खिशात किती नोटा आहेत जमा ?
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about खिशात किती नोटा आहेत जमा ?
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रिया, मी तर तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
प्राणेश्वरा,जीवलगा! सख्या सजना !
तुझिया संगती रे आज मज ना
पाहावयाचा आहे ( फुकटात ) सिनेमा
प्रिया मी तुझीच प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
( भुलते हे जन पैसा पाहुनी
असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी'
पैशाविना मोल ना तव प्रेमा )
प्रिया मीच तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
पाहू दे रे मनाची दिलदारी
नसेल 'बैलेंस' कर उसनवारी
तुझिया प्रेमाची होईल खातरजमा
प्रिया मीच ना तुझी प्रियतमा ?
( खिशात किती नोटा आहेत जमा?
Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य
)
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.