मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश

विवेकपटाईत ·

सुरिया 25/01/2023 - 17:03
जनासीं मीत्री करीना। कठिण शब्द बोले नाना। मूर्खपणें आवरेना। कोणीयेकासी॥ . पटले अगदी सर्वच लेखन वाचून

जीभेचा बोलविता धनी वेगळाच आहे. जीभ तर आज्ञाधारक मजूरच नाही का! बिचारी उगाच बदनाम आहे. द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो महाभारत कुठल्याच एका घटनेमुळे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल.

लेखनविषय:
लेखनप्रकार
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात: जनासीं मीत्री करीना। कठिण शब्द बोले नाना। मूर्खपणें आवरेना। कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥ याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते.

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

चित्रगुप्त ·

In reply to by चित्रगुप्त

अशासाठी की, परवाच एका जवळच्या मित्राबरोबर त्याच्या वडिलांच्या वृध्दापकाळाने आलेल्या आजारपणाबद्दल चर्चा झाली. थोडक्यात सांगायचे तर त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलेले आहे जवळच्या माणसांसोबत शेवटचे काही दिवस घालवण्यासाठी. मित्राला म्हणालो, तू जात का नाहीस, तर त्याचे उत्तर जवळपास माझ्या विचारांशी मिळतेजुळते होते. तो म्हणाला, ज्या वडिलांना लहानपणापासून वाघासारखं पाहिलंय त्यांना असं अंथरूणाला खिळलेलं नाही बघवणार. शिवाय, भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार. अजून बरीच चर्चा झाली. माझी एक सख्खी मावशीही पॅरालाईज होऊन अंथरूणाला खिळून आहे आणि मला शेवटंच बघायचं म्हणतीये. तिलाही बघायला मला जाऊ वाटत नाही कारण, मनात एक भयानक गिल्ट आहे की मी तिला बरी नाही करू शकलो. तिलाही मी लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना पाहिलंय, आता त्या अवस्थेत तिला नाही बघवणार. अजून एक, फार पूर्वी फिरोज खान नावाच्या एका हिंदी कवीची एक रचना वाचनात आली होती ती इथे देतो. ये भोर ठंडी है एकदम जैसे कि ठंडा है मेरा जिस्म ठंडी चीजें मर जाती हैं मैं भी मर जाऊँगा एक रोज मेरे मरते ही मर जाएगा ये शहर ये वतन ये दुनिया मर जाएगी मेरे मरते ही स्मृतियाँ मर जाएँगी मर जाएँगी मेरी प्रेमिकाएँ मेरी माँ मर जाएगी जिसके मरने का सताता रहा है डर वो पिता मर जाएगा मेरे मरते ही वे सब मर जाएँगे जिनके जीने की दुआएँ की थीं मैं एक खंडहर हूँ या कि हूँ एक ईश्वर ढह जाऊँगा एक रोज मैं मर जाऊँगा मेरे मरते मर जाएगा ईश्वर भी थोडक्यात काय तर, मृत्यू हा विषय अस्वस्थ करणारा असला, नकोसा असला तरी त्याच्या वेळेला तो येतोच. त्याला काय सुख-दु:ख, भाव-भावना, जाणीवा-वेदना असा कसलाही स्पर्श नसतो. ती असते फक्त एक घटना. पण तरीही, मानवी मन त्याला चटकन स्वीकारत नाही. आपल्या रक्ताचे, जवळचे, परिचयातले कोणीही जाते तेव्हा दु:ख हे होतंच. अजून तरी ती पिढी यायचीये पृथ्वीवर जी भावनांवर विजय मिळवून फक्त भविष्याकडे मार्गक्रमण करत राहील. कदाचित, मृत्यूवरही विजय मिळवेल. पण आतातरी आपण सर्वजण सामान्य मानव आहोत. जे भावनांपासून अलिप्त नाही राहू शकत. प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी असू शकते कदाचित. म्हणूनच एक सामान्य माणूस म्हणून मी विचार करतो. मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे. तुम्हांला काही वेगळं वाटलं असेल तर तो माझा लेखनदोष आहे. मी कितीही तुमच्या, माझ्या आईवडिलांच्या, स्वतःच्या किंवा आणखी कुणाच्या दीर्घायुष्याची कामना केली तरी त्यालाही मर्यादा आहेत हेही मी जाणून आहे. पण कुणाचेही जाणे किंवा त्याबद्दल कल्पना करणेही काही काळापुरते का होईना क्लेषकारक असते. एकूणच काय मृत्यूसारख्या भयकारी आणि नकोशा वाटणार्‍या विषयाचे चक्र डोक्यात सुरू झाले. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

सस्नेह 25/01/2023 - 19:36
मृत्यू नकोसा भयकारी, अस्वस्थ करणारा ही संकल्पना सोडली पाहिजे. मृत्यू हे खरोखर वरदान आहे, अपंग, आजारी, परावलंबी, अंथरुणाला खिळलेल्या जीवनापेक्षा. सुरेश भटांचे शब्द अगदी चपखल आहेत इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.. चित्रगुप्त यांचा लेख अगदी उचित आहे. व्याप कमी करणे, वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हे मृत्यूला हलक्या मोकळ्या मनाने सामोरे जाण्यासाठी आवश्यकच आहे.

