✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'गुलज़ार'

स — सत्यजित..., Mon, 08/21/2017 - 18:18
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
7212 वाचन

💬 प्रतिसाद (12)

परवा गुलजार साहेबांच्या

सत्यजित...
Mon, 08/21/2017 - 19:45 नवीन
परवा गुलजार साहेबांच्या वाढदिवशी (१८/०८) सुचलेल्या ओळी!
  • Log in or register to post comments

गुलजारसाहेबांबद्दल काय बोलणार

एस
Tue, 08/22/2017 - 11:18 नवीन
गुलजारसाहेबांबद्दल काय बोलणार! _/\_ कविता आवडली. तुम्ही गझलांमधून बाहेर पडून कधी मुक्तछंद करून पाहा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
Tue, 08/22/2017 - 15:46 नवीन
तुम्ही गझलांमधून बाहेर पडून कधी मुक्तछंद करून पाहा असे सुचवतो.
किंवा इतरही काही. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सत्यजित...
Tue, 08/22/2017 - 15:49 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

++११

पुंबा
Tue, 08/22/2017 - 17:22 नवीन
++११ आणखी वेगळे आकृतीबंध ट्राय करून पहा असे सुचवतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस!

सत्यजित...
Tue, 08/22/2017 - 15:47 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस! कृपया आपल्या सुचवणीमागचे कारण सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments

काही विशेष नाही

एस
गुरुवार, 08/24/2017 - 13:16 नवीन
तुम्ही इतर फॉरमॅटमध्ये आणि विशेषतः मुक्तछंदात तुमच्या गझलांप्रमाणेच अप्रतिम असे काही लिहित असाल असे वाटले. किंवा नसाल तर लिहून पहा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

झकास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/24/2017 - 10:52 नवीन
आवडली गझल. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद सर!

सत्यजित...
Fri, 08/25/2017 - 02:48 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा!

पैसा
Sat, 08/26/2017 - 08:54 नवीन
सुरेख लिहिले आहे!
  • Log in or register to post comments

खुप छाम सत्यजितजी

mr.pandit
गुरुवार, 08/31/2017 - 15:45 नवीन
खुप छाम सत्यजितजी
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैसा,पंडितजी!

सत्यजित...
Fri, 09/01/2017 - 01:58 नवीन
धन्यवाद पैसा,पंडितजी!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा