Skip to main content

संस्कृती

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 28/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 28/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 25/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात: जनासीं मीत्री करीना। कठिण शब्द बोले नाना। मूर्खपणें आवरेना। कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥ याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते.

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 23/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे. समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे. तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 19/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

परदेशस्थ भारतीय

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 06/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

चोरी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी बुधवार, 04/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा कृष्णा मित्रांसोबत  वाड्याच्या  अंगणात  खेळण्यात  गुंग  होता.      "कृष्णा  गौरव्वा  आहे  का  रे  घरात ?"  ह्या प्रश्नाने   त्याचे  मन  खेळातून  बाहेर आले,  त्याची  मान  आवाजाच्या  दिशेने  वळली -  सत्तरी  ओलांडून गेलेल्या  आज्जी  काठी जमिनीला  टेकवून उभ्या  होत्या.  त्याने होकारार्थी  मान  हलवली .  पळत आत जाऊन  वर्दी दिली - "आई  स्वामी  आज्जी  आल्या आहेत.

समर्थ रामदास: श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 03/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय रघुवीर समर्थ (श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 12/11/2022 या दिवशी प्रकाशित केले.
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

Silver Trumpet and Trumpet Banner

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 07/11/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.