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 25/01/2023 - 19:51
तरुणपणी मृत्यू हे सुंदर काव्य असतं. उतारवयात ते एक रुक्ष आणि भीतीदायक असे गद्य होऊन जाते श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 25/01/2023 - 21:37
संदीपभौ, तुमच्या मित्राने मृत्युशय्येवरील वडिलांना भेटायला न जाणे, आणि अंथरुणाला खिळलेली मावशी - जिला तुम्हाला भेटायची इच्छा आहे - तिला भेटायला न जाणं हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही.
--- वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल, त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही. भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू , आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय?
कर्नल तपस्वी यांच्या वरील प्रतिसादाशी मी शतप्रतिशत सहमत आहे. तुम्ही तुमच्या मावशीला भेटायला जाऊन - तुमच्या लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना तिला पाहिलंय, आणि तिच्या आपुलकीमुळे, कष्टांमुळे सगळ्यांचे कसे भले झाले वगैरे - तिला नक्की सांगा. त्या माऊलीला जे समाधान वाटेल, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. -- तुमच्या मित्राच्या बाबतीत तपस्वींनी माडलेली 'काळी बाजू' माझ्या लक्षात आली नव्हती, पण ती एक वस्तुस्थिती आहे.
भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार.
'बाकी' काय व्हायचे असते ? अशा वेळी आई-वडिलांना मिठी मारून रडणे, हेच महत्वाचे असते. रडारड होणे यात काहीही गैर नाही, व्यक्त व्हा, मुक्त व्हा.
मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे.
तुमच्या मनातील माझ्याविषयीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात, हे खरोखर माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आपण वृद्धपणी सुद्धा कुणालातरी हवेसे वाटतो, हा केवढा मोठा दिलासा असतो, हे त्या स्थितीत आल्यावरच समजते. अनेक अनेक आभार. इथे मला आपले मिपाकर 'चौकटराजा' आठवतात. त्यांचे अकाली जाणे अनेकांना चटका लावून गेले. 'मरावे तरी कीर्तीरूपे उरावे' याचे उदाहरण. प्रत्यक्ष मृत्युपेक्षाही त्यापूर्वीच्या काळात अनेकांची झालेली विविध प्रकारची दुर्दशा आपण ऐकलेली-पाहिलेली असते, त्यातून मृत्युविषयक भिती उपजते, असे मला वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 24/01/2023 - 15:46
पसारा आवरला गेला पंत. त्यातून मुक्त झालो आहे. लेखातील शेवटल्या काही परिच्छेदात त्याविषयी लिहीलेच आहे. आवश्यक सामान इंदौरच्या घरात नेऊन ठेवलेले असले तरी त्याबद्दल आता मनात काहीही मोह उरलेला नाही. (ते सगळे चोरीला गेले तरी काही वाटणार नाही, अश्या अवस्थेला पोचलो आहे.) अनेक आभार.

Bhakti 24/01/2023 - 14:58
मावळतीच्या रंगात मनासारखे चित्र साकरणारे हळूवार लिहिले आहे.

माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात तुमच्या सहचारिणीला किंवा तुमच्या वारसदारांना काही महत्त्वाच्या गोष्टींचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, तुम्ही ती घेतच असाल. तुम्हाला आणि इतरांना मी या गोष्टी सुचवतो. तुम्ही तुमच्या सामानाची विल्हेवाट लावतच आहात त्याला पूरक अशा मी आणखी दोन गोष्टी सुचवतो. माझ्या औधत्याबद्दल आणि आगावूपणाबद्दल क्षमा असावी. ब्लॅक बुक / तुमचा आवडता रंग> बुक : माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात संबंधित सर्व आप्तांना आणि विशेषतः सहचारिणी/जोडीदारांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत काही गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. कृपया हे ध्यानात घ्या की तुमचा जोडीदार विनासायास या गोष्टी वाचून समजून घेऊ शकेल अशी स्पष्ट आणि विस्तृत पण साध्या सोप्या भाषेत हे वाचणार आहे. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्युमेंट झाले. ते कोणाकडूनतरी वाचून घ्यावयाचे असते. त्याचा अर्थ हे तज्ञ लावतात. (म्हणजे वकील). हे ब्लॅक बुक हे मृत्यूपत्र नसावे तर त्याला पूरक अशी माहिती साध्या सोप्या शब्दात कळेल अशी आणि जी माहिती मुत्यूपत्रात येऊ शकत नाही अशी पण महत्त्वाची माहिती संकलित करणारे असावे. हे बुक हार्ड म्हणजे लिखित/छापील स्वरूपात असावे. फक्त डिजीटल स्वरूपात नको. छापील+ डिजीटल असेल तर चांगलेच! यामध्ये फक्त फॅक्चुअल माहिती ठेवावी. भावनिक आणि वैयक्तिक नको. काही उदाहरणे - १. तुम्ही जो इमेल अ‍ॅड्रेस अनेक लीगल कामांसाठी वापरला आहे त्याचा पासवर्ड. तो इमेल अ‍ॅड्रेस डिअ‍ॅक्टिवेट करण्यासंबंधी सूचना २. तुमच्या सगळ्या अ‍ॅसेट्स (स्थावर जंगम, वाहने इत्यादी) यांची यादी. त्यासंबंधीची महत्त्वाची डॉक्युमेंट्स कुठे आणि कसे स्टोअर केले आहेत त्याची पूर्ण यादी. ३. तुमच्या सगळ्या लाअ‍ॅबिलिटीज ( कर्ज, उधारी-उसनवारी, नवस-सायास, दानधर्म, सेवा) यांची यादी आणि अर्थातच त्यांची कागदपत्रे, परतफेड करण्यासंबंधी सूचना इत्यादी. ४. तुमच्या सगळ्या सर्जनात्मक कामाची यादी. उदा. तुमचे पेंटिंग्ज. त्यांचे स्वामित्व हक्क आणि त्यासंबंधीच्या सूचना, कागदपत्रे यांची यादी. ( कृपया हे हलक्यात घेऊ नका. तुमच्या पश्चात तुमच्या आप्तांना या गोष्टींशी डील करावे लागणार आहे हे नेहमी लक्षात घ्या ) ५. सर्वात महत्त्वाचे - तुमच्या सर्व विम्यांची माहिती. त्यांचे नॉमिनीज. त्या त्या ऑनलाईन अकांऊंट्स चे पासवर्ड. ६. इतर महत्त्वाच्या ऑनलाईन अकांऊंट्सची माहिती. त्यांवरील तुम्ही लिहीलेल्या अनेकविध सर्जनात्मक कामाची प्राथमिक माहिती. ७. तुमची वैयक्तिक कागदपत्रे कशी आणि कुठे आहेत यांची सुस्पष्ट माहिती ८. ज्या गोष्टी तुमच्या वारसदारांनी पुढे चालवाव्यात अशा पारंपारिक गोष्टी. उदा. तुमचे घड्याळ जे तुम्हाला वंशपरंपरेने मिळाले आहे. एखादे फर्निचर, किचनवेअर जे पुढच्या पिढ्यांनी वापराव्यात, एखादी साधी पण कुटुंबासाठी मौल्यवान असलेली गोष्ट. उदा. तुळजाभवानीची परडी + कवड्यांची माळ ९. मृत्यूपश्चातल्या सूचना - विशेषतः अंतिम संस्कार आणि तशा सूचना. विद्युतवाहिनी इत्यादी. किंवा तुम्हाला तुमच्या अस्थी नद्यांमध्ये विसर्जित करू द्यायच्या नाहीत. किंवा तुम्हाला तुमची समाधि बांधणे नको आहे. किंवा तुम्हाला तुमच्या नावाने तुमच्या मुलांनी महावृक्ष लावावेत असे वाटत असेल तर. खूपदा आपण आयुष्यभर काही मूल्ये धरून आणि जमेल तशी पाळून आयुष्य कंठतो. परंतु परंपरेच्या नावाखाली आणि इतर सामाजिक दबावाखाली आपले वारसदार/पश्चातकुटुंब त्या मूल्यांविरोधी नकळत (त्यांचा दोष नसतो ) कृती करतात. तसे होऊ नये आणि तुमच्या मूल्यांचे पावित्र्य जपले जावे अशा सूचना. इत्यादी इत्यादी.. यादी वाढवता येईल. पण महत्त्वाचे म्हणजे या नोटबुक मध्ये फक्त माहिती आणि सूचना ठेवाव्यात. व्हाईट बुक/ तुमचा आवडता दुसरा रंग> बुक : या मध्ये तुम्ही वैयक्तिक गोष्टी ज्या तुमच्या जोडीदाराने वारसदारांनी समजून घ्याव्यात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी. राग लोभांचे निराकरण, इच्छा आकांक्षांचा आढावा, कुटुंबाकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा, त्यांना आशीर्वाद, सदिच्छा अशा भावनिक गोष्टी लिहून ठेवाव्यात. जी गुपिते तुमच्याबरोबरच जातील अशी गुपिते लिहिली नाहीत तरी चालतील. परंतू उद्या तुमच्या पार्टनरला/वारसदारांना ती अचानक कळाली तर त्यांना धक्का बसू नये म्हणून शक्यतो मनमोकळेपणाने लिहावे. उदा. तुम्ही दोन महिने रॉ मध्ये अंडरकव्हर एजंट होता इत्यादी! जोक्स अपार्ट, काही गैरसमज तुमच्या माघारी इतरांना छळू नयेत अशी काळजी घेण्यासाठी हा प्रपंच! नेहमीप्रमाणे, तुम्हाला आनंद लाभो हीच सदीच्छा!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चित्रगुप्त 25/01/2023 - 11:50
@ हणमंतअण्णा: उपयुक्त आणि मौल्यवान सूचना आणि सदिच्छेबद्दल अनेक आभार. कायदेशीर 'इच्छापत्रा'खेरीज आणखी दोन वेगवेगळी पत्रे करून ठेवणेही तितकेच महत्वाचे, गरजेचे आणि उपयुक्त आहे हे अगदी खरे. ढोबळपणे तसे थोडे केलेले असले, तरी हा प्रतिसाद वाचून ते काटेकोरपणे आत्ताच करून ठेवायला हवे हे जाणवले.

कंजूस 24/01/2023 - 16:47
मीही त्यातलाच हे अगदी थोडक्यात म्हणेन. भरपूर सामान छंदापायी जमवलं आहे. विल्हेवाट कशी लावायची ते माहीत नाही. रोज बोलणी खावी लागतात.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 09/08/2023 - 03:29
@ कंजूसः छंदापायी तुम्ही जमवलेलं सामान बघायला यायला हवं तुमच्याकडे. मला असं काही बघायला, त्याविषयी बोलायला खूप आवडतं. येत्या नोहेंबराच्या सुमारास मुंबई-पुणे प्रवास करायचा विचार आहे. त्यापूर्वी 'विल्हेवाट' लावू नका.

