मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनातल्या मनात मी...

सत्यजित... ·

एस 06/11/2017 - 23:27
गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची
उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!
वाह! अगदी 'तुझ्याच अंगणी स्वरांचा...' ची आठवण आली. खूपच छान!

लेखनविषय:
काव्यरस
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित... ·

नेहमीच वाचतो तुमच्या गझला. "स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते..." ही तर अगदी पाठ झालीय आता. तुमचे शब्द एक लय घेऊन येतात, ते फार आवडतं मला.

सत्यजित... 09/10/2017 - 23:12
कवितानागेश,अनन्तयात्रीजी,रुपी,चामुंडराय,आगाऊ म्हाद्या,अभ्या,तृप्ति...आपणासारख्या रसिकांकडून भरभरुन मिळालेली दाद अत्यंत अल्हाद-दायक,प्रोत्साहनीय आहे! आपणा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद!

सत्यजित... 09/10/2017 - 23:33
'कविता' विभागातील रचना,त्यातही माझी रचना,रसिकांकरीता 'शिफारस' सदरांतर्गत नोंदविल्याबद्दल,तत्संबंधी कार्यरत टीम तसेच मिपा संपादक,सा.सं.मंडळाचे खूप-खूप आभार!'मिपा'वर लिहिणाऱ्या अनेक उत्तम कवींसाठी ही बाब नक्कीच प्रोत्साहनीय असेल,तसेच रसिक-वाचकांसाठी ही एक उत्तम काव्यपर्वणी ठरावी! नव-नवीन उपक्रम तथा सकारात्मक बदल राबविण्याबाबत,'मिपा'च्या तत्पर भूमिकेचे,त्यासाठी वेळात वेळ काढून सतत कार्यशील टीम्सचे कौतुक,तसेच आभार,जाहिर मांडणे,केवळ ईष्टच नव्हे, तर अगत्याचे वाटते! पुनःश्च एकवार, सर्वांचे हार्दिक आभार!

आनंदयात्री 11/10/2017 - 07:22
कविता छान आहे, पहिली दोन कडवी तरल आहेत. या कवितेचे दृक्श्राव्य सादरीकरण उदाहरणार्थ सचिन खेडेकरने केले तर ऐकायला अतिशय आवडेल.

सत्यजित... 01/11/2017 - 01:09
मिसळलेला काव्यप्रेमी,सुनील सर,अविनाशजी,स्वप्नाजी,पंडितजी...सर्वांचे मनापासून धन्यवाद!

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

'गुलज़ार'

सत्यजित... ·

In reply to by चांदणे संदीप

पुंबा 22/08/2017 - 17:22
++११ आणखी वेगळे आकृतीबंध ट्राय करून पहा असे सुचवतो..

In reply to by सत्यजित...

एस 24/08/2017 - 13:16
तुम्ही इतर फॉरमॅटमध्ये आणि विशेषतः मुक्तछंदात तुमच्या गझलांप्रमाणेच अप्रतिम असे काही लिहित असाल असे वाटले. किंवा नसाल तर लिहून पहा. वाचायला आवडेल.

सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित

मांडतो आहे नव्याने...

सत्यजित... ·

सत्यजित... 25/08/2017 - 00:13
अमरेंद्र,हरवलेला...प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बिरुटे सर,गा.पै.जी, आपलेही मनःपूर्वक धन्यवाद! आपले प्रतिसाद पाहून-वाचून आनंद झाला!

चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे! सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

भरवू नकात आता...

सत्यजित... ·

राघव 15/08/2017 - 21:52
रचना ठीक. पण एक सांगावेसे वाटले, म्हणून.. तुमच्या रचना छान असतात, गेय असतात. त्यांचा थोडा संदर्भ, रूपरेषा जर आधी किंचित मांडली तर कवितेशी समरस होऊन आस्वाद घेणे अधिक आवडेल. पटले तर प्रयोग करुन बघावा. चु.भु.द्या.घ्या. राघव

