Skip to main content

तंत्र

पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 25/03/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.

करोनाची लस : एक थोतांड

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 01/03/2021 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

आमचा Valentine Week - तेरी बिंदिया रे!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 22/02/2021 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे! "Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!" जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती. नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत.

अप्रिय आठवणींपासून सुटका

लेखक शाम भागवत यांनी सोमवार, 06/07/2020 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या.

चिनी चाणक्यांच्या चातुर्य निती

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
खोटे का होईना कोणा परकीयाने कौतुक करावे त्याने हुरळून जावे मग प्रत्यक्षात परकीय केवळ स्वार्थाने वरवर तुमच्याशी गोड स्तुती सुमने उधळून प्रत्यक्षात मार का देत नाही. भारतात चाणक्याच्या नावाची चर्चाच अधिक चाणक्य नितींचा वापर कमीच असावा. -उलट इतर देशात त्यांच्या त्यांच्या चाणक्य निती प्रभावीपणे वापरात दिसतात. अपयशाने बर्‍याचदा न्युनगंड येतात आणि न्युनगंड झाकण्यासाठी बर्‍याचदा अहंगंडाचे प्रदर्शन केले जाते त्या भरात दुसर्‍याकडचे अगदी शत्रुकडचेही चांगले आत्मसात करून घ्यावे याचा सोयीस्कर विसर पडतो.

यंत्र

लेखक निखिल आनंद चिकाटे यांनी सोमवार, 25/05/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

आठवणीतील याहू चॅट रूम्स

लेखक पर्ण यांनी सोमवार, 23/03/2020 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती...