Skip to main content

सद्भावना

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

मी त्याला देव मानत नाही…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/11/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो... तो_१ छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.

दिवाळीचे विष्णूपूजन !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

लेखक राजु भारतीय यांनी बुधवार, 30/10/2013 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.

ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध मन्ना डे अर्थात मन्नादा कालवश !

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/10/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध गायक मन्ना डे अर्थात मन्नादा यांनी आज पहाटे बंगळूरू येथे अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ होते. शास्त्रीय बाजातील गीत गायन ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट होते. हिन्दी, भोजपुरी, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी जवळपास साडे तीन ते चार हजार गीत गायली आहेत. मुकेश, मो. रफी किशोरकुमार यांच्या काळात ही आपली वेगळी गायकी त्यांनी रसिकप्रिय केली.

कोजागिरी स्पेशल

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर ) तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि दूध मसाला (२५ रुपये तोळा) (स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या) संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे. कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल. दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये. बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.

उद्या दि. ०९ ऑक्टोबर ला जागतिक टपाल दिवस आहे.

लेखक psajid यांनी मंगळवार, 08/10/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या दि. ०९ ऑक्टोबर ला जागतिक टपाल दिवस आहे. त्यानिमित्त पूर्वी आपला समाज संदेश दळण- वळण कामी ज्याची मदत घ्यायचा त्या दूरसंचार अर्थात POST खात्याची आठवण आली. नुकतेच पोस्ट खात्यातून तार ही संदेशांची देवाण घेवाण करणारी १८३८ मध्ये सुरु झालेली सेवाही बंद झाली. त्यावेळी अतिशय वाईट वाटले.

तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

लेखक साळसकर यांनी सोमवार, 23/09/2013 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
लाडका तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!! एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते..

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या.

बारीक

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 15/07/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारीक गेला. उणेपुरे ३२ वर्षे म्हणजे काही जाण्याचे वय नव्हते तरी गेला. दुपारी साडेतीन ला मीत्याच्याशी बोललो आणि साडेपाचला बारीक गेलाही होता. त्याच्या जाण्याचे दु:ख आहेच पण याचे जास्त दु:ख आहे की जगातुन एका चांगल्या माणसाने कायमची एक्झिट घेतली. वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात आणि कोणाच्या अध्यातमध्यात नसणारा एक सामान्य माणूस २ तासात इहलोक सोडतो.