सुबोध खरे 24/01/2023 - 19:51
व्याप आवरते घेणे पाच वर्षांपूर्वी आमच्या सासूबाई अचानक हृदयविकाराने गेल्या. त्यानंतर आम्ही सासर्यांना एकटे राहू नका म्हणून सुचवल्यावर ते आपला बंगला विकून पुण्यात मुलाबरोबर स्थायिक होण्यासाठी गेले. त्यावेळेस आमच्या सासूबाईंनी जमवलेली अशी प्रचंड सामग्रीची आम्हाला चक्क विल्हेवाट लावावी लागली. त्यात स्वतः भरतकाम केलेल्या भरजरी साड्या, हौसेने जमवलेली भांडीकुंडी, कपडे इ होते जे आमच्या मुंबई पुण्यातील छोट्या घरात मावणे शक्य नव्हते. तुमच्या कितीही भावना गुंतल्या असल्या तरी ५०-६० साड्या मोठी मोठी पितळेची भांडी घरी नेणे शक्यच नव्हते. आणि ज्यांना दिल्या त्यांना त्याच्या मागची भावना समजू शकलीच नसती. त्यांच्या दृष्टीने त्या सर्व वापरलेल्या गोष्टी होत्या. अर्थात बऱ्याच गोष्टी आम्ही परित्यक्ता, अनाथ महिलाश्रम अशा ठिकाणीच दिल्या तरीही आपल्या भावना गुंतलेल्या गोष्टी देऊन टाकणे अतिशय कठीण असते. यास्तव आपण या गुंत्यातून आपला पाय वेळेत बाहेर काढणे हा विचार तेंव्हा पासून माझ्या मनात आहे. गेल्या वर्षी आमचे वडील पक्षाघाताने अचानक निवर्तले परंतु त्यांनी आपली संपूर्ण व्यवस्था इतक्या उत्तम रीतीने लावलेली होती इतकी कि जायच्या आदल्या महिन्यापर्यंत प्रत्येक गुंतवणुकीचा तपशील त्यांनी आपल्या संगणकात अद्ययावत करून ठेवलेला होता. आपले मृत्युपत्र करून सर्व मालमत्ता आमच्या आईच्या नावाने आणि त्यानंतर मी आणि माझा भाऊ यांच्याकडे कशी जाईल हे संपूर्ण लिखित स्वरूपात ठेवलेले होते. सगळ्याच्या सगळ्या गुंतवणूकीत आईचे एकत्र नाव असूनहि मुलं सुना नातवंडापैकी कुणाचे तरी नामांकनहि केलेले होते. यामुळे त्यांची सर्व मालमत्ता आणि वस्तू वारसाहक्काने येण्यासाठी आम्हाला वकिलाची सुद्धा गरज पडली नाही कि न्यायालयात प्रोबेट करण्यासाठी पायरी चढावी लागली नाही. ८६ व्या वर्षी जायच्या आदल्या दिवसापर्यंत बुद्धी उत्तम चालत होती आणि जीवन सुखासमाधानाने जगताना कोणतीही आसक्ती सुद्धा नव्हती. या दोन्ही अनुभवातून गेल्यामुळे अजून साठी झालेली नसली तरी जीवनाबद्दल आसक्ती राहिलेली नाही. आतापर्यंत जीवन सुखात जगत आलो आहे तसेच शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत राहणे आणि कोणत्याही गोष्टी बद्दल तृष्णा नसणे हि आता माझी इच्छा आहे. अर्थात जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही. असे करणे म्हणजे राष्ट्राच्या बहुमूल्य संपत्तीचा अपव्यय करणे असे माझे मत आहे मनाने मी कदाचित निवृत्तीच्या जवळ पोचत आहे.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 25/01/2023 - 21:50
@ डॉ.सुबोध खरे- वृद्धत्व आणि मृत्यु यांचे अनेकरंगी पदर या धाग्याचे निमित्ताने इथे उलगडले जात आहेत, हे सर्व वाचकांसाठी चांगलेच. तुमच्या सासूबाई, वडील यांच्याविषयी तुम्ही जसे लिहीलेत, तसे अन्य मिपाकरही लिहीतील, तर या धागा अधिक मूल्यवान होईल असे वाटते.

शशिकांत ओक 24/01/2023 - 20:50
आता मला पैसा वाढवायचा नाही, तर मनमुराद भटकंती आणि छंद पुरे करण्यात खर्च करायचा आहे. उभा जन्म काटकसरीत घालवलेला आहे, आता तरी त्यातून मुक्ती हवी.
कलंदर मानसिकतेचे लोकच असे करू शकतील. बाकीचे ठरवतील पण ऐनवेळी खर्च करायला कचरतील... अंतर्मुख करणारा लेख. टप्पा २ काय म्हणतोय ते वाचायला उत्सुक आहे.

आवरतं घेता येणं, आपलं मन त्या स्थितीत नेता येणं, यासाठी जबरदस्त ताकद लावावी लागणार आहे. (थोडा जनरालयझेशनचा धोका पत्करून) महिला अशा बाबतीत जास्त हळव्या असतात. त्यामुळे असं करताना आपल्या अर्धांगाची समजूत घालणं हे थोडं जड जाऊ शकतं. १. हणमंतअण्णा यांच्या प्रतिसादासंबंधी - मी एक फाईल बनवली आहे. त्यात सगळ्या ऑनलाइन अकाउंट्सचे युजर आयडी आणि पासवर्ड, सगळ्या गुंतवणुकीची माहिती, विम्याची माहिती, यातील कोणत्या गोष्टीसाठी (गरज लागल्यास) कोणाची मदत घ्यावी हे आहे. (त्या त्या व्यक्तींना, तुम्हाला अशी मदत मागितली जाऊ शकते याची कल्पना देऊन ठेवली आहे). यात एक मेख अशी आहे, की अशी ऑनलाइन खाती (ईमेल पासून ते ऑनलाइन बँकिंग आणि डिमॅट पर्यंत) आपल्या अगदी कायदेशीर वारसदाराने (आपणच सांगितलेला) पासवर्ड वापरून ॲक्सेस करणं हे कितपत कायदेशीर आहे, याची एकदा शक्यता बघायला हवी. काही वर्षांपूर्वी एक बातमी वाचली होती, की पत्नी डिलीव्हरीसाठी रुग्णालयात दाखल असताना, पतीने तिच्या खात्यातून, तिचे atm card वापरून पैसे काढायचा प्रयत्न केला, तो बेकायदेशीर असल्याचा दावा बँकेने केला होता (आणि बहुधा न्यायालयाने तो उचलून धरला होता). २. @ डॉ, सुबोध खरे,
जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही.
हे प्रचंड आवडलंय. हे मला जमावं, अशी इच्छा आहे.

