मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगभूमीवरची पहाट

जे.पी.मॉर्गन ·

मिसळपाव 07/11/2022 - 04:13
काय सुरेख लिहिलं आहेस रे! याची डीव्हीडी उपलब्ध करतात का ही मंडळी नंतर? "
आतडं पिळवटून आलेल्या स्वगताला मिळालेलं अंतर्मुख, नि:शब्द शांततेचं बक्षीस.
" क्या बात!

मस्त लिहीलय, सुदंर लिहीलय.... असे लिहीणे म्हणजे "तुझे सुरज कहू या चंदा " सारखे होईल. ७०ते ७४ रंगभूमी अगदी जवळून म्हणजे विंगेतून, मेकप रूम ते तिकीटाची खिडकी. दुर्वांची जुडी, दिपा डे,जाॅनीबाबू,अझीझ नाझा,आदरक के पंजे ते घाशीराम पर्यंत पुणेकरांनी केलेले प्रेमही बघितले. अभिषेकीबुवा,पं वसंतराव, पणशीकर, दादा कोंडके ,कानिटकर, जयवंत दळवी,शांता जोग,लागू जब्बार,मोहन आगाशे.... अरे किती नावे घेऊ जणू नावाचा लोंढा... यांना सर्वाना जवळून बघीतले, ऐकले,आणी बोललो सुद्धा. निवृत्तीनंतर बालगंधर्व मधे जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर नाटक बघायला गेलो होतो. वेळ होता पाठीमागे चहा घ्यावा म्हणून कॅन्टीन मधे बसलो होतो. तेवढ्यात नाटकात काम करणारे दोन नावाजलेले कलाकार जवळच्या टेबलावर आले. आंनद झाला . दोन शब्द बोलावे म्हणून उत्साहात जवळ गेलो पण प्रतीसाद बघुन निराशा झाली. त्यावेळेचे कलाकार व आजचे यात फार मोठा फरक जाणवला. आसो काही कारणे असु शकतात. कदाचित रसिकही या करता जबाबदार असतील.

काही गोष्टी बदलतात त्या जास्त स्मार्ट होत जातात, ते व्हायलाच पाहिजे हे खरंय. आधीच्या पिढ्यांची जबाबदारी आहे ती ह्या मुलांचा "पाया" भक्कम करण्याची. त्यांच्यात "साधना" "समर्पण" आणि "संयम" बिंबवण्याची. मूल्यं, तत्वं, नैतिकता ह्या गोष्टी भिनवण्याची. आपण त्यांच्यासाठी मार्ग बनवण्याची गरज नाही, त्यांना मार्ग शोधणं शिकवायचं बस. क्या बात है! हो अशी तरुणाई दिसते आणि 'कसं होणार पुढच्या पिढीचं' हे विचार कुठल्या कुठे पळून जातात.

अतिशय सुंदर लिहिलंय. आमच्याकडे नुकताच युवकमहोत्सव झाला. एकांकिका पाहण्यात मजा असते. स्क्रीप्ट नव लेखकाच्या असतात. पण, अभिनय, संवाद मजा असते. आपण लिहिलेलं सगलं पोहोचलं. धन्स. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

अनिंद्य 07/11/2022 - 16:35
रंगमंच जवळ करणारी आणि नाट्याविष्कारांना प्रतिसाद देणारी नवी पिढी घडतेय,आनंद वाटला. उत्तम असेल ते / तर नाटक टिकेल... आशावादी राहू यात. दरवर्षी पुण्यातला विनोद दोषी थियेटर फेस्टिवल, त्यातली नव्या-जुन्या विविधभाषी नाटकांची मेजवानी चुकवत नाही. तरुणांचा भरपूर प्रतिसाद दिसतो. आता 'सारंग' नावाने तो जलसा करतात बहुतेक, कोरोनापश्चात जाणे झाले नाही :-( खुंटा, खुंट, खुंटी - भारीच !

