मांडतो आहे नव्याने...
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!
सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!
जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!
वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!
काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!
—सत्यजित
तिसरे कडवे भारी आहे!
तू उखाणे घेत असता,नाव
फारच छान!!!
धन्यवाद!
मस्त!
धन्यवाद रुपी!
मस्त
"तू उखाणे घेत असता,नाव
वाह क्या बात है भाई...
नावचं कडवं अप्रतिम
धन्यवाद!
आवडली...
अप्रतिम..!!
पंडितजी,विशुमित धन्यवाद!