त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो.
रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती.