संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे
( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’.
जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय?
जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी.
पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?
लेखकनाखुयांनी मंगळवार, 22/03/2016 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
.........
लेखकटवाळ कार्टायांनी शुक्रवार, 18/03/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना
कूणास ठाऊक ?
काय घेण्यासाठी
काय वेचण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय चापण्यासाठी
काय गिळण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय टापण्यासाठी
काय हुंगण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
कूणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नूसतेच खर्चण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही
पाकिटशोध (दिव्यसंग्रह)
लेखकअत्रुप्त आत्मायांनी शनिवार, 12/03/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे!
लेखकमहासंग्रामयांनी शनिवार, 12/03/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा स्त्रोत
रे मामा
गाडी पकडलेली पाहताना त्रास होतो-
मागे पळून गाडी पकडू नकोस!
आठवून भूतकाळ वाईट वाटतं-
नंबरप्लेट तू पाहू नकोस!
दिल्या-घेतल्या पावत्यांची
फिकिर तू करू नकोस
पकडलेल्या गाडीस
दया बिलकूल दावू नकोस!
गेलास निघुनी गाडीची चाबी घेउनी
आता पैसे नाकारु नकोस
या चौकात भेटलास ,
कृपया पुढल्या चौकात भेटू नकोस!!
(ताजी कविता- आताच 9/10वाजता हाफिसात येताना केली होती.)
लेखककवि मनाचायांनी रविवार, 06/03/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी,
अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी,
कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात,
पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !!
डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी,
लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी,
ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी,
विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.