कंजूस 25/01/2023 - 05:35
विचारांना चालना देणारा लेख म्हणून पाहतो. केवळ वयस्कर लोकांसाठी नसून तरुण पिढीसाठीही योग्य ठरावे. म्हणजे कोणत्या वस्तू घ्यायच्या हो/नाही. १)पर्यटनातील खरेदी ? २)महागडी घड्याळे? -वेळ दाखवणारे यंत्र दोनशे रुपयांत मिळते ३)साड्या - शालू ,पैठणी,भरतकाम केलेल्या. पुढची पिढीच कशाला एकदा वापरून कपाटात ठेवण्यासाठी? ४)देवपुजा सामान व भांडी- भाविकपणा टिकणार का? ५) पुस्तके.- कथा कादंबऱ्या विकत आणणे?

In reply to by गवि

गवि 28/01/2023 - 10:52
पुन्हा वाचल्यावर एक विचार मनात आला. केवळ ऑन अ लाईटर नोट.. फार निरानिपटी आवरून जाऊ नये. पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवावा व्याप, प्रोसिजर. आदर्श सोयीस्कर करून ठेवलं की पोरं आपल्या आठवणीने सारखी अधिकच दुःखी होतील. त्यापेक्षा, "म्हाताऱ्याला हयातीतच हे सगळं करून ठेवायला काय झालं होतं. शिंची कटकट सोडून गेला" असं नावं ठेवत आपल्याला मागे टाकून पुढे जगणं त्यांना सोपं पडतं. आणि त्यांनाही जरा सराव हवा की .. :-))

माझ्या कुटुंबा पुरता मी काय विचार करतो हे मी सांगू शकतो इतरांनी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी म्हणून काही गोष्टी व्यक्तिगत असू शकतात पण बर्‍याच गोष्टी लेखात,प्रतिसादात मांडल्या आहेत त्या सर्वांनाच लागू पडतात. मृत्यूची ओळख वय वर्ष बारा असतानाच झाली.वडील गेले,कर्तेधर्ते,त्यांच्या जाण्यामुळे मागे राहाणाऱ्या आप्त स्वकीय यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणी तेव्हांच लक्षात आल्या,अनुभवल्या व त्यातून बाहेर पडलो.एक गोष्ट मात्र अजूनही करू शकत नाही ती म्हणजे. ती मृतव्यक्ती पुन्हा कधीच दिसणार नाही यामुळे होणारी पिडा. लवकर मेला बाप म्हणून दृष्टी झाली साफ कोण सुखाचे कोण फुकाचे कळले सारे अर्थ नात्याचे ना लोटा ना थाली सारेच कमंडल खाली नाही कुणाची साथ आपणच आपला जगन्नाथ पुढे सैन्यात निवृत्तीवेतन विभागात काम करताना विधवा, आईवडील मुले यांना सैनिकांच्या मृत्यूनंतर होणारा त्रास याच्याशी संबध आल्यामुळे आपण गेल्यावर पाठीमागील लोकांना काय त्रास होऊ शकतो याची साधारण कल्पना आहे. व तो होऊ नये या साठी आगोदरच पावले उचलली आहेत. सर्व छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या/ठेवत आहे. नामांकन सर्व ठिकाणी केले आहे.वैयक्तिक नावावर असलेली संपत्ती व कर्ज याची विल्हेवाट लावली आहे, थोडेफार बाकी आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे. ही एक न संपणारी गोष्ट आहे पण याचा दायरा,परीघ कमी करण्याचा प्रयत्न चालूच आहे. बायकोला व मुलींना जरी हा विषय आवडत नसला तरी वेळोवेळी यावर समुपदेशन करत राहातो. वडीलांनतर आलेल्या कौटुंबिक जबाबदारी मुळे देण्याची सवय जास्त म्हणून मोह फारसा कुठल्याच गोष्टीचा नाही. सर्कंश्री कंजूस ,हणमंत अण्णा यांनी व इतर वाचकांचे प्रतिसाद लेखनास पुरक आहेत. संदीप चांदणे यांचा प्रतिसाद खुप भाऊक आहे,आवडला पण यांचे म्हणणे पटत नाही.वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल,त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही. भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू ,आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय? संपत्ती असेल तर.... ( हे कटू सत्य आहे ते रोजच्या व्यवहारात आपण बघतोच.). पैतृक संपत्ती व मनुष्यस्वभाव यावर एक वेगळा लेख होऊ शकतो. मृत्यूची भिती वाटत नाही असे नाही पण तो येणारच आहे हे त्रिकालाबाधित सत्य मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सतत करतो. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll अशी उन्मनी स्थिती नसली तरी पुढील प्रवासाची तयारी चालू आहे. माझ्या हातात आहे तेवढे मी करणार बाकी मागे सुटलेले व त्यांचे नशीब.

अनिंद्य 25/01/2023 - 11:41
उत्तम संकल्प केलात आणि तो तडीस नेलात, शतवार अभिनंदन !!! So inspiring for all ! माझ्या "Döstädning उर्फ मोकळे हात" धाग्यावर तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही यावर काम करता आहात याची कल्पना होती. पेन्टिंग्स कचरापेटीत टाकून द्यावी लागली याचे दुःख झाले, पण एकूण व्याप कमी केला हे फार आवडले. प्रवासात ओझे कमी असले तर मजा जास्त घेता येते, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि इच्छापूर्तीसाठी शुभेच्छा. तुमच्या पुढील लेखांची वाट बघत आहे.

टर्मीनेटर 25/01/2023 - 14:15
लेख आवडला! अशाच विषयावर मागे अनिंद्य साहेबांचा एक लेखही वाचनात आला होता आणि (जरी त्यातल्या विचारांशी सहमत नसलो तरी) तो ही एक लेख म्हणुन नक्कीच आवडला होता! "अनिश्चित भविष्याची काळजी करत वर्तमानात आनंदाने जगण्याकडे होणारे दुर्लक्ष" दोन्ही लेखांतून अधोरेखित झाले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, त्याच्याशी कोणी सहमत असावे अशी माझी अपेक्षाही नाही! पेंटिंग्स ची विल्हेवाट लावतानाचा किस्सा भारीच 👍 'रोम रंगीं रंगले' हे आवडत्या छंदा विषयीचे लेखन वाचण्यात खूप रस असल्याने पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

विवेकपटाईत 25/01/2023 - 18:53
ही दिल्लीत राहणार्‍या 60 च्या वरच्या 90 टक्के लोकांची व्यथा आहे. द्वितीय युद्धाच्या काळात घरातून पळून/ सहमतीने अनेक मराठी लोक सैन्यात भर्ती झाले. युद्धांनंतर त्यांना सरकारी नौकर्‍य लागल्या. (माझ्या मोठ्या भावाचे आणि बहिणीचे सासरे यात यादीत). त्यांची पुढची पिढीही सरकारी नौकरीत आली. (1950 मध्ये दिल्लीत आलेल्या लोकांच्या पुढच्या पिढी सरकारी नौकरीत आल्या उदा. आमचा परिवार). 1970 मध्ये जनकपुरीत, हरी नगर, विकास पुरी किमान 150 लोकांनी स्वत:चे घर बांधले किंवा DDA फ्लॅट मध्ये आले. भाड्यावर राहणारे ही मोठ्या संख्येत होते. 1977 मध्ये एका प्लॉट वर दत्त विनायक मंदिर ही बांधले . मंदिर मुख्य रस्त्यावर नाही. 1980 मध्ये जनकपुरी (उत्तम नगर) आलो. रोज रात्री मंदिरात वर्दळ राहत होते. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 400 ते 500 लोक सहज होत होते. शनिवार-रविवार तर मंदिराच्या हाल मध्ये दिवसभर केरम टीटी आणि शेजारच्या बगीच्यात बॅडमिंटन इत्यादि. मंदिराच्या पुस्तकालायत 4 ते 5 हजार पुस्तके होते. 100 दिवाळी अंक ही याचे. तिसर्‍या पिढीत अधिकान्श मुले इंजीनियर इत्यादि झाली. त्यांना बंगलोर, पुणे किंवा विदेशात नौकर्‍या मिळाल्या. 1996 खांडेकर नावाचे सज्जन पहिल्यांदा फ्लॅट विकून महाराष्ट्रात गेले. त्यानंतर निवृती नंतर किमान 50 परिवार पुण्यात स्थायी झाले असेल. गेल्या 20 वर्षांत 90 टक्के लोक हा भाग सोडून इतर महाराष्ट्र, इंदूर इत्यादि ठिकाणी गेले. (अधिकान्श परिवारात एकच मूल होते). आज पाच परिवार जनकपुरीत राहत नाही. जे उरले आहेत त्यांची मुले ही दिल्लीत नाही. मंदिराच्या कार्यक्रमांत 50 लोक येत नाही. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 100 ते 150. त्यातले अधिकान्श 60 + आहेत. मंदिरात येणारे अधिकान्श दक्षिण भारतीय होते. जनकपूरित ते ही मोठ्या संख्येने राहत होते. दर शुक्रवारी मंदिरात त्यांच्या श्री सूक्तचा कार्यक्रम व्हायचा. 100 एक लोक राहायचे. मंदिराचा खर्च (पुजारी सेवादार यांचे वेतन, पूजेचे पूजेचे वीज पाण्याच्या खर्च निघून जायचा). तो ही 3 वर्षांपूर्वी बंद पडला कारण तीन चार म्हातारेच उरले होते. आज मंदिराचा खर्च 30,000 रु महिना आहे. मंदिराच्या दानपेटीत 3000 रुपये ही येत नाही. त्यात शिखरासहित मंदिराची मोठी दुरूस्ती करणे भाग आहे. असो. घर सोडून जाताना सर्वांनाच त्रास होतो. माझ्या मुलाने ही ग्रेटर नोएडात एक फ्लॅट बुक केला आहे. मी ही किती काळ भागात राहणार सांगता येत नाही. बाकी दिल्लीतून महाराष्ट्रात परतलेले अनेक वृद्ध तिथेही एकटेच आहे. नव्या लोकांशी जुळविणे त्यांना ही शक्य होत नाही. नातेवाईक ही उदासीन राहतात. दिल्लीत किमान परिचित शेजारी तर होते.

चित्रगुप्त 27/01/2023 - 00:04
मिपाबाहेरील जगातही या लेखात मांडलेल्या अनुभवाचे पदसाद उमटत असल्याची ग्वाही आत्ताच मिळाली. या लेखाचा दुवा मी काही मित्रांना, परिचितांना पाठवला होता. त्यापैकी एकाचा आत्ता फोन आला. त्यांचेही फरीदाबादमधेच घर असून पाच-सात वर्षांपूर्वी नोकरीतून निवृत्त होऊन आता कधी पुण्याला मुलाकडे, कधी फरिदाबादला असे वास्तव्य करत आहेत. लेख वाचून त्यांनी घर विकणे वगैरे संबंधात चवकशी केली. त्यांचाही आता तोच विचार होत आहे, आणि आमच्याप्रमाणेच मनाचा लंबक कधी इकडे, कधी तिकडे झुलत आहे, घरातला पसारा अगदी सेम आहे वगैरे सांगितले. त्यांना वेगवेगळे लोक घर विकून येणार्‍या रकमेत पुण्यात दोन फ्लॅट घ्या, दुकान घेऊन भाड्याने वगैरे सल्ले देत आहेत, त्यामुळेही ते गोंधळून गेलेले आहेत. त्यांना मी या लेखाच्या परिधीबाहेर असलेल्या अनेक बारीक सारीक गोष्टींसकट एक मोठाच पट उलगडून दाखवत काही सल्ले दिले. त्यांनी कबूल केले की असे त्यांना कुणीही सांगितलेले नव्हते, आणि आता आपण काय करायला हवे आहे याची स्वच्छ कल्पना त्यांना आलेली आहे. असो. माझा अनुभव इतरांच्याही कामास येतो आहे, याचे समाधान वाटत आहे.

चौकस२१२ 27/01/2023 - 15:07
वेळ आली कि हा वयाप आवरत घेणे हे केले पाहिजेच पण ते वय होण्याआधी पण २-३ गोष्टी करणे जरुरीचे आहे १) मृत्यूपत्र २) सोप्या शब्दात ( ब्लॅक बुक ) सर्व महत्वाची माहिती लिहून ठेवणे आणि तिसरे म्हणजे मध्य वयातच फाफट पसारा न वाढवणे ... ( कळतंय पण वळत नाही असे ) कधी कधी वाटत कि अक्षरशः २ -३ ब्यागेत भरेल एवढे सामान असावे म्हणजे कधी हि कोठेही जाण्यास बंधने नकोत ( जणू काही आपण मल्या किंवा निरव मोदी आहोत आणि कधीही देश सोडवा लागेल तर ! )

कंजूस 27/01/2023 - 18:41
मरणार मरणार अशी वाच्यता वारंवार करून मुलांना दुखवायचं नाही. उद्या सकाळपासून काय काय करायचं हा विचार येणे बंद झाले की मनुष्य मेल्यातच जमा होतो. ते जाहीर करावं लागतं नाही.

लेख उत्तम आवडला. प्रतिसादही. वाचत आहे. सालं निरोपाचं सगळं कठीणच असतं. मन गुंतत राहतच असते माणसं असो की वस्तू. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 09/08/2023 - 18:23
"आवरते व्हा" विषयी सुंदर लेख !
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही,
ही लेखाची सुरुवात वाचून मन कातर झाले. काही लोक जात्यात असतात, आपण सुपात असतो ही जाणीव तीव्र होते. स्वतःलाही "आवरते व्हा" हे आपोआपच जाणवायला लागते ! आवडलेली चित्रे, पेंटिग्ज, मासिके, कात्रणे, कॅलेन्डर्स प्रचंड प्रमाणात जमवायला लागलो होतो ... संग्रह कुठे ठेवायचा हा प्रश्न सुरु झालाच होता. त्यवेळी अगदी जवळचे वयस्क चित्रकार (त्यावेळी त्यांचे वय ७० वर्षे होते) त्यांच्या अवाढव्य संग्रहाचा, जागेचा, साठवणूकीचा आणी हाताळण्याचा प्रचंड त्रास सुरु झाला हे पाहून मनोमन ठरवले आपण संग्रह करायचा नाही ... त्या मुळे वयाच्या ३५शीत अपॉप "अपरिग्रह" अंगी बाणवला गेला ! गेल्या काही वरर्षांपासून "कोनमारी पद्धत बरीच चर्चली जाऊ लागली आहे ! चांदणे संदीप, सस्नेह, सुबोध खरे, Bhakti, हणमंतअण्णा शंकर..., कंजूस, तुषार काळभोर, कर्नलतपस्वी इत्यादि मिपाकरांनी खरंच खूप सुंदर प्रतिसाद लिहिलेत ! पेंटीग्जचे तुकडे करून मगच फेकले हा किस्सा खुसखुशीत आहे ! धन्यवाद, चित्रगुप्त जी ! आता पुढचा भाग वाचायला घेतो.

चौथा कोनाडा 30/01/2024 - 14:43
या लेखाचा पुढचा भाग 'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला' हा लेख वाचायला सुरुवात केला आणि हा धागा वाचला असल्याचे आठवले (त्या वेळी प्रतिसाद द्यायचा राहीला बहुधा) पुन्हा वाचायला आलो. सुंदर लेख आणी प्रतिक्रियाही तितक्याच सुंदर ! स्वतःचा व्याप आवरता घेऊन निरोप घेणे खुपच सुंदर ! (इथं मला कालावश वैगरे शब्द आठवताहेत ! ) धन्यवाद चित्रगुप्त !

मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे. समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे. तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

चित्रगुप्त ·

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/01/2023 - 22:08
@कंजूसः सिल्वर - गोल्ड - प्लाटिनम - ह्यो काय भालगड हाय, मज निरोपावे. लाईक सबस्क्राईब वगैरे केलेत ह्ये ब्येस.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चित्रगुप्त 20/01/2023 - 22:13
@ सौंदाळा : आपणासरिखे आणिक असती, मग कशाला मनात भीति ? तुमच्या प्रतिसादाने आश्वस्त झालो.

घरोघरी मातीच्याच चुली. केव्हातरी पहाटे उलटून रात गेली शारंगधर वटी ने अवचित जाग आली मिटले चुकून डोळे, बसता सुखासनी मी तेवढ्यात हाक कानी आली आटोपले का सर्व तुमचे? व्हा बाहेर झडकरी अन् ठेवा आधण चहाचे ऐकता हुकूम रणरागीणीचा कळले मला न केंव्हा उघडली चिटकणी दाराची उरले पोटात काही, आवाज Xदण्याचे तरी मला ढकलून ती आत गेली

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/01/2023 - 22:19
लागू. मिपाच्या पूर्वीच्या 'तांबे' कवींना मागे टाकणार बहुतेक. तांबे कवींनी बऱ्याच काळाने खरडफळ्यावर जळजळ व्यक्त केली गद्यात. असो. चालायचेच.