मित्रहो 09/11/2022 - 16:45
सुंदर लेख आणि अनुभव नाटक करुन पोट भरणार की नाही हा मुद्दा वादाचा आहे पण नाटक कधी मरणार नाही हे मात्र खरे. मनुष्य जन्माला आला की काही महिन्यातच नाटक करायला शिकतो. नाटक करायला दोनच गोष्टी लागतात नाटक करण्याऱ्यांचा उत्साह, दाद देणाऱ्यांचा जोष.

पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते. त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अ‍ॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.

कांतारा ए लेजेंड

अनुस्वार ·

यश राज 30/10/2022 - 17:37
कांतारा बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते
अगदी +१ चित्रपटाच्या शेवटाबद्दल खूप ऐकले आहे . प्रसार माध्यमांमध्ये काही क्लिप्स पाहिल्या त्या बघून वरील वाक्याची खात्री पटते. तसेच "वराह रुपम" गाणे खूप सुंदर जमले आहे. रिषभ शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे व सर्व मेहनत सार्थकी लागली असे मला वाटते.

In reply to by यश राज

अनुस्वार 30/10/2022 - 21:12
'वराह रूपम' हे गीत आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत अव्वल दर्जाचे आहे. 'कोला' नृत्यातील एक विशिष्ट मर्मभेदी आवाज तर चित्रपट संपला तरी कानात घुमत राहतो.

In reply to by वामन देशमुख

अनुस्वार 31/10/2022 - 21:23
आपल्याला आवड असल्यास मुळ भाषेत पाहणे कधीही उत्तम. आणि तसंही कांताराचं हिंदी डबींग जरा घाईत उरकलंय असं वाटलं. डबींग चा दर्जा आणखी चांगला हवा होता.

गणेशा 31/10/2022 - 23:27
कांतारा अतिशय सुंदर चित्रपट आहे, मास्टरपीस असे म्हणता येणार नाही परंतु एक उत्क्रुष्ट कलाकृती म्हणुन या सिनेमा कडे पाहता येईल.. आलेगाव (शिरूर) ला यात्रेला देव -दानव असे कोला type युद्ध दरवर्षी पाहतो.. त्यामुळे हा सिनेमा जास्तच जवळचा वाटला.. ऋषभ शेट्टी भारीच...

Bhakti 01/11/2022 - 10:57
फक्त क्लायमॅक्स पाहण्यासाठी थेअटरला जावं का हा प्रश्न आहे.सिनेमा ओव्हर रेटेड आहे असेही वाचलं.त्यामुळे OTT वर पाहणार आहे.अगदी ..तुम्बाड कधीही सरस असणारं.त्यात अनेक भावनांच मिश्रण आहे.

In reply to by Bhakti

अनुस्वार 01/11/2022 - 13:12
बाकी चित्रपटही सुंदरच आहे. लक्षात राहण्यासारखा अनुभव येईल. फक्त तुम्बाड सारखं काहीतरी पाहायला मिळेल या अपेक्षेने गेलात तर‌ हिरमोड होईल.

श्वेता२४ 02/11/2022 - 11:20
बहुदा मी फारच अपेक्षेने गेले होते. पण मला अजुनही कळत नाहीय हा सिनेमा मला तितकासा का आवडला नाही. या चित्रपटाची आणि तुम्बाडची तुलनाच होऊ शकत नाही. पूर्णपणे वेगळ्या कथा , विषय व मांडणी आहे. या सिनेमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे समजलं नाही. अंगात देव येणं हे खरं आहे व काही ्मानवीय/दैवी प्रसंग खरे असतात असंच या सिनेमातून दिसतंय. खरंतंर हा श्रद्धेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे तितकासा भिडला नाही. हो. पण ही फॅन्टसी आहे असं समजून मी या सिनेमाकडे आता पाहते तेव्हा आता या सिनेमाच्या काही ठळक गोष्टी जाणवतात. जसं की आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते त्यावरचे त्यांचे अवलंबित्व. शिवा त्या इन्सपेक्टरला म्हणतो की या जंगलात माझ्या आधिच्या कित्येक पिढ्या तुमचे सरकार अस्तित्वात असण्यापूर्वीपासून राहतात. तुमच्या सरकारने त्यांची परवानगी घेतली होती का? हा संवाद खाडकन डोळे उघडणारा आहे. आधी जय भीम व आता कंतारा यामुळे आदिवासींचे निसर्गाशी जोडले गेलेले जीवन अजून समजून आले एवढे नक्की. त्यानुसार हा सिनेमा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. नायकाचा व इतर सर्व पात्रांचा अभिनय उत्कृष्ट व नैसर्गिक. क्लायमॅक्स मस्तच.

