मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·
काव्यरस
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

अजून दरवळतो सुगंध

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक ·

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

सण आणि आपण

नीलकंठ देशमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत.. महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष. हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी. भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.

कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण

चौथा कोनाडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.

पुस्तकगप्पा

मेघना भुस्कुटे ·
लेखनप्रकार
नमस्कार. 'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण. लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

सत्य

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। पितरंच प्रयन्त्स्व:॥ ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य (ऋ. १०/१८९/१) अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते. ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते.