Skip to main content

फुंकिले मी प्राण माझे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 25/07/2017 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1830
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

-/\- :)

__/\__

चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सुंदर !!