In reply to by श्वेता२४

अनुस्वार 02/11/2022 - 12:27
सध्या सार्वजनिक जीवनात कोणतीही गोष्ट चर्चेत असली की‌ प्रत्येकाला शक्य तितक्या प्रकारे त्यावर टिप्पणी करायचीच असते (बऱ्याचदा निव्वळ मनाच्या थापा). मग अशाने कितीही टाळले तरी या गोष्टींबद्दल चक्क आपलीही काही मतं/अपेक्षा तयार होतात. तुम्बाड ची अपेक्षा ठेवून गेले आणि कांतारा निदान त्या दिवसापुरता तरी अगदीच सामान्य चित्रपट वाटला असा अनुभव माझ्या काही मित्रांनी घेतल्याने मी सावध होतो. म्हणून मुळ लेखात मी एक चित्रपट म्हणून कांतारा छान अनुभव आहे एवढंच नमुद केलंय.‌ याच सामाजिक दबावामुळे [ FOMO (fear of missing out) ] मी KGF Chapter 2 चित्रपटगृहात पाहायला गेलो आणि PVR मधील आयुष्यातली पहिली झोप पूर्ण करून आलो.

कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

पराग१२२६३ ·

कंजूस 23/10/2022 - 14:38
भायखळा स्टेशन सेंट्रल रेल्वेने हाजीअली,महालक्ष्मी,नेहरू सेंटर,तारांगण,राणीचा बाग जाण्यासाठी कामाचे. पण ती जुनी शेड अजूनही जपल्या बद्दल कार्यकर्त्यांचे आभार. भांडूप मात्र बदलून टाकले. सायन/शीवही ऐतिहासिक.

प्रदीप 24/10/2022 - 22:27
नेहमीप्रमाणेच तुमचा रेल्वेविषयक माहितीपूर्ण लेख आवडला.

Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.

आज ही दिवाळी तशीच आहे...

कर्नलतपस्वी ·
आज ही दिवाळी तशीच आहे... चार का होईना पण डबे आजही फराळाचे भरतात नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना पण चार वाजता उठतात आज ही दिवाळी तशीच आहे... डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी कपाटे भरली असली तरी मोती साबण आवर्जून घरी येतो अनारसे, करंजीचा नैवेद्य पूजेच्या थाळीत आजही सजतो आज ही दिवाळी तशीच आहे... थोडे फटाके सुद्धा वाजतात धुर सुद्धा होतो मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो फक्त आजच्याच दिवस हं!

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

निमिष सोनार ·

चौथा कोनाडा 25/09/2022 - 17:20
खुप छान माहिती ! नविन नविन असताना जून एंडला भेट दिली होती झपुर्झा म्युझियमला. (तेव्हा प्रवेश विनामूल्य होता) हाफ डे फॅमिली ट्रीप साठी साठी पुण्यापासून जवळ अतिशय सुंदर ठिकाण आहे! आर्ट लव्हर्ससाठी मेजवानी आहे ! एखादा मिपा कट्टा इथे झाला तर मजा येईल.

In reply to by कंजूस

जागा महाग होत आहेत आणि अशा संस्था चालवणे अवघड होत चालले आहे. अशा संस्थांसाठी जागा ही सर्वात अवघड गोष्ट असावी.

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 26/09/2022 - 17:58
बरोबर ! ... पण फक्त जागा नाही, दैनंदिन खर्च, सेवक वर्गांचे पगार, देखभाल इत्यादि...

गुगल मॅप्सवर खूप फोटो उपलब्ध आहेत. उत्तम संग्रह दिसतोय. त्यात खडकवासला बॅकवॉटर जवळ असल्याने संग्रहालय + इतर फिरणं असा फुल्ल दिवस कार्यक्रम करण्याचा पर्याय आहेच.

पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 04/09/2022 - 15:17
भारतातले सर्व जण आफ्रिकेतूनच आले आहेत हे कळले आहे. काही अगोदर थेट मंगळूरूमध्ये आले आणि भारतात पसरले.

तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली. मी विचारलं- “आणी ब्राह्मण?” तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.

तमिळनाडूचा ईतिहास भाग - ४

अमरेंद्र बाहुबली ·

सुबोध खरे 02/09/2022 - 11:53
गुगल भाषांतरावरअधिक संस्कार करणे आवश्यक आहे. जसेच्या तसे भाषांतर केल्यास वाचायला विचित्र वाटते. Don't come to conclusion who is right and who is wrong याचं ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर हे जसंच्या तसं भाषांतर वाटतंय

चामुंडराय 03/09/2022 - 23:51
छान लेखमाला. नवी माहिती मिळते आहे. परंतु मराठी लेखमालेत "मैक्समूलर" आणि "स्कैंडिनैवियाई" हे हिंदी शब्द का वापरले आहेत? हिंदीचे मराठीवरील आक्रमण चिंताजनक आहे.

ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला. आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे.

तमिळनाडूचा ईतिहास भाग-३

अमरेंद्र बाहुबली ·

अ बा : मूळ लेखक- प्रविण झा की प्रकाश झा . भाग १ मध्ये मूळ लेखक- प्रकाश झा लिहले आहे आणी पुढील भागात मूळ लेखक- प्रविण झा .

विजुभाऊ 02/09/2022 - 10:30
तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.
सहमत. उत्तरभारतीय कुठेही गेले तरी दुसर्‍याची भाषा लवकर आत्मासात करत नाहीत.

विवेकपटाईत 02/09/2022 - 10:49
एक किस्सा काही वर्षांपूर्वी वाचला होता. बनारस मध्ये राहणारा कन्नड ब्राह्मण ब्रिटिश सेवेत होता. साहजिक आहे अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता. एक दिवस आर्य द्रविड यावर वाद झाला. ब्रिटिश अधिकारी त्याला म्हणाला तू आर्य आहे कारण तुझा रंग स्वच्छ आहे. त्यावर त्या ब्राम्हणाने उत्तर दिले सर माझ्या कडे 25 पिढ्यांची वंशावळी आहे. फक्त गेल्या 10 पिढ्यांपासून आम्ही बनारस मध्ये आहोत. आर्य आणि द्रविड भेद तुम्ही केलेला आहे आम्ही नाही. त्याचे म्हणणे ब्रिटिश अधिकार्‍यालाही पटले.

In reply to by विवेकपटाईत

कपिलमुनी 02/09/2022 - 11:28
अनेक पिढ्यांपासून बनारस इथे वास्तव्य असल्याने रंग उत्तर भारतीयांसारखा झाला होता हे म्हणजे अमेरिकेत गेलेले भारतीय अजून काही वर्षांनी ब्लोंड होणार तर..... पण आफ्रिकन गुलाम अजून कसे गोरे झाले नाहीत ..?? इथे १० पिढ्यात रंग बदलला

चौथा कोनाडा 14/09/2022 - 17:30
इंग्रज आधी दक्षिणेत पोहोचल्यामुळे दक्षिणी लोकांना हे पूर्ण पाने जाणवले असेल की आधुनिक असेल, पाश्चात्य ज्ञान हवे असेल तर इंग्रजी भाषा फायदेशीर असेल ... आणि याचमुळे भाषा लवकर आत्मसात केली असावी. एफ.. F.. रोचक लेखमाला वाचत आहे.

ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती. कुणी असं मानत असेल की ऊत्तर भारतीय अधिक पाश्चात्यनी “स्ट्रीट स्मार्ट” आहेत नी दक्षीण भारतीय पारंपारीक रूढावादी आहेत तर ते चुकीचं आहे. तसेच हे माननं ही चुकीचं आहे की तमीळींनी ईंग्रजी ऊत्तर भारतीयांशी संवाद साधण्यासाठी शिकली. ते ही भाषा शिकण्यात ऊत्तर भारतीयांपेक्षा एका शतकाने पुढे आहेत.