In reply to by कंजूस

काय बी समजलं नाय. उलगडून सांगता का? दैनंदिन कार्यक्रम म्हणून चार ओळी सुचल्या त्या खरडल्या. @राजेंद्र भौ,पहिल्यांदाच विमानात बसलो तेंव्हा टेन्शन आले होते. उंचावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणे..... बाकी अजुन तरी सब ठिक है...

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 21/01/2023 - 13:34
@कर्नल साहेबः व्वा. मजा आली. 'सुखसारक' कविता आवडली. कर्नल दीवाने है मैफिल का मजा लेते है ... शारंगधर लेके प्रतिसाद दिया करते है ... सुबा सुबा एक 'वटी' लेते है, बंद ताला भी हो तो खुल जाता है ... .

टर्मीनेटर 21/01/2023 - 13:49
मस्त! काही वर्षांपूर्वी कॅन्डी क्रश खेळण्याचा प्रचंड नाद लागला होता तेव्हा असा प्रकार माझ्याबाबतीत घडायचा. खरंतर कार्यभाग साधण्यास दोन मिनिटेच पुरेशी असली तरी सर्व लाईफस संपेपर्यंत 'आत'च बसून राहायचो 😀

"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

चोरी

पॉइंट ब्लँक ·

योगी९०० 06/01/2023 - 10:35
सुंदर कथा... गोष्टीतले महाराजही आवडले. खरोखर महाराज असलेलेच असे वागतात नाहीतर भोंदू स्वामीन बाईसारखे वागतात.

आंबट गोड 06/01/2023 - 12:14
खूपच सुरेख. विशेषतः लेखनातले बारकावे पाहता तुम्ही हे सगळं अनुभवलं असल्याची खात्री पटते. किती नीट्स वर्णन! शिवाच्या अभिषेकाचं वर्णन तर फारच सुरेख. नुसते वाचताना आम्हालाही पुण्य घडलं.... शब्दांजली वाहिल्या सारखी!

छोटा कृष्णा मित्रांसोबत  वाड्याच्या  अंगणात  खेळण्यात  गुंग  होता.      "कृष्णा  गौरव्वा  आहे  का  रे  घरात ?"  ह्या प्रश्नाने   त्याचे  मन  खेळातून  बाहेर आले,  त्याची  मान  आवाजाच्या  दिशेने  वळली -  सत्तरी  ओलांडून गेलेल्या  आज्जी  काठी जमिनीला  टेकवून उभ्या  होत्या.  त्याने होकारार्थी  मान  हलवली .  पळत आत जाऊन  वर्दी दिली - "आई  स्वामी  आज्जी  आल्या आहेत.

समर्थ रामदास: श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त 05/01/2023 - 02:09
दिल्लीत दासबोधाचे कार्यक्रम होत आहेत हे वाचून आनंद जाहला. आता आम्ही दिल्लीनिवासी राहिलेलो नसल्याने याचा लाभ घेता येणार नाही. या निमित्ताने दिल्लीतील खूप जुने रहिवासी श्री. रानडे यांची आठवण आली. ते सुंदर कीर्तन करीत. माझ्या आठवणीप्रमाणे ते बहुतेक वास्तुविशारद होते. मात्र १९७९ नंतर त्यांची कधीच भेट होऊ शकली नाही. मी कधीकाळी दासबोधाच्या शैलीत ओवीबद्ध अशी खूप कवने केली होती. झरझर सुचत जायचे आणि तेंव्हाच्या तेंव्हा लिहून ठेवले नाही तर सगळे विसरायला व्हायचे. असो. दिल्लीत एका उत्तम कार्याला आपण हातभार लावत आहात हे वाचून खूप समाधान वाटले.

In reply to by चित्रगुप्त

विवेकपटाईत 11/01/2023 - 18:43
धन्यवाद. श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात दिल्ली केंद्राला या महिन्यात पाच रविवारी निरूपण करण्याचा मान मिळाला आहे. दिल्ली केंद्राला सौ. मंगला ताई कवठेकारांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. समर्थ कृपेने दोन कार्यक्र्म यशस्वी पार पडले आहे.

चौथा कोनाडा 16/01/2023 - 17:48
सुंदर निरुपण ! ऐकल्याविण कळलें। शिकविल्याविण शहाणपण आले। देखिलें न ऐकलें। भूमंडळी। श्रीदासबोध समजण्यासाठी निरूपण ऐकणेही गरजेचे. - अगदी तुमच्या कार्यास शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा!

जय जय रघुवीर समर्थ (श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 16/11/2022 - 23:51
याचा मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल. https://youtu.be/IrF6wfwmkWI

सस्नेह 17/11/2022 - 07:13
सुंदर फोटो. आम्ही कोल्हापूरकर भारीच आहोत मग ! :) नदीपात्रात दिवे सोडून प्रदूषण वाढवण्यापेक्षा तीरावरच दिवे लावणे उत्तमच.

कंजूस 27/11/2022 - 16:53
हे नदीची आऽरती प्रकरण फार वाढत चाललंय. हरिद्वार - प्रयागराज आणि आता काशी, उज्जैन (नर्मदा) कोल्हापूर (पंचगंगा). उसाच्या मंळीने कितीही मलीन होवो पंचगंगा, आऽरती झालीच पाहिजे.

पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

Silver Trumpet and Trumpet Banner

पराग१२२६३ ·
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.