Skip to main content

तंत्र

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

लेखक Trump यांनी शुक्रवार, 08/10/2021 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/08/2021 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

क्रेडीट कार्ड

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 31/07/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं. मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे.

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

~ गोष्ट अक्षतची ~

लेखक पिंगू यांनी रविवार, 04/07/2021 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.

शालेय गणिताचा दैनंदिन जीवनात फायदा ,भाग १

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 21/06/2021 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मित्रांनो आपण सगळे इंजिनेर / सी ये किंवा बाकी शिक्षणात advanced अर्थात अधिकांश गणित शिकला असाल पण जे १० पर्यन्त चे गणित आहे त्याचा किती वेळा उपयोग झाला आहे ?

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

मनोगत

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 30/04/2021 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
खिशात माझ्या घेऊनि फिरतो वादळ घोंघावते इंद्रधनू भवताली माझ्या सतरंग पसरते भावनांचा लाव्हा जिभेवर आस नाही मज कसली यमकांची मोळी बांधुनी मी विस्तवात टाकली जान्हवी जणू डोळे माझे जिथे तिथे पोहोचते अनुभवाची लाट उसळुनी मनसागरात धडकते लखलखतो तो सूर्य हाती शब्द जाळत फिरतो विसरतो मी रीत सारी आठवेल ते लिहितो कधी बरसतो मेघ सावळा थेंबे थेंबे पाणी काव्य नसे हे अव्वल मित्रा हि तर अनुभवाची कहाणी .... हि तर अनुभवांची कहाणी ................. ===================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

आवाज बंद सोसायटी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'. ध्वनी प्रदूषण तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता.

टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 05/04/2021 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. २० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व. स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं.