरजच) नाही. आणि ती १० लाखाच्या वर जाते. त्यामुळे मी तो विचार सोडला. तुम्हाला आवडली असेल तर एकदा चालवून पहाच.

In reply to by वामन देशमुख

माझ्या कडे BS4 टाटा नेक्सन पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. गाडी अतिशय मजबूत, ग्राउंड क्लिअरन्स उत्तम. शिवाय ऑटोमॅटिक असल्याने लॉन्ग रनिंगला थकवा जाणवत नाही. मात्र गाडीचे मायलेज बऱ्यापैकी कमी आहे, हायवे ला १५-१६ तर शहरात ११-१२, खूप जास्त ट्राफिक असेल तर मात्र ८-९ कि.मी./ली. आणि AMT असल्याने गियर लॅग प्रकर्षाने जाणवतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नंबर गाडी.

टिआगो, अल्ट्रॉझ, आइटेन निऑस आणि आज... निक्सन. आतापर्यंत चार चाचणी-चालने (टेस्ट ड्राइव्हज्) करून झाल्यात. सर्वच गाड्या (safety, comfort, mileage, maintenance...इ चा विचार करता) आपापल्या परीने योग्य वाटत आहेत. घरापासून ३.५ किमीवर सर्वच गाड्यांची दुकाने एका ओळीत आहेत. टाटाच्या शोरूममध्ये अगदी थंड प्रतिसाद मिळाला. ह्युंदाईच्या शोरूममध्ये राजेशाही स्वागत झालं. डाउन पेमेंटची जोड झाली तर किमतीला ९.८४ पर्यंत जाणारी निक्सन एक्सएमए पेट्रोल आवडेल असं वाटतंय. लिंबू-मिरची गाडीच्या ड्राइव्हर सीटवर कांदा लिंबू बसेल पण गाडीच्या ग्रिलला मात्र लिंबू मिरची असेल!

In reply to by कांदा लिंबू

९.८४ लाख बजेट असेल तर एकदा होंडा अमेझ ची टेस्ट राईड घेउन बघा