In reply to by राघव

सत्यजित... 16/08/2017 - 00:29
राघवजी,प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! माझ्याकडून सहसा,गझल लिहिण्याचाच प्रयत्न केला जातो! गझलेची रचना मुळातच छंदबद्ध असल्याने,तिच्यात गेयता सहजच उतरुन जाते! गझलेचा प्रत्येक शेर,ही एक स्वतंत्र कविता असल्याने,तसेच प्रत्येक शेरात वेगळा विषय मांडण्याचे स्वातंत्र्य (गैरमुसलसल)गझल देत असल्याने,संपूर्ण गझलेची रुपरेषा मांडणे (निदान गैरमुसलसल गझलेबाबतीत) अवघड आहे! शिवाय गझलेत विधाने केली जात नाहीत.एक विचार एकाच शेरांत पूर्णपणे व्यक्त होणे गरजेचे असतानाच,प्रत्येक शेर आपआपल्या प्रतिमांत व्यक्त होणे गरजेचे असते! शिवाय रसिकांना आप-आपले अनुभव,ईच्छा ई. अनुसार प्रतिमांचे अर्थ,संदर्भ शोधण्याचे स्वातंत्र्य गझल देत असते,हि तिची एक खासियत आहे! धन्यवाद!

शब्दबम्बाळ 16/08/2017 - 08:38
खरं तर माफ करा म्हटलं पाहिजे! जे काही लोक चांगलं लिहितात ते बऱ्याचदा दुर्लक्षित राहत... इतक्या दिवसांनी पहिली हि गझल, तुम्ही लिहिता छानच.. लिहीत रहा! :) खासकरून हे दोन आवडले - "तू ही परी प्रमाणे स्वप्नात बागडावे देऊ कसा तुला मी उपहार अारश्यांचा!" "अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!"

In reply to by शब्दबम्बाळ

सत्यजित... 16/08/2017 - 12:25
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार शब्दबंबाळ! >>>खरं तर माफ करा म्हटलं पाहिजे! जे काही लोक चांगलं लिहितात ते बऱ्याचदा दुर्लक्षित राहत...>>>आवड आणि सवड यांची सांगड घालताना रसिकांकडून असं होत असावं कधी-कधी! पण अनेक वाचनांनंतरही कसलाच,एकही अभिप्राय मिळाला नाही तेंव्हा आपण रसिकापर्यंत पोहोचू शकलो नाही की काय अशी खंत डोकावून जाते एखादवेळी! अशांत आपल्या प्रतिसादासारखा येणारा अनुभव मात्र ऐन दुष्काळात एखादी सर कोसळून जावी असा अल्हाददायक असतो! धन्यवाद!

भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!

तू अशी

संदीप-लेले ·
लेखनविषय:
मौन माझे तुला एवढे सांगते तू किती बोलते तू किती बोलते मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती फोनची कंपनी त्यावरी चालते वाजले चार रे, दे मला तू चहा मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते उंट तंबू मधे, आणि उघडयात मी या कपाटात तू, वल्कले कोंबते सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते शस्त्र नाही करी, हार नाही तरी येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते वाढले वय तसे, समज ही वाढली रात्र समजून तू, दिवसभर झोपते राग मानू नको, स्वप्न होते तुझे दिवस संपेल हा, का तरी लोळते

फुंकिले मी प्राण माझे...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित

कधी मध्यम,कधी पंचम...

सत्यजित... ·

चौकटराजा 23/07/2017 - 18:52
मस्त अलबेली गजल आहे. तो निर्व्याज हा शब्द मात्र अस्थानी वाटतो. कारण फुलांना देखील मोहरावेसे वाटते असा स्पर्श निर्व्याज कसा असेल तो मादकच असणार !

सत्यजित... 24/07/2017 - 23:55
प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौकटराजाजी! 'झाड/वेलीपासून अलग झालेली फुलेही,तुझ्या केसांत शिरताना (ऋतुंच्या स्पर्शाने मोहरुन जावी,इतक्या नैसर्गीक अंदाजात!) मोहरुन जातात!' असे काहिसे...

कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

...नवल!

सत्यजित... ·

राघव 18/07/2017 - 21:59
असे शब्द.. अर्थात ओथंबलेले! समजूनही पुन्हा वाचणे.. नवल! भाषेत अपुल्या कशी ती करामत! पुन्हा भाव "तो".. उमजणे.. नवल! गझल खूप आवडली. शेवटचा ट्विस्ट कातिल! :-)

नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

झाली...पहाट झाली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!