Skip to main content

कधी मध्यम,कधी पंचम...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/07/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला! फुलांचे अंग मोहरते,तुझ्या केसांत शिरताना असावा स्पर्शही कोमल किती निर्व्याज अलबेला! लिहावे वाटते तेंव्हा सतत दिसतेस तू मजला कसा गझलेमध्ये बांधू सखीचा बाज अलबेला! कुणी का पाहिला होता?गुलाबी रंग पुनवेचा! मला तर वाटतो आहे खरा मी आज अलबेला! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2414
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्त अलबेली गजल आहे. तो निर्व्याज हा शब्द मात्र अस्थानी वाटतो. कारण फुलांना देखील मोहरावेसे वाटते असा स्पर्श निर्व्याज कसा असेल तो मादकच असणार !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौकटराजाजी! 'झाड/वेलीपासून अलग झालेली फुलेही,तुझ्या केसांत शिरताना (ऋतुंच्या स्पर्शाने मोहरुन जावी,इतक्या नैसर्गीक अंदाजात!) मोहरुन जातात!' असे काहिसे...