मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

अंतरंग - भगवद्गीता - भाग ४

शीतलउवाच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥ नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?

उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार ·
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

स्मरण चांदणे५

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्मरण चांदणे ५.     आषाढ महिना सुरू झाला की पावसाची वाट पाहाणे सुरू होई.आषाढातच चातुर्मास सुरूहोई.आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात, विशेषत:,बायकांचे वेगवेगळे उपवास,व्रतवैकल्ये सुरू होत.नित्याचे उपवास,वार असत ते वेगळेच.या काळातील ,धार्मिक महत्वाचे दिवस(तिथी)सांगण्यासाठी भटजी घरी येवून पंचांगानुसार तिथ्या,सण इ.ची माहिती सांगत.त्यांना नमस्कार करून,दक्षिणा,धान्य,आणि चहा/ दुध दिले जाई.

अंतरंग - भगवद्गीता - भाग ३

शीतलउवाच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग! दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन.

अंतरंग - भगवद्गीता - भाग २

शीतलउवाच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच.

अंतरंग - भगवद्गीता - भाग १

शीतलउवाच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मित्रहो, भगवद्गीता हा नेहेमीच सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय राहीला आहे. निरनिराळ्या संदर्भात लहानपणापासून या पुस्तकाबद्दल आपण ऐकत असतो. काही जणांना लहानपणी यातील एखादा अध्याय (ब-याचदा जबरदस्तीने!) पाठही करायला लागला असेल. पण ते कुतुहल, कुतुहल याच पातळीवर राहते त्यात फारशी प्रगती होउन आपण स्वतःहून या पुस्तकाच्या वाटेला क्वचितच जातो. पुढे कुठेतरी ट्रेनिंग्ज, सिरियल्स, मॅनेजमेंट प्रेझेंटेशन्स, ऑनलाईन कंटेट वगैरे च्या माध्यमातून गीता आपल्यासमोर येत राहते आणि आपले हे कुतुहल जागवत राहते. माणसाला पडणा-या अनेक सामान्य असामान्य प्रश्नांची उकल करणारे पुस्तक म्हणून गीता आपल्याला माहीत असते.

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, कसे आहात? सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच. मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे. अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण

मनो ·
लेखनप्रकार
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image

खंडेरायानं करणी केली

पाषाणभेद ·
यळकोट यळकोट जय मल्हार बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ व्हती मेंढरं खंडीभर चराया नेली डोंगरावर हिरवा पाला रानोमाळं भवती गार गार वारं आलं भरूनी आभाळं काळ्या ढगांच झालं भार पळात आलं धरणीवर चकमक दावली विजेनं कल्लोळ उठला त्या ठाणं चमत्कार दावला देवानं वर रोखूनी धरलं त्यानं बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥ एका दिशीची कहाणी तहान लागली मेंढरास्नी नेली देवानं गिरणेवरी प्यायला लागली पाणी नदीला आला पूर भरपूर जिकडे तिकडे हाहाकार केला छातीचा बंधार पाणी अडवती मल्हार बाणाईच्या मेंढरासा

करा बाई करा ग देवीची आरती

पाषाणभेद ·
लेखनविषय:
करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती आणा बाई आणा ग देवीला कुंकू लवा बाई लावा ग देवीच्या कपाळा भरा भाई भरा ग देवीचा मळवट नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी घाला बाई घाला ग देवीला नथनी घाला बाई देवीला मंगळसुत्र घाला बाई घाला देवीला कमरपट्टा घाला बाई घाला ग देवीला तोडे चाल बदलून ए निरांजन दिवा ताटात आणा हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा करा देवीची आरती भक्त सारे ओवाळती पहिली चाल करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती - पाभे २९/१२/२०२१